SIP – थेंबे थेंबे तळे साचे

Savings करायचे म्हटले की सगळ्यात सोपा आणि effective पर्याय म्हणजे दर महिना थोडे थोडे पैसे वेगळे ठेवायचे. बहुतेकांना दर महिना पगार मिळतो, बिझिनेस करणारे असतील तर महिन्याचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते. पण बहुतांश जनता या प्रकारात मोडते. अर्थातच या सर्व लोकांसाठी पैसे साठवण्याचा उत्तम उपाय म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे.
[gspeech type=button]

Savings करायचे म्हटले की सगळ्यात सोपा आणि effective पर्याय म्हणजे दर महिना थोडे थोडे पैसे वेगळे ठेवायचे. बहुतेकांना दर महिना पगार मिळतो, बिझिनेस करणारे असतील तर महिन्याचे उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते. पण बहुतांश जनता या प्रकारात मोडते. अर्थातच या सर्व लोकांसाठी पैसे साठवण्याचा उत्तम उपाय म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे.

 RD (Recurring Deposits)

दर महिना थोडे थोडे पैसे वेगळे काढा आणि भविष्यात असणाऱ्या संभाव्य मोठ्या खर्चाची सोय करा हे प्रत्येक घरातलं ठरलेलं सूत्र. अर्थात यासाठी बँकेत एक सोपा उपाय उपलब्ध होता. RD (Recurring Deposits) मासिक उत्पन्न घेणाऱ्या सर्वांचा आवडीचा गुंतवणुकीचा पर्याय. दर महिना पगार येतो त्याचप्रमाणे दर महिना पैसे साठवले जायचे. भविष्यात असणाऱ्या संभाव्य मोठ्या खर्चाची आपोआप सोय होयची, पण अर्थातच बऱ्याचदा असं होयच की त्या खर्चाची वेगळी सोय केली जायची आणि या RD च रूपांतर शेवटी एका FD (Fixed Deposit) मध्ये केलं जायचं. तेरा महिन्याची RD केली तर शेवटी त्याचं बहुतेक वेळी FD मध्ये conversion केलं जायचं. पुष्कळदा लोकांच्या 56 FD तश्याच बनायच्या. आज देखील याचा वापर करताना दिसतातच..

 सोन्याची भिशी

अशाच प्रकारचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे “सोन्याची भिशी”. सोनाराकडे बारा महिने पैसे भरायचे, सोनार त्यात भर घालून ठराविक रकमेचे सोने आपल्याला देणार. मध्यमवर्गीयांमध्ये अतिशय लोकप्रिय गुंतवणुकीचा प्रकार. सोन्यासारख्या आवडत्या गुंतवणूक प्रकारात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध केल्याने सगळ्यांच्याच आवडीचा विषय. पुढील पिढीसाठी सोन्याची तयारी करायच्या दृष्टीने सगळेच लोकं यामध्ये रस घेताना दिसायचे आणि अजूनही दिसतात.

 सरकारमान्य नसणारे पर्याय टाळा

अर्थात वरील दोन गोष्टी सोडून पतपेढी, भिशी यासारख्या पर्यायांमध्ये देखील सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जायची किंबहुना अजूनही केली जाते. अर्थात यातील प्रत्येक प्रकार सरकारमान्य असेलच असं नसल्याने, त्यात असणारी रिस्क ओळखून प्रत्येकाने गुंतवणूक केली पाहिजे.

 सध्याचा लोकप्रिय तळे साचवणारा ऑप्शन

बँकेतल्या RD मध्ये मिळणारे व्याजदर बघता थेंबे थेंबे तळे नाही पण तांब्याभर गुंतवणूक नक्कीच उभी राहू शकते. पण थेंबे थेंबे तळे साचवायचे असेल तर, सध्याच्या सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीच्या पर्यायाचा वापर करावा लागेल. म्हणजेच म्युचुअल फंडमध्ये. यात दर महिना केली जाणारी SIP या ऑप्शन मध्ये चांगला लाभ आहे. भविष्यात मोठी गुंतवणूक उभी करण्यासाठी अतिशय सोपा आणि प्रभावी असा दुसरा कोणताच चांगला पर्याय सध्या उपलब्ध नाही. अर्थात ह्या गुंतवणुकीसाठी नक्कीच किमान पाच वर्षे देणं गरजेचं आहे. कारण शेअर मार्केट मधले उतार चढाव बघता या सर्व उतार चढावांमध्ये दर महिना गुंतवणूक झाली की, त्यामुळेच SIP भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकते.

 20 वर्षात 1 करोड!

दहा हजारांच्या दर महिना गुंतवणूकीवर जर वार्षिक 12% चा परतावा मिळाला तर 20 वर्षात जवळपास एक करोडची गुंतवणूक जमा होऊ शकते. अर्थात या प्रकारामध्ये दर वर्षी ठराविक रकमेने ही गुंतवणूक वाढवली देखील जाऊ शकते. दर वर्षी होणाऱ्या पगारवाढी बरोबर आपोआपच गुंतवणूक देखील वाढवली जाते ज्याचा भविष्यात मोठा फायदा होतो. भारतीय जनता सध्या दर महिना 23,547 करोड रुपयांची गुंतवणूक SIP द्वारे सध्या म्युचुअल फंडात करत आहे. मार्च 2020 मध्ये हीच गुंतवणूक 8,641 करोड रुपये इतकी होती. गेल्या तीन वर्षात भारतीय जनतेचा म्युचुअल फंड कडे होत असलेला वाढता कल दिसून येतो. पण SIP ची अकाउंट सध्या 9.6 करोड इतकीच आहेत. त्यामुळे भारतीय लोकसंख्येच्या जवळपास फक्त 67% जनताच सध्या म्युचुअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करताना दिसत आहे. प्रगत देशात हीच टक्केवारी 40% च्या आसपास आहे. त्यामुळे अर्थातच भारताला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आणि पर्यायाने भारतीय शेअर बाजाराचा वाढता आलेख भविष्यात देखील असाच कायम राहील ही चिन्हे दिसत आहेत.

 कोणता पर्याय निवडावा?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की या पर्यायांपैकी कोणता पर्याय दर महिन्याच्या गुंतवणुकीसाठी निवडावा. याचं उत्तर तुम्ही स्वतःच देऊ शकाल.. गुंतवणूक कोणत्या कारणासाठी केली जात आहे आणि तिचा वापर आपल्याला कधी करायचा आहे त्याप्रमाणे पर्याय निवडावा. जर पुढील 23 वर्षात हे पैसे लागणार असतील तर बँकेत RD करण्याला प्राधान्य द्यावे आणि या उलट जर पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी आपल्याकडे असेल तर नक्कीच म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक केली जावी. आणि आपल्या मागच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे तुमच्या गुंतवणूक ध्येयानुसार योग्य पर्यायाचा वापर करून आपल्या स्वप्नांची पूर्तता करावी.

1 Comment

  • समिक्षा

    खूप चांगली लेख आहे चांगली माहिती मिलीली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. खूप चांगली लेख आहे चांगली माहिती मिलीली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि
Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ