खान्देशातील दिवाळी

Khandeshi Diwali : ठिकठिकाणी दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे दिवाळीतल्या प्रथा, परंपरांमध्ये थोडासा का होईना फरक आढळतोच. खान्देश किंवा उत्तर महाराष्ट्रातही दिवाळी उत्साहात साजरी केली जात असली तरी, खान्देशाची खरी दिवाळी म्हणजे ‘आखाजी’ अर्थात अक्षय्यतृतीया. 

विविध देशांमधील दिवाळी

Diwali celebration: दिवाळी सण हा फक्त भारताचाच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो आणि काही देशांमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी आहे.

बौद्ध आणि जैन धर्मांतील लक्ष्मी

Lakshmi in jain and buddhist tradition : संपत्तीची आणि सौभाग्याची देवता लक्ष्मी, हिंदू धर्मातील महत्वाची देवता आहे. जीवनाच्या अतिशय महत्वाच्या दोन पैलूंशी निगडीत असल्याने स्वाभाविकच इतर धर्मांमध्येही तिचा स्वीकार केला गेला. बौध्द धर्मात भरहुत, उदयगिरी, सांची येथे लक्ष्मीची शिल्पे द्वारे आणि रेलिंगवर आहेत. तर जैन परंपरेतही श्री आणि लक्ष्मी ग्रंथांमध्ये आणि जैन धार्मिक स्थळांवर दिसून येतात.

नात्यांचा दीपोत्सव!  

थंडीचे दिवस, दाराबाहेर रांगोळी, स्वयंपाकघरातून येणारे विविध सुगंध, हास्यविनोद, बडबड, नवीन कपडे घालायची आणि फटाके उडवायची घाई, आवडत्या मावशी, काका, मामा, आत्या यांच्याकडून मिळालेलं आवडतं गिफ्ट…घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं…एरवीचा नात्यांचा ताण, हेवेदावे सगळं काही विसरुन चेहऱ्यावर हास्य फुलवणारी दिपावली. नात्याचा उत्सव आपल्यापैकी अनेकांची दिवाळी ही अशीच आपल्या मावशा-मामा-आत्या-काका, भावंडांसोबत एकत्र गेली असेल. कितीतरी जणांकडे तर पाडव्याचं जेवण एकाकडे, भाऊबीजेला कुणाकडे जायचं हे वर्षानुवर्षे अगदी ठरलेलं असायचं. दिवाळीचे चार दिवस संपल्यावरही अगदी सुट्टी संपेपर्यंत ही दिवाळी सुरुच असायची. मामाच्या गावाला जाणं किंवा सगळेजण मिळून कुठेतरी ट्रिपला जाणं… किंवा काहीच नसेल तर कुणाकडे तरी राहायला जाणं…वर्षभर या सगळ्याची वाट पाहिली जायची. सणांच्या

लक्ष्मी आणि घुबड!

Goddes Lakshmi : संस्कृत साहित्यात लक्ष्मीला उद्देशून पद्मासना, अश्वरूढा, गरूडवाहिनी, खगवाहिनी अशी विशेषणे आहेत. ती कमळावर बसलेली दाखवली जाते. याचमुळे तिची पद्मा किंवा कमला अशी इतर नावे प्रसिध्द आहेत. श्रीसूक्तात तिला अश्वारूढा म्हणजेच ‘घोड्यांवर बसलेली’ असे म्हटले आहे. क्वचित विष्णुसोबत तिला गरुडवाहिनी असेही म्हटले जाते.

कोल्हापूरचा शाही दसरा

Dasshera : महाराणी ताराराणी यांनी शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे संरक्षण केले. 1709 च्या सुमारास त्यांनी स्वराज्याची राजधानी पन्हाळगडावर स्थापन केली. त्यामुळं 1788 पर्यंत दसरा पन्हाळगडावर साजरा होत असे. नंतर स्वराज्याची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात हलवली गेली  आणि कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा होऊ लागला.

रजोनिवृत्तीनंतरचा काळ 

Navratri Diet Plan : रजोनिवृत्ती झाली म्हणजे सगळं झालं, आता कसली काळजी असं नसतं. त्यामुळंच आपण स्त्रियांचा रजोनिवृत्तीनंतरचा काळ आणि म्हातारपणी घ्यायची काळजी ह्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

गार्गी, मैत्रेयीला शाळेत जायला ‘वहिवाट’ मोकळी मिळेल का?

Breaking Barriers : घराला आणि मुख्य रस्त्याला जोडणारी एका शेताशेजारील वहिवाट अडवल्यामुळं, गार्गी आणि मैत्रेयीला शाळेत जाता येत नाहीये. बांधातून, पाणथळ जमीनीतून मोठ्या गवतातून मुख्य रस्त्याकडे पायी जावं लागतं. शेकडो वर्षांची वहिवाट ग्रामस्थांना वापरू न देण्याबद्दल ग्रामपंचायतीनं सामंजस्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांकडे प्रकरणाचा निकाल गावकऱ्यांच्या बाजूनं लागला. प्रांत तसेच दिवाणी आणि सत्र न्यायालयातही वहिवाट मोकळी करून द्यावी असे गावकऱ्यांच्या बाजूनंच निर्णय लागले आहेत. पण तरीही या निकालांना न जुमानता ही वहिवाट अडवणं सुरूच आहेत.

रजोनिवृत्तीचा  पूर्वकाळ

Navratri Diet Plan : एखाद्या स्त्रीला जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा ती रजोनिवृत्त झाली असं म्हटलं जातं. रजोनिवृत्ती ही अचानक होणारी घटना नसून, याची सुरुवात 4-5 वर्षे तर कधी 10 वर्षे आधी झालेली असते. पहिल्यांदा रजोनिवृत्तीचे लक्षण दिसल्यापासून खरोखर रजोनिवृत्ती होईपर्यंतच्या काळाला Perimenopausal Period किंवा ‘रजोनिवृत्तीचा  पूर्वकाळ’ असे म्हटले जाते.

प्रेग्नन्सी डाएट

Navratri Diet Plan : ‘प्रेग्नन्सी डाएट’ असं जेव्हा जेव्हा आम्ही आहारतज्ञ म्हणतो, तेव्हा बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावतात. गरोदरपणामध्ये पण डाएट करायचं ? अशीही विचारणा होते. पण मुळात डाएट किंवा आहारपद्धती म्हणजे आपण जे दिवसभरात खातो ते. जसे प्रत्येकाच्या वयानुसार, कामाच्या प्रकारानुसार वेगवेगळा आहार असतो, तसाच गरोदरपणामध्ये आईचे आरोग्य चांगले राहावे आणि बाळाची वाढ उत्तम व्हावी यासाठी एक आहारपद्धती अनुसरण्याची आवश्यकता आहे.

गर्भधारणेची पूर्वतयारी

Navratri Diet Plan : लग्न झाल्यावर काही वर्षात स्त्री ला खुणावू लागते ते मातृत्व. अर्थात हा निर्णय पूर्णपणे स्वतः त्या स्त्रीचा, तिच्या जोडीदाराचा असावा. गर्भधारणेचा स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. या काळात होणाऱ्या असंख्य बदलांना सामोरे जाण्यासाठी ती शरीराने आणि मनाने तयार व्हावी यासाठी गर्भधारणेची पूर्वतयारी करायला हवी.

गोणीचे शिवणकाम ते महिंद्रामध्ये वेल्डर

Breaking Barriers : प्रथमच्या वेल्डिंग उपक्रमाची सुरवात 2015 साली महाराष्ट्रातील लातूर मधील किल्लारी प्रशिक्षण केंद्रापासून झाली. वेल्डिंगमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत 5200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ