महाशिवरात्री निमित्त प्रयागराजमध्ये ‘नो व्हेहिकल झोन’

Mahakumbh 2025 : बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान होणार आहे. यानंतर महाकुंभ मेळाव्याची सांगता होणार आहे. बुधवारच्या या शेवटच्या शाही स्नानासाठी जगभरातून अनेक भाविक प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीसह वाहनांचीही गर्दी होऊन चेंगराचेंगरी सारख्या घटना घडू नयेत,  व्यवस्थापनांवर तणाव येऊ नये यासाठी महाकुंभ मेळाव्याच्या आयोजकांनी या परिसरामध्ये ‘नो व्हेहिकल झोन’ जाहीर केला आहे.  
[gspeech type=button]

बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान होणार आहे. यानंतर महाकुंभ मेळाव्याची सांगता होणार आहे. बुधवारच्या या शेवटच्या शाही स्नानासाठी जगभरातून अनेक भाविक प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या महाकुंभ मेळाव्यामध्ये 63 कोटी भाविकांनी आणि पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती उत्तरप्रदेश सरकारने दिली आहे. 

भाविकांच्या गर्दीसह वाहनांचीही गर्दी होऊन चेंगराचेंगरी सारख्या घटना घडू नयेत,  व्यवस्थापनांवर तणाव येऊ नये यासाठी महाकुंभ मेळाव्याच्या आयोजकांनी या परिसरामध्ये ‘नो व्हेहिकल झोन’ जाहीर केला आहे.  

कधी सुरू होणार ‘नो व्हेहिकल झोन’ 

मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळाव्याच्या परिसरात वाहनं घेऊन येण्यास पूर्ण बंदी घातली आहे.  

मंगळवार संध्याकाळपासून ते बुधवारपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तरी, सर्व भाविकांनी या सुचनेचं पालन करुन सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

नो व्हेहिकल झोनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे.  यामध्ये दूध, भाजीपाला, औषधे, पेट्रोल-डिझेल आणि इमरजन्सी व्हेहिकल्सचा समावेश आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची वाहनं डॉक्टर्स, पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या वाहनांनाही वगळण्यात आलं आहे. 

जवळच्या घाटावरच पवित्र स्नान करा – प्रशासनाच्या सूचना

महाशिवरात्री शाही स्नानाच्या निमित्ताने प्रयागराज प्रशासनाने भाविकांनी विशेष सूचना दिल्या आहेत. चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी भाविकांना त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या घाटावरच स्नान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

दक्षिणी झांसी मार्गावरुन येणाऱ्या भाविकांनी अरैल घाटावर स्नान करावं आणि उत्तर झांसी वरुन येणाऱ्या भाविकांना हरिश्चंद्र आणि जुन्या जीटी घाटावर पवित्र स्नान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

पांडे क्षेत्र मार्गावरुन येणाऱ्या भाविकांना भारद्वाज घाट, नागावासुकी घाट, मोरी घाट, काली घाट, राम घाट आणि हनुमान घाटावर स्नान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शेवटचं शाही स्नान आणि महाकुंभ मेळाव्याची सांगता

बुधवारी महाशिवरात्रीचं शेवटचं शाही स्नान असणार आहे शिवाय महाकुंभ मेळाव्याची सांगता होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक पवित्र संगमावर स्नानासाठी येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने भाविकांना जवळच्या घाटावर स्नान करण्याच्या आणि स्थानिक शिवा मंदिरामध्येच दर्शन घेण्यासाठी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भाविकांच्या गर्दीचा आढावा घेऊनच पोंटून पूलांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय भाविकांनी पवित्र स्नान पूर्ण केल्यावर घाटावर न थांबता आपापल्या राहण्याच्या ठिकाणी परत जावं. 

महाकुंभ मेळाव्याच्या पोलिस प्रशासनाकडून दिलेल्या या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन भाविकांना केलं आहे. 

1 Comment

  • 📁 Email; + 1,612844 BTC. Confirm => https://yandex.com/poll/enter/By66Z3YWQWkK5iqcyPFgjU?hs=0ce1bffe1ce3533d2582addfc169a53e& 📁

    2isgpl

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. 📁 Email; + 1,612844 BTC. Confirm => https://yandex.com/poll/enter/By66Z3YWQWkK5iqcyPFgjU?hs=0ce1bffe1ce3533d2582addfc169a53e& 📁 says:

    2isgpl

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ