उत्तर आंध्र प्रदेशातील गणेश पूजा: प्राचीन कलिंगचा वारसा

Ganeshotsav : उत्तर आंध्र प्रदेशातील, विशेषतः श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावातील गणेश पूजेचा प्राचीन इतिहास आपण जाणुन घेणार आहोत. इथे एकेकाळी कलिंग साम्राज्याची राजधानी होती. हजारो वर्षांपासून इथे बाप्पाची पूजा भक्तिभावाने केली जाते. ही परंपरा आजच्या मंदिरांना दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या आध्यात्मिक वारशाशी जोडते.

परदेशातील गणपती

शतकानुशतकं इंडोनेशियात गणपतीची पूजा केली जाते. 1998 मध्ये तर इथल्या वीस हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचं चित्र छापण्यात आलं. जावामधल्या दिआंग पठारावर गणपतीची अतिप्राचीन पाषाणमूर्ती  आढळते. तर  बालीमध्ये आपल्याला ड्रॅगन अवतारातील गणपती पाहायला मिळतो.

गौर कशाच्या पायी आली? अन्नधान्याच्या, सोन्या मोत्याच्या, विद्वत्तेच्या…

काही जणांकडे केवळ एकच गौर असते. तर काहींकडे ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोघी बहिणी येतात. तर काहींकडे त्यांची बाळंपण सोबत असतात. काहींच्या मते गौरी ही गणपतीची आई आहे, तर काहींच्या घरी त्या गणपतीच्या पत्नी रिद्धी-सिद्धी असल्याचं मानतात. आई, पत्नी रुप कोणतही असलं, तरी गौरी माहेरी येते हे मात्र नक्की. आणि तिच्या माहेरपणात तिची ऊठबस करायला, तिचे लाड करायला संपूर्ण घरात उत्साह संचारतो.

बंगालचा गणेश: शेताचा राखणदार आणि कलेचा सोबती

Ganeshotsav : बंगालमधील लोककथांमध्ये गणपती केवळ शिव आणि पार्वतीचा लाडका पुत्र नसून, तो शेती आणि कला परंपरांचा संरक्षकही आहे. तिथे गणपती बाप्पाला केवळ घरातील पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यासाठीच पुजले जात नाही. तर त्याचा संबंध प्राचीन काळापासून ‘राखणदार’ म्हणजेच शेती आणि गावाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या देवतेशीही जोडला गेला आहे. त्यामुळेच बंगालमध्ये गणपतीची मूर्ती फक्त घरांमध्येच नव्हे, तर शेतांच्या जवळही स्थापित केलेली दिसते.

गणपतीच्या विविध नावाची उत्पती आणि त्याचा अर्थ

Ganeshotsav : गणपती बाप्पा यामध्ये गणपती या शब्दामध्ये गण आणि पती असे दोन शब्द आहेत. यापैकी पति या शब्दाचा अर्थ पालन असा होतो. तर गण या शब्दाचे विविध अर्थ सांगितले जातात. याशिवाय गणेशजींना चिंतामणी, वक्रतुंड, एकदंताय अशा विविध नावांनी संबोधलं जातं.

गणपती, महालक्ष्मी उत्सव : मराठवाड्याचा मांगल्यमय ठेवा

Ganeshotsav : मुंबई पुणे शहराप्रमाणे मराठवाड्यातही सार्वजनिक गणोशोत्सव भव्य दिव्य रुपात साजरा केला जातो. तरिही इथल्या घराघरामध्ये साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाप्रमाणेच घरात येणाऱ्या महालक्ष्म्याचीही पारंपरिक पद्धतीने पूजन केलं जाते. 

मुद्गल पुराणः श्रीगणेशाचे जीवन आणि आख्यायिकांचे दस्ताऐवज

Ganeshotsav : मत्सरासूर, दंभासूर, क्रोधासूर, कामासूर, लोभासूर आणि मदासूर हे मानवी अंतःकरणातील षड्रीपू आहेत. या मानवी गुणांवर कशी मात करावी हे अप्रत्यक्षरित्या मुद्गलपुराणात विविध रुपककथांच्या आधारावर सांगितलं आहे. यात ज्ञान-विज्ञान कथांचाही समावेश आहे.

गणपतीला दुर्वा, जास्वंद आणि मोदकचं का अर्पण करतात? आणि उंदीर गणपतीचं वाहन का आहे?

Ganeshotsav : गणपतीला दुर्वांचाच हार का घालतात, सिंहही गणपतीचं वाहन आहे पण मग उंदीरचं का सतत दाखवला जातो? जास्वंदाचं फूलचं का इतर फुलं का वाहिली जात नाहीत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. 

बाप्पाचा लाडका नैवेद्य: मोदकांचे 21 विविध प्रकार

Ganeshotsav : गणेश चतुर्थी म्हटलं की, सर्वात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य ‘मोदक’. या दिवसांत घराघरांतून मोदकांचा सुगंध दरवळत असतो. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची आपली खास परंपरा आहे. तुम्हीही यंदाच्या गणेशोत्सवात पारंपारिक उकडीच्या मोदकासोबत काहीतरी वेगळं ट्राय करू शकता.

गणपतीचे अवयवः समतोल आणि अर्थपूर्ण जीवनाचं प्रतिक

Ganeshotsav : आध्यात्मिक मार्गदर्शन, सांस्कृतीक प्रतीक किंवा आनंददायी काहीही म्हणा, गणपती हा कालातीत आणि सार्वत्रिक आहे. विघ्नहर्ता म्हणजेच वाटेतल्या सर्व अडचणी तो दूर करतोच. त्यासोबत तो शिक्षक, कथाकथन करणारा, संरक्षक आणि खोडकरही आहे. गजमुख या पलीकडंही गणपती आपल्याला ‘जीवन कसं जगावं’ याचा मार्ग सांगतो.

घरात कायमस्वरूपी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करताना काय काळजी घ्यावी?

Ganeshotsav : गणपती बाप्पा विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारा, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातो. घराचं रक्षण करण्यासाठी, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी घराच्या, कार्यालयाच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची पद्धत आहे. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची कोणत्या प्रकारची, रंगाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची हे आपण जाणून घेऊयात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ