भारतीय महिलांना ‘संविधानाची ढाल’ देणारे डॉ आंबेडकर!

‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी संविधानात लिंगभेदापलीकडे जाऊन समान अधिकार दिले आणि एकसमान समाजरचनेसाठी पायाभूत तरतुदी केल्या. स्त्रियांसाठी कायदेशीर तरतूद करताना त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. कुणा एका जातीची म्हणून, कुणा एका पंथाची म्हणून कुणालाही झुकते माप दिले नाही.
सत्तेला वेळोवेळी जनतेने नकार दिला पाहिजे – संविधानिक व्यवस्थेबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणात’राज्यघटनात्मक नीतिमत्ता’ (Constitutional Morality) या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यांच्या मते, राज्यघटनेचा उपयोग केवळ कायद्याचे पालन करण्यासाठी नव्हे, तर समाजातील नैतिक मूल्ये बळकट करण्यासाठीही व्हायला हवा. संविधान हा केवळ कायद्यांचा संग्रह नसून तो न्याय, समानता आणि स्वातंत्र्य यांचे मूर्त स्वरूप आहे.
ज्ञान साधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“शिका, संघर्ष करा, संघटित व्हा” – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं त्रिसूत्री घोषवाक्य आजही तितकंच प्रभावी आणि दिशा दाखवणारं वाटतं. त्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचं साधन मानलं नाही, तर अन्यायाविरोधात लढण्याचं आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचं प्रभावी शस्त्र मानलं. आजच्या काळात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेलं खासगीकरण, जातीवर आधारित भेदभाव आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली डिजिटल दरी लक्षात घेतल्यास – बाबासाहेबांचे विचार नव्याने समजून घेण्याची नितांत गरज आहे.
जातीयतेच्या मुळावर डॉ. आंबेडकरांनी कुऱ्हाड का चालवली?

धर्म आणि सामाजिक ऐक्य यासंबंधीचे डॉ आंबेडकरांचे विचार केवळ वैचारिक चर्चेपुरते मर्यादित नव्हते, तर समाजातील खोल मुळात रुजलेल्या अन्याय आणि विषमतेच्या विरोधात पुकारलेला निर्णायक लढा होता. त्यांच्या लढ्याच्या केंद्रस्थानी अर्थातच ‘मानव’ नावाची जात होती. त्यामुळे धर्मशास्त्रांना, पुराणांना, जातीय गुलामगिरीला भेदणे त्यांच्यासाठी सहजसोपे होते.
तो पातशाही पालथी घालेल…!

वेध शिवकाळाचा: छत्रपती शिवराय किती वेगळा विचार करायचे हे अनेक छोट्या छोटया घटनांमधून इतक्या सुरेखपणे समोर येते की त्यांचे विचार, आचार एका उच्च विचाराने मनाला भारून टाकतात. विविध पत्रे, बखरीतील उल्लेख आपल्याला स्तिमित करतात. अशाच एका प्रसंगी राजे उद्गारले होते… तो तर पातशाही पालथी घालेल….! काय घडले होते त्यावेळी ? हे जाणून घेऊया या लेखात…
सामाजिक समतेचा मूलमंत्र हा शैक्षणिक क्रांतीतूनच – डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विचार

डॉ आंबेडकरांच्या शिक्षणविषयक धोरणांमध्ये समाजहित दडलेले होते. त्यांनी केवळ एका विचारवंताच्या भूमिकेतून त्यांचे विचार मांडले नाहीत तर आपल्या विचारांना कृतिशीलतेची जोड देत मोलाचे शैक्षणिक कार्य देखील केले. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे, असे बाबासाहेबांचे मत होते.
रयतेला मुलाप्रमाणे जपणारे शिवछत्रपती …

वेध शिवकाळाचा : “राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो, त्याने प्रजेची आपल्या पोटच्या मुलासारखी काळजी घ्यावी.. प्रजेचे हित सांभाळणे हेच राजाचे आद्य कर्तव्य आहे” असे आर्य चाणक्य यांनी दोन हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. छत्रपती शिवराय अगदी असेच होते हे त्यांचा इतिहास अभ्यासताना, काळाच्या ओघात टिकून, आपल्यापर्यंत पोचलेली त्यांची पत्रे वाचताना जाणवत राहते. हा लेख अशाच एका पत्राच्या संदर्भाने..
जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती…

वेध शिवकाळाचा : शिवरायांनी आपल्या वयाच्या पंचविशीतच समुद्रावर आपला ताबा मिळवायला सुरुवात केली. कल्याणच्या बंदरात आरमाराची उभारणी केली आणि प्रत्येक मोक्याच्या सागरकिनारी असलेले दुर्ग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. जिथे दुर्ग नव्हते तिथे नव्या जलदुर्गाची उभारणी केली. हे कार्य त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहिले. म्हणूनच शिवरायांच्या शेवटच्या काळातील पश्चिम किनाऱ्यावरील त्यांच्या हालचालीने, एका विशिष्ट युद्धाने प्रत्यक्ष इंग्रजांना कसं हताश केलं याविषयी आज जाणून घेऊया…
नाशिक कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना; 1,100 कोटीच्या निधीची तरतूद

Nashik Kumb Melava : 2027 साली होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभ मेळाव्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने 1,100 कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. त्याशिवाय कुंभ मेळाव्याच्या व्यवस्थापनासाठी कुंभ मेळावा प्राधिकरण कायदा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी 23 मार्च 2025 रोजी केली.
पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे !

वेध शिवकाळाचा : प्रत्येक राजासाठी काही सहकारी हे फार मोलाचे असतात. काही प्रसंगात ते असं काही काम करून जातात की, केवळ राजाच नव्हे तर आपण सारे त्यांचं ऋण आयुष्यभर विसरू शकत नाही. शिवकाळातील असं एक पहाडासारखे व्यक्तिमत्व म्हणजे कान्होजी जेधे..! जाणून घेऊया त्यांच्याबाबत…
पंढरपूरातील लावणीचे अध्यात्म

Chandrabhagechya Tiri : पंढरपूराला वारीची समृद्ध परंपरा आहे. या अध्यात्म केंद्रासह पंढरपूर हे लावणी अभ्यासाचं ही केंद्र आहे. पंढरपुरातील उत्पाद घराण्याने लावणी कलेची सेवा केली आहे. कलेच्या ज्ञानदानाचं कार्य केलं आहे. होळी पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत या लावणीचे पंढरपुरात गायन होते.
एका स्वामिनिष्ठेचा सन्मान…

वेध शिवकाळाचा : माणकोजी दहातोंडे हे बाजी पासलकर यांच्या माघारी स्वराज्याचे सरनौबत बनले तर सोनोपंत महाराजांचे विश्वासू मार्गदर्शक बनले. सोनोपंत हे अत्यंत बुद्धिवान. फार्सी भाषेचे ते जाणकार होते. निजामशाही, आदिलशाही, मोगलाई हे सगळं त्यांनी जवळून पाहिलेलं होतं.