श्री गणेश प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त

Ganeshotsav : भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01 वाजून 54 मिनिटांनी सुरू होणार आहे. ही तिथी 27 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 44 मिनिटापर्यंत असणार आहे. हिंदू परंपरेनुसार उदयाची तिथी महत्वाची मानली जाते. त्यामुळे यंदाची गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025, बुधवारी साजरी केली जाणार आहे. त्यानुसार, सकाळी 11वाजून 23 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 54 मिनीटे असा 2 तास 31 मिनिटाचा अवधी प्रतिष्ठापनेसाठी योग्य आहे.

महाराष्ट्राच्या ‘राज्योत्सवा’ची जय्यत तयारी सुरू

Ganeshotsav : महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र सरकारने ‘राज्योत्सव’ म्हणून घोषित केलं आहे.  ‘राज्योत्सव’ म्हणून यंदाचा गणेशोत्सवाचं पहिलं वर्ष आहे. राज्य उत्सव म्हणून हा सण साजरा करत असताना सरकारने पारंपरिक पद्धतीने भजन, कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आवाहन केलेलं आहे. डीजे, त्यावर चित्रपटातील, ट्रेंड मध्ये असलेली गाणी लावण्याऐवजी, लोकगीत, धार्मिक गीतं लावण्यावर भर देत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. 

माटोळी

माटवी म्हणजे मंडप. चौकोनी किंवा आयताकृती आकारात ही अशी लाकडी चौकट असते. या चौकटीला भाज्या, फळं बांधायला हल्ली असे हूक्स लावलेले असतात. Matoli साठी लागणारं साहित्य शोधायला एखाद्या वयस्कर स्त्री-पुरुषासोबत मग रानात, गावात जातात. सोबत एखादं झाडं नेमकं कुठं असेल, कंदमुळांचे प्रकार, फळांचे गुणधर्म, मौसमी फुलं, औषधी वनस्पतींचा वापर कसा करावा या सगळ्याचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं हस्तांतरीत होतं.

भगवान शंकर हे पहिले वारकरी!

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण कालौघात या परंपरेत खंड पडला. आज सुरू असणारी वारी आणि पालखी परंपरा 1832 मध्ये हैबतबाबांनी सुरू केली.

विश्वदेवाकडे येणारे रस्ते

Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर अशाप्रकारे पंढरपूरला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या एक कोटीच्या आसपास जाते. इतक्या मोठ्या संख्येने येणारा ‘ वारकरी’ हाच  पंढरपूरचा केंद्रबिंदू आहे हे उघड आहे.

पाण्याची युद्धनीती..!

Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली आहे. पाणी हा मानवी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक. लष्करी डावपेच आखताना शिवकाळात देखील पाणी कसे वापरले गेले हे जाणून घेऊया..

शिवरायांची अद्भुत दुर्गबांधणी..!

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने विचार केला गेला आणि शेकडो गडांची पुनर्बांधणी करताना नवीन निर्मितीही केली गेली. वयाच्या विशीत जेव्हा तरुण मुलं मौज-मजा करत असतात, त्याच वयाचे असताना छत्रपती शिवराय त्यावेळी राजगड तोरण्यासारख्या गडांची अभेद्य बांधकामे करण्यात गुंतले होते. इतकंच नव्हे तर आयुष्याच्या अखेरपर्यंत दुर्गबांधणीकडे शिवरायांचे किती बारकाईने लक्ष होतं हे जाणून घेणं त्यामुळेच महत्वाचे ठरते..!

युद्धभूमीची अचूक निवड करणारे छत्रपती शिवराय..!

Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रणक्षेत्र किंवा युद्धभूमी..! प्राचीन राज्यशास्त्र किंवा चाणक्यनीती या सर्वानी या मुद्दयाचा बारकाईने अभ्यास केला होता आणि त्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले होते. मुस्लिम आक्रमकांशी लढताना अनेक हिंदुस्थानी राजे हे सारे ज्ञान जणू विसरून गेले. राणा प्रताप, आसामचे बडफुकन यांच्यासारख्या मोजक्या राजांनी उत्तम प्रतिकार करून आपले राज्य जरूर राखले. मात्र बलाढ्य शत्रूला आपल्याला योग्य अशा ठिकाणी पराभूत करणे ही गोष्ट सर्वात जास्त अमलात आणली ती छत्रपती शिवरायांनी..!

धर्मांतर आणि शिवरायांचे क्रांतिकारी पाऊल..!

छत्रपती शिवराय: इ. स. 640 नंतर तत्कालीन हिंदुस्थानवर मुस्लिम आक्रमणे सुरू झाली. धर्मविस्तार आणि इथल्या संपत्तीची लूट इतकाच उद्देश घेऊन आलेल्या यातील कित्येकांनी अनन्वित अत्याचार करत विविध भागात आपले बस्तान बसवले. या सगळ्यासमोर अजिबात मान न तुकवता “हिंदवी स्वराज्यासाठी लढा देण्याचा” धगधगता विचार प्रथम दिला तो छत्रपती शिवरायांनी…! इतकेच नव्हे तर जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याचे क्रांतिकारी पाऊल त्यांनी उचलले त्याचीच ही गोष्ट..!

छत्रपती शिवरायांचा भाषाभिमान

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द वापरायला सुरुवात केली. “मर्यादेयं विराजिते..” “लेखन सीमा..” “.. यांचे चरणी दंडवत..” असे सगळे महाराजांच्या काळातील पत्रात दिसून येते.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व्हावा माध्यमांचा वापर

Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे होते.” यामुळेच त्यांनी स्वतः पत्रकारितेत येण्याचा निर्णय घेतला. आपली स्वतःची प्रसारमाध्यमे असायला हवीत असा आग्रह त्यांनी धरला. त्यांचा माध्यमांचा वापर हा जातव्यवस्थेच्या अमानुषतेविरुद्ध आणि बहिष्कृत समाजाच्या हक्कांसाठी एक सशक्त अस्त्र ठरला. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ