कबड्डी हा खेळ भारताचा मातीतून जन्मलेला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा, बिहार, आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कबड्डी पारंपरिक खेळ म्हणून खेळली जात होती. यातूनच त्याचा विकास झाला आणि आज हा खेळ आशिया वर्ल्ड गेम्समध्ये आणि प्रो-कबड्डीसारख्या व्यावसायिक लीगमध्ये पोहोचला आहे.
कबड्डीचा उगम भारतात सुमारे चार हजार वर्षांपूर्वी झाल्याचे मानले जाते. काही प्रमाणात रामायण आणि महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये देखील असे संकेत आहेत की, हा खेळ सुरुवातीला लढाईपूर्व सराव म्हणून वापरला जात असे – म्हणजे श्वास रोखून दुसऱ्या गटात शिरणे, जास्तीत जास्त शत्रूंना भिडून स्वतःच्या भागात परतणे.
1938 मध्ये कोलकातामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथमच हा खेळ ऑफिशियली खेळवला गेला आणि 1950 मध्ये ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची स्थापना झाली. त्यानंतर 1990 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश झाला आणि भारताने त्यात सातत्याने वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
खेळाचे नियम:
कालावधी:
कबड्डी सामना 20-20 मिनिटात दोन भागांचा असतो. (प्रो-कबड्डी आणि इंटरनॅशनल कबड्डीमध्ये). त्या दरम्यान 5 मिनिटांची विश्रांती असते.
टीम संरचना:
प्रत्येक टीममध्ये 7 खेळाडू मैदानात असतात. आणि काही पर्यायी खेळाडू असतात.
खेळाचे स्वरूप:
एक खेळाडू (रेडर) दुसऱ्या संघाच्या अर्धभागात जातो आणि “कबड्डी कबड्डी” म्हणत जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्श करून परततो. जर तो परत आला तर त्याला पॉईंट्स मिळतात. पकडला गेला तर डिफेंडिंग टीमला पॉईंट्स मिळतात.
बोनस लाइन आणि सुपर टॅकल्स:
प्रो-कबड्डीमध्ये बोनस लाइन ओलांडल्यास बोनस पॉईंट, आणि 3 किंवा त्यापेक्षा कमी डिफेंडर्सने रेडरला पकडल्यास ‘सुपर टॅकल’ पॉईंट मिळतो.
आता वळुयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे
फिटनेस आणि आहार:
कबड्डीमध्ये खेळाडूंच्या शरीरावर खूप ताण येतो – विशेषतः क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्स, ग्लूट्स, कोअर मसल्स, आणि शोल्डर मसल्स सतत वापरल्या जातात.
तंदुरुस्तीसाठी plyometric drills, agility ladder training, आणि reaction time exercises आवश्यक असतात.
खेळापूर्वी आणि नंतर stretching, strength training महत्त्वाचे आहे.
कबड्डीपटूंसाठी योग्य पोषण (Nutrition)
ऊर्जेचा स्त्रोत – कार्बोहायड्रेट्स
रेडर किंवा डिफेंडरला सतत धावावे लागते. त्यामुळे भरपूर उर्जा आवश्यक असते.
स्रोत: तांदूळ, ज्वारी, बाजरी, राजगिरा, ऊस रस, केळं, खजूर यांचं सेवन करावं.
स्नायूंसाठी प्रथिनं (Proteins)
स्नायू दुरुस्तीसाठी आणि ताकद वाढवण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते.
स्रोत: दूध, ताक, मूग डाळ, उडीद डाळ, सोया, पनीर, दही, अंडी, मासे व चिकन
स्निग्ध पदार्थ – ‘स्मार्ट फॅट्स‘:
सांधेदुखीपासून संरक्षण, उर्जेचा साठा करण्यासाठी स्निग्ध पदार्थांची गरज असते.
स्रोत: तीळ, शेंगदाणे, साजूक तूप, एवोकाडो, ओमेगा-3 तेलं.
पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स:
कबड्डीत घाम मोठ्या प्रमाणात येतो, त्यामुळे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचा ताळमेळ आवश्यक आहे.
उपयुक्त पेये: लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळपाणी, घरगुती ORS
हायड्रेशन आणि रिकव्हरी:
सामन्यादरम्यान घाम जास्त प्रमाणात येतो, त्यामुळे 500-750 मिली दर 30 मिनिटांनी प्यावे.
पोस्ट गेम रिकव्हरीसाठी ओमेगा 3 फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स (टोमॅटो, बेरीज, व्हिटॅमिन C), आणि भरपूर झोप आवश्यक.
कबड्डी हा एक केवळ खेळ नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे. शरीरसामर्थ्य, श्वसन नियंत्रण, आणि रणनीती यांचे मिलाफ असलेला हा खेळ भारतीय मुलांनी लहान वयापासून शिकावा, त्यासाठी योग्य आहार आणि व्यायामही तितकाच आवश्यक आहे.



