विमान प्रवास होणार जास्त सुलभ; बोर्डिंग पास आणि चेक-इन सेवा बंद होणार ?

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

अंतराळातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नासाची 3 अब्ज डॉलरची ऑफर

Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या मानवी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं तंत्र अजूनही विकसीत झालेलं नाही आहे. त्यामुळे तब्बल 50 वर्षापूर्वी चंद्रावर मानवी विष्ठेसारख्या कचऱ्याच्या ज्या पिशव्या टाकून ठेवलेल्या त्या अजूनही त्याच स्थितीत आहेत. अंतराळात मानवी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी विशेष तंत्र विकसीत करण्याचं आवाहन नासाने जगातील सर्व लोकांना दिलं आहे. 

साडेबारा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला लांडगा पुन्हा जिवंत!

Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf)  आता पुन्हा जिवंत झाला असल्याचा दावा अमेरिकेतील ‘Colossal Biosciences’ या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केला आहे. या प्राण्याला ‘अतिशय हिंस्र लांडगा’ असे म्हणतात.

नव्या टेरिफला ट्रम्प यांची 90 दिवसांची स्थगिती!

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली नेहमीची धक्के देण्याची सवय सुरूच ठेवली आहे. टेरिफ पॉलिसीनंतर मार्केटमध्ये भूकंप येत असताना ट्रम्प अमेरिकन नागरिकांना ‘बी कूल’ राहायचा सल्ला देत होते. आणि आता अचानक 9 एप्रिलला त्यांनी नव्या टेरिफ पॉलिसीला 90 दिवसांकरता स्थगिती दिली आहे. पण यातून चीनला सूट मिळणार नाहीये.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम; अमेरिकेसह आशियाई बाजारातही तेजी

Tarrif: डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की चीन वगळता 75 देशांवरील वाढीव आयात शुल्क 90 दिवसांसाठी थांबवण्यात येणार आहे. मात्र चीनवर याचा उलट परिणाम झाला असून त्यांच्यावरील शुल्क 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

‘कॅप्चा’ : इंटरनेटवरील धोक्यांपासून वाचवणारा ‘सुरक्षा कवच’!

CAPTCHA : ‘कॅप्चा’ हे इंटरनेट सुरक्षा वाढवण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे साधन आहे. हे एक स्वयंचलित ‘ट्युरिंग टेस्ट’ (Turing Test) आहे. ज्याद्वारे हे तपासले जाते की वेबसाईट वापरणारा माणूस आहे की कॉम्प्युटर प्रोग्राम (बॉट).

ChatGPT बनवत आहे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड: सावध राहा!

ChatGPT: आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांच्या महत्त्वाच्या ओळखपत्रांमध्ये येतात. पण काही लोक ChatGPT च्या मदतीने या ओळखपत्राची बनावट कॉपी बनवत आहेत. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवा धोका निर्माण झाला आहे.

अमेरिका टेरिफचा भारतीय कापड उद्योग क्षेत्रावर काय परिणाम होणार?

America Teriff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मुक्ती दिन’ कार्यक्रमात जगभरातील सर्व देशांवर लादलेल्या टेरिफना  जाहीर केले. सामान्यत: सगळ्यात देशामध्ये आयात – निर्यात शुल्क आकारलं जातं. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यापासूनच टेरिफचा मुद्दा खूप गाजवला आहे. जाणून घेऊयात भारतावर आकारलेल्या 26 टक्के टेरिफचा भारताच्या कापड उद्योगावर काय व कसा परिणाम होणार आहे.

मनुष्यवस्ती नसलेल्या बेटावर अमेरिकेने लादले 10 टक्के टेरिफ!

Tariff on Heard and Macdonald Island : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुक्ती दिना निमित्त जगभरातील सर्वच छोट्या – मोठ्या देशांवर व्यापारासंबंधित टेरिफ जाहीर केले. उत्पादन क्षमता वाढवणे या उद्देशासह, आतापर्यंत जगातल्या सर्व मित्र आणि शत्रू राष्ट्रांनी अमेरिकेला लूटलं आहे असं वक्तव्य करत डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ जाहीर केले.

अमेरिकेचा नवा आयात कर ; भारतावर 26% कर लागू

Donald Trump : 5 एप्रिलपासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर 10% कर लागू होणार आहे. तसेच, ज्या देशांशी अमेरिकेचा व्यापार तोट्यात आहे, त्यांच्यावर 9 एप्रिलपासून 50% पर्यंत कर वाढवला जाणार आहे. याचा परिणाम 180 हून अधिक देशांवर होणार आहे. भारतालाही यातून वगळण्यात आलेलं नाही.

महिला स्वतःच टोचून घेऊ शकतील अशा गर्भनिरोधक इंजेक्शनचा शोध!

contraceptive injection : अमेरिकेतील एमआयटी (MIT) आणि Mass General Brigham येथील शास्त्रज्ञांनी एक नवे DIY गर्भनिरोधक इंजेक्शन विकसित केले आहे. हे इंजेक्शन एकदा घेतल्यास दीर्घकालीन गर्भनिरोधक संरक्षण मिळू शकते.

चीनने विकसीत केले खोल समुद्रात केबल कापण्याचे उपकरण!

China deep sea cables cutting device – चीनने अलिकडेच खोल समुद्रातील केबल कापण्यासाठी विशेष असं शस्त्र विकसीत केलं आहे. या शस्त्राने खोल समुद्रातून गेलेल्या संरक्षण आवरण असलेल्या संवादाच्या आणि वीजेच्या केबल्स (तारा) कापता येऊ शकतात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ