काय आहे नेमकं स्टुडिओ घिबली?

Ghibli Art : एआय चॅटबोट चॅटजीपीटीने 25 मार्च 2025 रोजी जीपीटी 40 मॉडेल विकसीत केलं. या मॉडेलमध्ये एआयच्या मदतीने घिबली या ॲनिमेशन पद्धतीसारखे फोटो तयार करता येतात. या अपडेटेड व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांना अचूक, तंतोतंत फोटो मिळतो. हे नवीन फीचर येताच अनेक वापरकर्त्यांनी आपले फोटो या घिबली पद्धतीने बदलून घेत या फीचरचा आनंद घेतला आहे.
इजिप्तच्या गिझा पिरॅमिड खाली लपलंय ‘गूढ शहर’! संशोधकांचा दावा

Giza pyramids : इजिप्तमधील गिझा पिरॅमिडच्या खाली एक मोठं भूमिगत शहर असल्याचा दावा इटली आणि स्कॉटलंडच्या संशोधकांनी केला आहे. त्यांनी नवीन रडार तंत्रज्ञानाचा वापर करून हे संशोधन केल्याचं सांगितलं आहे.
चॅट जीपीटीच्या सततच्या वापराने माणूस एकलकोंडा बनतो

Chat GPT Usage : काही वर्षांपासून आपल्याला काहीही अडलं की लगेच आपण गुगलवर सर्च करायचो आणि माहिती मिळवायचो. त्यामुळे सगळंच काही लक्षात ठेवलंच पाहिजे असं काही नव्हतं. आता त्याची जागा एआय तंत्रज्ञानाने घेतली आहे. ऑफिसमध्ये काम करताना, अभ्यास करताना कुठे काही अडलं की लगेच चॅट जीपीटी, डीपसीक, जेमिनी, कोपायलट आणि ग्रोक यासारखे एआय ॲपवर जाऊन आपण तयार उत्तर मिळवतो. मात्र या ॲपच्या सततच्या वापरामुळे माणूस एकलकोंडा बनतो, असं खुद्द ओपन एआयने केलेल्या संशोधनातूनच स्पष्ट झालं आहे.
युरोपमध्ये स्थायिक व्हायचंय? पोर्तुगालचा ‘गोल्डन व्हिसा’ सर्वोत्तम पर्याय!

UAE Golden visa : युरोपमध्ये स्थायिक होण्याची इच्छा असलेल्या गुंतवणुकदारांसाठी पोर्तुगालचा ‘गोल्डन व्हिसा’ हा उत्तम पर्याय ठरत आहे. आकर्षक समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि युरोपियन रेसिडेन्सी यामुळे पोर्तुगालकडे परदेशी नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांवर ‘सिग्नल’ ॲपचा वापर करून येमेन युद्धाची माहिती ‘लीक’ केल्याचा आरोप!

Yemen War Plan : येमेनमधील हुती बंडखोरांवर अचानक हल्ला करण्याच्या योजना आखण्यात आल्या होत्या. या गुप्त योजनांची माहिती एक एन्क्रिप्टेड मॅसेजिंग ॲपवर अमेरिकेतील लष्करी अधिकारी, गुप्तहेर एजन्सीचे कर्मचारी, तसेच ट्रम्प प्रशासनातील अधिकारी एका चॅट ग्रुपमध्ये शेअर करत होते.
परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी स्थानिक कायद्यांचे पालन करणे गरजेचं !

America : अमेरिकेत शिकणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, काहींचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तर काहींना देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत म्हटले की, भारतीय विद्यार्थ्यांनी स्थानिक कायद्यांचे पालन करणे गरजेचं आहे.
तिबेट पठार चीनचं धान्य कोठार होणार का?

Farming on Tibet Plateau : भविष्यकाळामध्ये हवामान बदलांच्या परिणामामुळे जगभरात अन्नधान्याचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे तिबेट पठारावर शेती विकसीत करण्याचा विचार चीनच्या शास्त्रज्ञानी मांडला आहे. मात्र पठारावर मानवी हस्तक्षेप वाढू लागला तर या पठारावरची जैवविविधता आणि परिसंस्था धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मागील 10 वर्षे ही पृथ्वीवरची सर्वाधिक उष्ण वर्षे!

warmest year : या वर्षी पृथ्वीवरचं तापमान औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तापमानापेक्षा जवळपास 1.6°C नी जास्त होतं. जागतिक हवामान संस्थेच्या (WMO) 2024 अहवालानुसार मागची दहा वर्षे ही आतापर्यंतची सगळ्यात उष्ण वर्षे होती.
एलॉन मस्कच्या ‘एक्स’ ने भारतातील सेन्सॉरशिप यंत्रणेविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात केला खटला दाखल

X Sues Indian Govt: एलॉन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ ने भारत सरकारच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. भारत सरकार कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून एक अनियंत्रित सेन्सॉरशिप प्रणाली तयार करत आहे, असा ‘एक्स’ चा आरोप आहे.
कर्मचाऱ्यांच्या थकव्यामुळे कंपनीचं कोट्यावधीचं नुकसान

Work Burnout : कार्यालयातील ताणतणाव, कामाचा व्याप या सगळ्या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘बर्नआऊट’ ही संकल्पना उदयास आली आहे. कामाच्या थकव्यामुळे काम करण्याची इच्छा कमी होते, नैराश्य, अस्वस्थतेसह हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. कर्मचाऱ्यांच्या या वैयक्तिक नुकसानीसह कंपनीचंही कोट्यावधीचं नुकसान होतं हे संशोधनाअंती स्पष्ट झालं आहे.
तब्बल 9 महिन्यानंतर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर पृथ्वीवर परतले! पृथ्वीवर येताच त्यांना करावा लागणार अडचणींचा सामना

Sunita Williams & Barry Wilmore : नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर हे तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. अंतराळात कमी गुरुत्वाकर्षण असल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांच्या शरिरामध्ये नानाविध बदल झाल्याची शक्यता आहे. या बदलांमुळे त्यांना पृथ्वीवर पायावर उभं राहताना सुद्धा अडचणी येऊ शकतात. यासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
वाईन व्यवसायातही एआयचा शिरकाव

AI Wineyards : पाश्चिमात्य देशात अगदी कृषी क्षेत्रातही एआय तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा वापर केला जात आहे. द्राक्षमळ्यामध्ये एआय आधारित ट्रॅक्टर वापरापासून वाईन व्यवसायात लेबल डिझाइनिंग अशा सगळ्या कामांमध्ये एआयचा वापर केला जात आहे. एआयच्या या वापरामुळे कर्मचाऱ्यांना काढून न टाकता त्यांची कार्यक्षमता वाढवली जात आहे.