ऑनलाइन जगातील आर्थिक फसवणूक

ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) टाळण्यासाठी जागरूकता, सतर्कता, आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर महत्त्वाचा. आर्थिक फसवणूक कुणाही बरोबर होऊ शकते. त्यामुळे घरातल्या एखाद्या सदस्याला असा अनुभव आल्यास, कुटुंबाने त्याला घालून पाडून बोलण्यापेक्षा मदत करणे आणि पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. फसवणूक होण्याआधीच सुरक्षा उपाय योजणे, काय होऊ शकते याविषयी जागरूक असणे आणि त्याचबरोबर फसवणूक झाल्यास योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
Mpox – लंबी रेस का घोडा

MPox चा मृत्यूदर विषाणूच्या प्रकारानुसार 1 ते 10% पर्यंत असू शकतो. Public Health Emergency of International Concern (PHEIC) म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती. Mpox च्या विषाणूला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला बाधित करण्याची क्षमता प्राप्त होणे आणि अनियंत्रितपणे आफ्रिकेच्या विविध देशांमध्ये याचा प्रसार होणे ही घटना एक इमर्जन्सी समजली आहे.
पीएमटी ते फोर्ड फिगो – प्रवास ‘मीरानी’ चा!

घडलेल्या गोष्टी न आठवता, कष्ट करा, यश मिळेल. झाडाच्या फांद्यांवरून लाल मुंग्या येऊन बाळाला चावतायत आणि आई शेतात मजुरी करतेय. बाळाचं रडणं ऐकूनही मालकानं सोडल्याशिवाय ती काही येऊ शकत नाही. आई येईपर्यंत मुंग्यांनी बाळाचे चावे घेतलेले असतात. हेच बाळ पुढे मोठ्ठं होतं, कष्टाला घाबरायचं नाही हे आईने शिकवलेलं असतंच.आज ते पाळण्यातलं बाळ पुण्यातली सर्वोत्तम घरपोच ‘होम पार्लर’ सर्व्हिस देणाऱ्या ‘मीरानी’ ब्युटीसर्व्हिसची मालकीण आहे.
‘वारकरी’ कूट

कूट पक्ष्यांला मराठीमध्ये ‘वारकरी’ असे म्हणतात. कूट (Coot) हा खरा तर बदकासारखा दिसत असला तरी पण तो ‘रेल’ आणि ‘क्रेक’ यांच्या कुळातला आहे. हे रेल आणि क्रेक अतिशय लाजाळू, सहसा उघड्यावर न दिसणारे असतात. ते वावरतानासुद्धा एकेकटे किंवा जोडीने वावरतात. मात्र याच्या अगदी उलट हे कूट आहेत. हे विणीच्या हंगामाव्यतिरिक्त कायम मोठया संख्येने एकत्र असतात. त्यांचा वावरसुद्दा अगदी उघड्यावर कायम असतो.
पुराणाकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहणारे संशोधक डॉ. ओक

रामायण, महाभारत ही आपल्यासाठी केवळ पुस्तकं नाहीत. अनेकांसाठी ती श्रध्दास्थानं आहेत. रामायण किती वर्षांपूर्वी घडलं, रामाला वनवास 12 वर्षांचाच का झाला, महाभारताचं युध्द नेमकं कधी सुरु झालं, ते कधी संपलं, श्रीकृष्णाची द्वारका कशी बुडाली, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याची उत्तरं अनेक ठिकाणी सापडतीलही. पण इतिहास किंवा पुराणातील प्रश्नांसाठी दाखले आवश्यक असतात. राम-कृष्णाच्या कथांबाबत तर्कशुध्द मांडणी करणं हे निलेश ओक यांचं वैशिष्ट्य आहे.
शाश्वत शेतीचा प्रवास : ‘पर्माकल्चर’

निसर्ग तर पुन्हा बहरेल पण त्यात माणूस कदाचित नसेल. माणसांची संख्या वाढत चाललीय. त्याचवेळी मानवनिर्मित रसायनांमुळे आणि माणसांच्या वेगवेगळ्या कृतींमुळे निसर्ग ओरबाडला जातोय. पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान वाढत चाललंय. हवामान बदल जाणवतोय. गेल्या दहा हजार वर्षातल्या ज्या पोषक वातावरणामुळे माणूस शेती करू शकला, आपली संख्या वाढवू शकला, तेच आता धोक्यात येत चाललंय.
अंडरग्रॅज्युएशनसाठी परदेशी जायचा ट्रेंड

परदेशातल्या शिक्षण प्रणालीमध्ये स्वावलंबी कसे व्हाल, याकडे इथल्या शिक्षणपद्धतीचा कटाक्ष असतो. ‘लर्न आणि अर्न’ (learn and earn) म्हणजेच ‘शिका आणि कमवा’ या धोरणामुळे शिकता शिकता तुम्ही कमवू शकता.
लोकशाहीचा पाया, पंचायत सभा

पंचायतराज व्यवस्था (Panchayat Raj) म्हणजे स्थानिक शासन व्यवस्था! ग्रामीण त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये थेट जनतेचा संपर्क किंवा संवाद होतो. थेट लोकांचा सहभाग येतो तो म्हणजे ग्राम पंचायतीशी! पंचायतराजचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्रामसभा! या सभा नेमक्या कशा असतात त्यांना काय अधिकार असतात हे समजून घेऊयात.
सुरतेच्या लुटीला कुणाची नजर…

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) ‘सुरत लुटली’ (Surat ) या विधानाला कधी कुणी आव्हान देईल असं वाटलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली याचा अन्वयार्थ छत्रपती लुटारू होते, असा लावण्याचं धाडस कुणाच्या स्वप्नातही येण्याचं काही कारण नव्हतं. छत्रपतींनी राजधर्म, स्वराज्यधर्म पाळला होता, याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही मनात शंका नाही.
आपली गुंतवणूक, आपल्या हाती

गुंतवणूकीचे (Investment) निर्णय हे बहुतांश वेळी घरातला कर्ता पुरुष घ्यायचा आणि त्याबद्दल कोणालाही काहीही माहिती नसायची. जेव्हा घरची पुढची पिढी कमवायला लागायची तेव्हा हळूहळू ही गुंतवणूक पुढे सांगितली जायची. पण इंटरनेटमुळे गुंतवणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आणि मार्ग उपलब्ध झाले.