18 ते 30 वयोगटासाठी आहार

Navratri Diet Plan : वयाच्या 18-19 वर्षांपासून सुरु होणारा काळ स्त्रीच्या आयुष्यात वेगळी आव्हानं घेऊन येतो. उच्च शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे राहणे, लग्न,जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये आयुष्याला अचानक इतकी गती येते की आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होते. अतिरिक्त वजन वाढ, थायरॉईड ग्रंथींशी संबंधित आजार, मासिक पाळी अनियमित होणे किंवा पीसीओडी सारखे आजार, रक्तात लोहाचे प्रमाण कमी होणे म्हणजे ऍनिमिया हे विकार या वयातील मुलींमध्ये दिसून येतात.

किशोरावस्था आणि ‘इटिंग डिसऑर्डर’

Navratri Diet Plan : किशोरवयीन मुली किंवा नुकत्याच किशोरवयातून बाहेर येत असलेल्या मुलींमध्ये एक मनोविकार दिसून येतो. हा मनोविकार खाण्यापिण्यासंबंधीचा विकार म्हणजे ‘ईटिंग डिसऑर्डर’ असतो. या विकाराचे प्रमाण भारतामध्ये सध्या वाढत आहे. त्यातही विशेषतः मुलींचे प्रमाण जास्त आहे. या विकाराने ग्रस्त मुली, आपलं वजन आणि बॉडी इमेज याबाबतीत खूप जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अनियमित होतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

समाधानाच्या ‘इलेक्ट्रिक’ तारा

Breaking Barriers : “माझ्या काळजाचा तुकडा आज तिच्या पायावर उभा आहे. माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरचं हसू माझ्याकरता खूप महत्त्वाचं आहे. तिची कमाई सर्व तिच्या नावावरच बचत करतो”, मुस्कानचे आब्बा त्यांच्या इलेक्ट्रिशियन लेकीबद्दल खूप समाधानानं बोलत होते. शेतकरी असणारे गणेश चव्हाण सांगतात, “मुलींनी डेअरींग केलं पाहिजे. पायल तिचा खर्च भागवते आणि बचतही करते”.

किशोरावस्था : आहार आणि हार्मोन्सचे संतुलन 

Navratri Diet Plan : किशोरावस्था हा मानवाच्या संपूर्ण वाढीतील सर्वात सुंदर आणि आव्हानात्मक काळ असतो. या वयात मुलींची वाढ अतिशय वेगाने होत असते. एका लहान मुलीचं संक्रमण हळूहळू एका पूर्ण वाढ झालेल्या स्त्री मध्ये होत असते. त्यासाठी शरीरात स्रवत असलेल्या इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोन्समुळे मुलीच्या शरीरातच नाही तर, तिच्या मानसिक आरोग्यात आणि सामाजिक वर्तणुकीतही आमूलाग्र बदल होतात. 

प्लम्बिंग लाईन जोडणाऱ्या मुली

Breaking barriers : प्लंम्बिंगवरचा ‘पुरुषी व्यवसाय’ म्हणून मारलेला शिक्का पुसून त्याचे रीतसर प्रशिक्षण खेडेगावातील मुली घेत आहेत. घरच्यांचा विरोध पाठिंब्यात बदलून प्लबिंग व्यवसायात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या मुली नवरात्र विशेष ‘सीमोल्लंघन’ मध्ये

अल्लड कुमारिकांचा आहार-विहार  

Navratri Diet Plan : आपल्या आजूबाजूच्या महिला अष्टभुजा बनून घर, मुलं, काम, प्रवास इत्यादी जबाबदाऱ्या लीलया पार पाडतात. पण हे करताना माहीत असूनही त्यांचं स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष होतं. नवरात्रीच्या निमित्ताने वयात येणाऱ्या मुलींपासून ते प्रौढ स्त्रियांपर्यंत सर्व महिलांनी आहाराच्या माध्यमातून आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी विशेष लेखमाला घेऊन आलो आहोत ‘वसा आहाराचा’. आणि हा वसा अजिबात टाकून द्यायचा नाहीये. 

लोकमान्यांच्या ठाण्यातील भाषणानंतर सुरू झालेलं गणेशोत्सव मंडळ

ठाण्यातल्या प्रसिद्ध तलावपाळीपासून आणि गडकरी रंगायतनपासून  जवळ चरईमध्ये लोकमान्य आळी आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) इथं आले असताना त्यांनी केलेल्या स्फूर्तिदायी भाषणातून  प्रेरणा घेऊन सन 1920 मध्ये इथल्या रहिवाशांनी टिळकांच्या संकल्पनेतला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश गोविंद आठवले, विश्वनाथ लक्ष्मण जोशी, दत्तात्रय प्रभाकर रहाळकर आणि रामचंद्र महादेव गाडगीळ हे या उत्सवाचे आद्यप्रवर्तक. 

वाघवीरामधील मातीच्या गणपतींचा डंका सातासमुद्रापार!

रायगडमधील पेणसोबतच गेल्या काही वर्षांपासून वाघवीरा (waghawira) हे गावंही गणपती मूर्तींसाठी ओळखलं जाऊ लागलं आहे. गेली चार दशके प्रदीप चिंतामण ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर हे या गावात गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार करतात.  त्यांच्या या कलेमुळे वाघवीरा गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही पोहोचले आहे.

हिंदू – मुस्लिम वादाची साक्ष आणि ऐक्याचं प्रतीक धुळ्यातील ‘खुनी गणपती’

नाव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे! धुळ्यातील या खुनी गणपतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी महापूजा खुनी मशिदीजवळ होते.    पण या खुनी नावांची भानगड नेमकी काय? 1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यावेळी श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक साधारण एक हजार वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळच्या नमाजाच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीला थांबवण्याकरता ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले,अनेक जखमी झाले.  स्थानिक आहिराणी भाषेत “त्या मशिदीजवळ खून पडनात”, “खून नी मसिद”, गणपतीना वकतले तथा खून

गणपतीचे मुख वडगाव कशिंबेगला आणि शरीर लेण्यांद्रीत!

पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वडगाव कशिंबेग इथं गणपतीचं फक्त मुख असणारे गणपती मंदिर आहे. अशाप्रकारे स्वयंभू मूर्ती असणारं भारतातलं हे एकमेव देवस्थान आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ