YEAR  2024 : महत्त्वाच्या नेत्यांवर झालेले हल्ले

Year 2024 : 2024 हे वर्षही युद्ध, हत्या, संघर्ष या घडामोडींनी भरलेलं होतं. 2023 पासून सुरू झालेले रशिया - युक्रेन युद्ध असो वा इस्त्रायल हमास दरम्यानचं युद्ध असो ही दोन्ही युद्ध थांबली नाहीत. या संपूर्ण वर्षात जगात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला घडल्याची घटना घडली नाही. पण या दोन युद्धात संबंधित देशांची आणि या देशांच्या शेजारील राष्ट्रांची अपरिमीत हानी झाली हे वास्तव आहे. या वर्षी जगाच्या पटलावर दोन महत्वाच्या घटना घडल्या. त्या म्हणजे, दोन जागतिक नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न. 
[gspeech type=button]

2024 हे वर्षही युद्ध, हत्या, संघर्ष या घडामोडींनी भरलेलं होतं. 2023 पासून सुरू झालेले रशिया – युक्रेन युद्ध असो वा इस्त्रायल हमास दरम्यानचं युद्ध असो ही दोन्ही युद्ध थांबली नाहीत. या संपूर्ण वर्षात जगात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला घडल्याची घटना घडली नाही. पण या दोन युद्धात संबंधित देशांची आणि या देशांच्या शेजारील राष्ट्रांची अपरिमीत हानी झाली हे वास्तव आहे. 

या वर्षी जगाच्या पटलावर दोन महत्वाच्या घटना घडल्या. त्या म्हणजे, दोन जागतिक नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न. 

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पहिला हल्ला

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन वेळा हल्ला झाला. पहिल्यांदा 13 जुलै 2024 रोजी पेनेनस्लेविया इथे भाषण करताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करुन गेली. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. मात्र, एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. 

या हल्ल्यातील हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रूक्स या 20 वर्षीय तरुणावर तो पळून जात असताना सुरक्षकांनी जागेवरच गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाला.

डोनाल्ड ट्रम्प – दुसरा हल्ला 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडामध्ये 15 सप्टेंबरला दुसरा हल्ला झाला. ट्रम्प हे त्यांच्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब मध्ये असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात हल्लेखोर रायन रुथ या 58 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. 

रायन रूथ या हल्लेखोराने महिन्याभरापूर्वी ‘द वर्ल्ड’ या नावाने एक पत्र लिहीलं होतं. या पत्राच्या माध्यमातून त्याने ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या हल्ल्यापूर्वी रायन रुथ याने दोन प्रकरणांमध्ये  20 वर्ष शिक्षा भोगली आहे.  

स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर आत्मघाती हल्ला

स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर मे 15, 2024 रोजी आत्मघातकी हल्ला झाला. सेंट्रल स्लोवाक इथे पब्लिक रॅलीमध्ये लोकांना भेटत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोराने फिको यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून ते बचावले. मात्र ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तीन तास  सर्जरी करण्यात आली.  या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

या घटनेत 71 वर्षीय जुराज चिंनटुला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. जुराज हे राजकीय कार्यकर्ते आणि लेखक आहेत.  स्लोवाकियामधील तत्कालीन राजकीय परिस्थितीचा निषेध म्हणून जुराज यांनी थेट पंतप्रधानांवर हल्ला केल्याचं म्हटलं जातं. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India - America : पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्विकारली नाही आणि यापुढेही
Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ