महाकुंभ 2025 : नागा साधू

Mahakumbh 2025 : मठांची सुरक्षा आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी आदीशंकराचार्य यांनी आक्रमक, धडाडी अशा साधूंचे सात गट निर्माण केले. पुढे याच योद्धा संन्यासींना ‘नागा साधू’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. 

महाकुंभ मेळाव्यातील उच्चशिक्षित साधू

Mahakumbh 2025 : डॉक्टर, इंजिनियर, पीएचडी असे अनेक उच्चविद्याविभूषित व्यक्ती आध्यात्मिकतेचा आणि शाश्वत जीवनाच्या शोधात संन्यास घेत साधूचं आयुष्य जगतात. आजमितीला विविध आखाड्यात जवळपास 50 टक्के साधू हे उच्चशिक्षित आहेत.

महाकुंभ मेळ्यात अदाणी आणि इस्कॉन मिळून मोफत ‘महाप्रसाद सेवा’ देणार

Mahakumbh 2025 : यंदाच्या महाकुंभ मेळ्यात अदाणी समुहाने इस्कॉनच्या (ISKCON)  सहकार्याने ‘महाप्रसाद सेवा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत चालणार आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगभरातून भाविक महाकुंभ मेळ्यासाठी येत आहेत.

ऐक्याचा महायज्ञ महाकुंभ मेळावा 2025

Mahakumbh 2025 : सर्व हिंदू संत-संन्यांश्यांना एकत्र आणण्यासाठी आदी शंकराचार्यांनी कुंभमेळाव्याची संकल्पना मांडली. ख्रिस्तपूर्व 654 वर्षांपूर्वी या धार्मिक मेळ्याला प्रारंभ झाला. धार्मिक गुरू, पंडित, तपस्वी आणि 13 संत पंथीयांतील (आखाडे) साधूंनी एकत्र येत उत्सव साजरा करावा या विचाराने या उत्सवाला सुरुवात झाली. कुंभमेळ्याचा पहिला लिखित पुरावा भागवत पुराणामध्ये आहे. चिनी प्रवासी झुआनशांग याने राजा हर्षवर्धन याच्या कालावधीत म्हणजे 629-645 मधील कुंभमेळ्याची लिखित नोंद केली आहे.

जो खाईल भोगी, तो होईल निरोगी

Chandrabhagechya Tiri : संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. रुक्मिणीमाता हे लक्ष्मीचे  स्वरूप आहे, असे समजून पंढरपुरात हा सण साजरा होतो.  प्रामुख्याने महिलांचा समजला जाणाऱ्या या सणाचं पारंपारिक स्वरुप जाणून घेऊयात.

महाकुंभ मेळाव्यात भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे लक्झरी कॅम्प

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यामध्ये पर्यटकांची खास व्यवस्था करण्यासाठी भारतीय पर्यटन विकास महामंडळाने दोन लक्झरी कॅम्पची व्यवस्था केली आहे. देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी ही विशेष सुविधा असणार आहे.

तुम्हीसुद्धा महाकुंभाला जाणार? मग या खास गोष्टी तुमच्यासाठी!

Mahakumbh 2025 : हजारो वर्षाची परंपरा असलेल्या या महाकुंभ मेळाव्याला आता आधुनिक टच आला आहे. अलोट गर्दी असलेल्या या महाकुंभ मेळाव्यामध्ये आध्यात्मिक अनुभव घेताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ध्यानात ठेवून महाकुंभ मेळाव्याला भेट द्या.

भारतीय रेल्वेकडून महाकुंभ 2025 साठी डिजिटल तिकीट बुकिंगची नवीन सोय

Mahakumbh 2025 : भारतीय रेल्वेने 2025 महाकुंभमेळ्याच्या तयारीत एक मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रशासनाने डिजिटल तिकीट बुकिंगसाठी एक सोपी आणि वेगळी पद्धत सुरू केली आहे. प्रयागराज रेल्वे बोर्ड महाकुंभात प्रथमच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेट्सवरून  डिजिटल रेल्वे तिकीट काढण्याची  सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

महाकुंभ मेळाव्यातून उत्तरप्रदेशला मिळणार कोट्यावधीचं उत्पन्न

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्याच्या माध्यमातून उत्तरप्रदेश सरकारला तब्बल 2 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न मिळणार आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तरप्रदेश सरकार 7 हजार कोटी रुपयाचा खर्च केला आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 40 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. 

महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय

Mahakumbh 2025 : 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेश सरकार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या उपक्रमामुळे  तीर्थयात्रेकरूंच्या उपस्थितीचे ट्रॅकिंग केलं जाणार आहे. AI कॅमेरे, RFID ब्रेसलेट्स आणि मोबाइल ॲपच्या मदतीने या मेळ्याचं व्यवस्थापन अधिक सोपं आणि सुरक्षित केलं जाईल.

वर्ल्ड टूरिझम ट्रेड मध्ये झळकणार ‘महाकुंभ 2025’

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्याच्या धार्मिक उत्सवाची ख्याती परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार वर्ल्ड टूरिझम ट्रेडमध्ये महाकुंभ मेळाव्याचं प्रदर्शन करणार आहेत.

प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि BARC संस्थाही सज्ज!

Mahakumbh 2025 : महाकुंभ 2025 मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था जवळपास 10 हजार एकर जागेवर करण्यात आली आहे. या सर्व परिसरात स्वच्छता राखण्याचं मोठं आव्हान प्रयागराज कुंभमेळा आयोजकांसमोर आहे. या 45 दिवसाच्या महाकुंभ मेळाव्यात परिसरातील कचऱ्याची व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी इस्त्रो आणि BARC संस्था कार्यरत असणार आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ