गुरु गौरवाची माघी एकादशी

Maghi Ekadashi : पंढरपुरात माघी एकादशीलाही वारी असते याबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. संत तुकारामांना माघ शुद्ध दशमीला त्यांच्या गुरूंकडून अनुग्रह मिळाला. म्हणून या एकादशीला गुरू गौरव एकादशी म्हणतात. यंदा 8 फेब्रुवारीला माघ एकादशी आहे. या वारीला कोकण, कोल्हापूर आणि बेळगावातील वारकरी जास्त येतात.

अंतराळातून टिपले महाकुंभ 2025 चे मनमोहक दृश्य

Mahakumbh 2025 : नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून प्रयागराजचा फोटो घेतला आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदयांचा सहभाग असलेला हा मेळावा रोषणाई मध्ये उजळून निघाला आहे, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटल आहे.

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी! शाही स्नानावर आखाडा परिषदेकडून मर्यादा

Mahakumbh 2025 Stampede : बुधवारी 29 जानेवारीच्या पहाटे प्रयाग संगमावर मौनी अमावस्येनिमित्त भाविकांच्या प्रचंड संख्येमुळं चेंगराचेंगरी झाली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

महाकुंभ 2025 : प्रयागराज विमान तिकीटाचा दर 55 हजार रूपये!

Mahakumbh 2025 : महाकुंभ या धार्मिक मेळाव्यासाठी जगभरातून कोट्यावधी लोक प्रयागराजला एकत्र येत आहेत. या मेळाव्यासाठी विमानातून येणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी तब्बल 55 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

 महाकुंभ 2025 –  आखाड्यातील तीन संप्रदाय कोणते, त्याची वैशिष्ट्य काय आहेत?  

Mahakumbh 2025 : आदी शंकराचार्यांनी  स्थापन केलेल्या चार आखाड्यापासून आज 13 आखाडे स्थापन झाले आहेत.  या 13 आखाड्याचे मूळ तीन संप्रदायात वर्गीकरण होते. पाहुयात हे तीन मुख्य संप्रदाय कोणते आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे.

 महाकुंभ 2025 : अघोरी साधू 

Mahakumbh 2025 : अघोरी! शब्द उच्चारताच आपल्या मनात नकारात्मक भीतीदायक प्रतिमा उभी राहत असेल. पण अघोरी या शब्दाचा अर्थ असा आहे की, कोणत्याही प्रकारची भय-भिती नसणे.

महाकुंभ 2025 : कल्पवास म्हणजे काय? 

Mahakumbh 2025 : कल्प या शब्दाचा अर्थ आहे ‘व्रत’.  या कुंभ मेळाव्यामध्ये आपलं खाणं-पिणं, झोप, विश्रांतीचा वेळ या सगळ्या गोष्टींवर काटेकोर नियंत्रण ठेवत अधिकाधिक वेळ तपस्या, ध्यानसाधना करण्यावर भर दिला जातो. कल्पवास व्रत स्वीकारणारे लोक पवित्र नद्यांतील स्नानासोबत कल्पवास तपस्येच्या मार्गातून आत्मशुद्धी आणि मोक्ष प्राप्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. 

महाकुंभ 2025 : कथा आखाड्यांची

Mahakumbh 2025 : आदीशंकराचार्य यांनी ख्रिस्तपूर्व काळात देशभरातील संन्यासी आणि साधूचं एकत्रिकरण व्हावं, यासाठी महाकुंभ मेळाव्याला सुरुवात केली. केवळ साधूचा सहभाग असलेल्या या कुंभमेळाव्यांना हळूहळू अन्य भाविक सुद्धा उपस्थित राहून सहभागी राहू लागले.

महाकुंभ मेळावा 2025 :  प्रयागराज दर्शन

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्या निमित्ताने देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना प्रयागराजमधली महत्त्वपूर्ण स्थळं पाहता यावी, त्यांची माहिती व्हावी आणि प्रयागराजमधील स्थानिक कलाकसुरीच्या वस्तू पाहता याव्यात यासाठी उत्तरप्रदेश पर्यटन विभागाकडून ‘विशेष प्रयागराज दर्शन’चं आयोजन केलं जातं. 

महाकुंभ 2025 : योग, ध्यानसाधना आणि विशेष फोटोग्राफीचं पर्यटन पॅकेज

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेश पर्यटन खात्याने योग आणि ध्यानसाधना करु इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा विशेष एकदिवसीय सत्र आयोजित केलं आहे.  महाकुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी आणि परिसरात धार्मिक, सकारात्मक उर्जा असलेल्या ठिकाणी योगासने आणि ध्यानसाधना केल्याने अधिक उर्जा मिळते. अशा ठिकाणी या क्षेत्रातल्या चांगल्या प्रभावशाली व्यक्तिंकडून प्रशिक्षण घेण्याची संधी उत्तरप्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने भाविकांना दिली आहे. 

बँकॉकच्या किनाऱ्यावर फडकला महाकुंभ 2025चा झेंडा!

Mahakumbh 2025 : अनामिका शर्मा या पेशाने स्कायडायव्हर असलेल्या उत्तरप्रदेशमधल्या तरुणीने बँकॉकच्या किनाऱ्यावर 13 हजार फूटावर ‘महाकुंभ 2025’ चा झेंडा फडकवला आहे.

महाकुंभ मेळाव्यामधील आखाडा पर्यटन !

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्या निमित्ताने प्रयागराज येथे आलेल्या भाविकांना, पर्यटकांना संन्यासाचं आयुष्य कसं असतं? आखाडे म्हणजे काय?  तिथं काय असतं? याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.  त्यामुळे उत्तरप्रदेश पर्यटन विभागाने महाकुंभ मेळाव्या दरम्यान साधूंच्या जीवनासंबंधित माहिती देणारं विशेष पर्यटन टूरचं आयोजन केलं आहे. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ