लेबर ऑफिसर ते सह आयुक्त कामगार शिरिन लोखंडे

Breaking Barriers : लेबर ऑफिसर ते सह आयुक्त कामगार हा प्रवास आहे शिरिन लोखंडे यांचा. 34 वर्षांच्या कारकिर्दित बालकामगार प्रतिबंध आणि पुनर्वसन, महिला माथाडी कामगारांकरता सुविधा, गिरणी कामगारांना घरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील साडेतीन हजार कंत्राटी कामगारांना मोठ्या कालावधीनंतर कायम करणे अशा अनेक (मागण्या पूर्ण करुन घेण्यामध्ये) कामांमध्ये शिरिन लोखंडे यांचा पुढाकार आणि सहभाग आहे.
प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करणाऱ्या साहा. निवडणूक आयुक्त आरती सरवदे

Breaking Barriers : 2007 मध्ये मोखाड्याच्या तहसीलदारपदी नियुक्ती झालेल्या आरती सरवदे या पहिल्या महिला तहसीलदार होत्या. या आदिवासी तालुक्यात तहसीलदार खुर्चीत एका महिलेला पाहून लोकं खूप आश्चर्यचकीत होत असत. एका आजीनं बरेच दिवस अडलेलं काम चटकन झाल्यानं पदराच्या गाठीला बांधलेली नाणी ओल्या डोळ्यांनी आरती यांना देऊ केली.
आरदाळची ओळख बदलणाऱ्या पोलीस पाटील मनिषा गुरव

Breaking Barriers : खून, मारामाऱ्यांकरता प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरमधील आरदाळमध्ये 5 वर्षही ‘पुरूष पोलीस पाटील’ टिकेल की नाही, याची खात्री नव्हती. आधीच्या पुरुष पोलीस पाटलानं दबावानं राजीनामा दिला. पण मनिषा गुरव गावात 2012 पासून उत्तमपणे काम करत आहेत. गुन्हा झाल्यावर त्याची वर्दी पोहचवण्याबरोबरच गुन्हे होऊच नये, याकरता त्या गावात गावकरी आणि किशोरवयीनांकरता विशेष कार्यक्रम राबवतात.
भारतीय सैन्यातील पहिल्या मानवरहित हवाई वाहन निरीक्षक

Breaking Barriers : जोधपूरपासून श्रीनगरपर्यंत, प्राजक्ता यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा केली. त्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्कायडायव्हर आणि हॉट एअर बलून पायलट आहेत. मायक्रोलिट विमानं आणि ग्लायडर उडवण्याचाही त्यांना दांडगा अनुभव आहे. 2019 मध्ये प्राजक्ता यांनी इतिहास घडवला. त्या भारतीय सैन्यातील मानवरहित हवाई वाहन (UAV) निरीक्षक पायलट बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.
सर्व सुख विठ्ठला पायी, जाणे अहिल्याबाई

Chandrabhagechya Tiri : आपल्या दानधर्मासाठी, भारतभर अनेक मंदिरांच्या केलेल्या उभारणीसाठी आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना केलेल्या भरीव मदतीसाठी आपण महाराणी अहिल्याबाईंना ओळखतो. त्यांच्या दातृत्वाचं प्रतीक असलेला एक भव्य वाडा पंढरपुरात आपल्याला पाहायला मिळतो.
स्वच्छतादूत सुशीला साबळे

Breaking Barriers : ‘कचरावेचक ते संयुक्त राष्ट्रसंघ, इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या जागतिक हवामान बदल परिषदांमधील वक्त्या’ असा चढता करिअर ग्राफ एखाद्या कचरावेचक महिलेचा असू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणं जरा कठीण आहे ना. पण सुशिला साबळे या मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राउंडवर काम करता करता आपल्या समुदायाचा तर आवाज बनल्याच, सोबत कचरावेचकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्षा म्हणून 2024 मध्ये निवडून आल्या.
‘सारस’ची बहीण वन्यजीव संरक्षक पौर्णिमा देवी

Breaking Barriers : पौर्णिमा देवी बर्मन आसाम इथल्या वन्यजीव संरक्षक आणि सारस पक्ष्याची बहीण म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. जगात दुर्मिळ होत चाललेल्या हार्गिल सारस पक्ष्यांचं संरक्षण करण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवत असल्याबद्दल त्यांना नुकताच टाइम मासिकाच्या ‘टाइम विमेन ऑफ द इयर’ म्हणून गौरवण्यात आलं.
मिठावरील कर आणि शिवशाही…!

वेध शिवकाळाचा : “मिठाचा मामला हा कर्द लाख रुपयांचा मामला आहे..” हे छत्रपती शिवाजीमहाराजांचं वाक्य लक्षात ठेवण्यासारखं. परदेशी वस्तूंच्या आयातीबाबत धोरण ठरवतानाही आपल्या शासनाने कायम याचं अनुकरण करायला हवं. स्वराज्यातील तयार मिठाला जमेल त्या किंमतीला, प्रसंगी नुकसान सोसून विकावे लागे. म्हणून बरेच जण मीठ उत्पादनात पुरेसे लक्ष देत नव्हते. याकडे मग शिवाजीमहाराजांनी लक्ष दिले. आणि एक नवी सूचना दिली.
महाशिवरात्री निमित्त प्रयागराजमध्ये ‘नो व्हेहिकल झोन’

Mahakumbh 2025 : बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान होणार आहे. यानंतर महाकुंभ मेळाव्याची सांगता होणार आहे. बुधवारच्या या शेवटच्या शाही स्नानासाठी जगभरातून अनेक भाविक प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीसह वाहनांचीही गर्दी होऊन चेंगराचेंगरी सारख्या घटना घडू नयेत, व्यवस्थापनांवर तणाव येऊ नये यासाठी महाकुंभ मेळाव्याच्या आयोजकांनी या परिसरामध्ये ‘नो व्हेहिकल झोन’ जाहीर केला आहे.
देवलुटी वारी

Chandrabhagechya Tiri : आपला भक्त हा आर्थिक विवंचनेत आहे हे जाणल्यावर विठूमाऊली आपल्या भक्तासाठी आपलीच वस्त्रे काढते आणि भक्ताला देते. विठूरायाच्या या कृतीला पुढे ‘देवलुटी’ म्हणून संबोधलं जातं. आजही वैशाखात होणाऱ्या या वारीला ‘देवलुटी वारी; म्हणून संबोधलं जातं.
शिवाजी महाराजांचे अखेरचे पत्र!

वेध शिवकाळाचा : शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासून लिहिलेली अनेक पत्रे इतिहास संशोधकांनी मोठ्या कष्टाने मिळवली आहेत. त्यातले पहिले पत्र साधारण 1645 मधले. तर त्यांच्या निधनापूर्वी काही दिवस लिहिलेलं एक पत्र शेवटचं ठरलं. लहानशा आयुष्यात हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी राजांनी जी अथक धावपळ केली ती अखेरपर्यंत सुरु राहिली.
सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागतं

Chandrabhagechya Tiri : असं म्हणतात की जगातलं पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीनं कृष्णाला सात श्लोकांमध्ये लिहून पाठवलं. वसंत पंचमीचा दिवस संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. पंढरपुरात वसंत पंचमीला पांडुरंग आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा असतो. पाच दिवस हा विवाहसोहळा चालतो.