मुरुमांवर स्टेरॉईड आणि इतर उपचारांचा वापर – परिणाम आणि धोके

Steroid Treatment on Acne : तरुण आणि तरुणींमध्ये मुरुमांची समस्या गंभीर असेल, तर त्वचाविशेषज्ज्ञांचा सल्ला घेण्याऐवजी पटकन कुठलाही उपाय करायला तयार होतात. बाजारात मिळणाऱ्या तातडीच्या उपायांमध्ये स्टेरॉईडयुक्त क्रीम्स, पोटात घेतली जाणारी औषधे आणि इतर उपचारांचा समावेश असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोष्टींचा वापर केल्याने अनेक घातक दुष्परिणाम होऊ शकतात.
[gspeech type=button]

त्वचेसाठी तातडीने प्रभावी उपाय हवे असल्यामुळे अनेकदा धोकादायक उपचारांचा अवलंब केला जातो. तरुण आणि तरुणींमध्ये मुरुमांची समस्या गंभीर असेल, तर त्वचाविशेषज्ज्ञांचा सल्ला घेण्याऐवजी पटकन कुठलाही उपाय करायला तयार होतात. बाजारात मिळणाऱ्या तातडीच्या उपायांमध्ये स्टेरॉईडयुक्त क्रीम्स, पोटात घेतली जाणारी औषधे आणि इतर उपचारांचा समावेश असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोष्टींचा वापर केल्याने अनेक घातक दुष्परिणाम होऊ शकतात.

स्टेरॉईडयुक्त क्रीम्स आणि त्याचे दुष्परिणाम

Deflazacort गोळ्या व इतर स्टेरॉईडयुक्त क्रीम्स काही ठिकाणी मुरुमांसाठी वापरली जातात, पण याचा दीर्घकालीन वापर त्वचेसाठी धोकादायक असतो. सुरुवातीला त्वचा मऊ आणि स्वच्छ दिसते, पण कालांतराने पुढील समस्या उद्भवू शकतात:

  • त्वचेचा लालसरपणा आणि संवेदनशीलता वाढते
  • चेहऱ्यावर अधिक तेल साचून मुरुम वाढतात
  • त्वचा पातळ होते आणि पटकन डाग पडतात
  • केस गळती, वजन वाढणे आणि हार्मोनल असंतुलन

Isotretinoin – परिणामकारक पण धोकादायक उपाय

Isotretinoin हे मुरुमांवर प्रभावी औषध मानले जाते. हे औषध त्वचेतील तेलग्रंथींचे प्रमाण कमी करते, त्यामुळे अतिशय जुन्या मुरुमांवरही फायदा होतो. पण याचे गंभीर साइड इफेक्ट्स असू शकतात, विशेषतः तरुण मुलींमध्ये:

  • मासिक पाळीमध्ये अनियमितता – काही जणींची पाळी उशिरा येते किंवा अचानक थांबते.
  • गर्भधारणेवर परिणाम – हे औषध घेत असताना गर्भधारणेची शक्यता टाळण्यासाठी डॉक्टर विशेष सूचना देतात, कारण यामुळे गर्भविकासावर विपरीत परिणाम होतो.
  • ड्राय स्किन आणि फाटलेले ओठ – या औषधाचा सर्वसामान्य दुष्परिणाम म्हणजे त्वचा आणि ओठ अतिशय कोरडे होणे.

मासिक पाळीवर स्टेरॉईड आणि Isotretinoin यांचा प्रभाव

स्टेरॉईड्समुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे काही जणींना महिन्याच्या चक्रात अनियमितता जाणवते.

काही प्रकरणांमध्ये पीरियड्स अत्यंत वेदनादायक होतात, तर काही वेळा ते पूर्णपणे बंद होण्याचा धोका असतो.

शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्यामुळे पाळीच्या वेळी सूज, डोकेदुखी, आणि चिडचिड वाढू शकते.

दीर्घकाळ स्टेरॉईड्स आणि Isotretinoin घेतल्यास भविष्यात वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो.

योग्य पर्याय आणि नैसर्गिक उपायांचा विचार करावा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडयुक्त औषधे आणि क्रीम्स वापरू नयेत.

आहारात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स, भरपूर पाणी, आणि फळभाज्यांचा समावेश करावा.

झोपेचे वेळापत्रक सांभाळून हार्मोनल संतुलन राखावे.

मुरुमांसाठी योग्य घरगुती उपाय आणि त्वचेसाठी संतुलित दिनचर्या

  •  बाजारातील उपायांवर अवलंबित्व कमी करा
  • तरुण वयात चेहऱ्यावर मुरुम येऊ लागले की लगेच कोणतेही क्रीम, लोशन न लावता नैसर्गिकरित्या त्याला वेळ द्यावा. नखाने ते फोडू नये नाहीतर डाग राहण्याची शक्यता असते.
  •  योग्य प्रमाणात पाणी प्या हा त्वचेसाठी पहिला नियम. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवते. दिवसाला किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे.
  • सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
  • चहा-कॉफीऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टीचा समावेश करावा.

झोपेचा त्वचेवर होणारा प्रभाव

  • झोप अपुरी असल्यास हार्मोनल असंतुलन होऊन मुरुमांची समस्या वाढते.
  • रोज 7 ते 8 तासांची शांत झोप आवश्यक आहे.
  • रात्री उशिरा मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे टाळावे.

स्वच्छता आणि त्वचेसाठी योग्य क्लेन्सिंग रूटीन

  • सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे.
  • दिवसातून 2 वेळा चेहरा धुवावा, परंतु वारंवार धुणे टाळावे. फेस वॉश वापरून जर चेहरा नितळ दिसत असेल तर जास्त वेळा दिवसातून फेसवॉश वापरून फरक पडणार नाही. त्यामुळे फेस वॉश हा सकाळी एकदा आणि रात्री एकदा दोनच वेळा वापरावा
  • कोणतेही स्क्रब फार जास्त न वापरता आठवड्यातून एकदाच हलकेसे एक्सफोलिएशन करावे.

मुरुमांसाठी योग्य घरगुती उपाय

  • तत्काळ उपाय म्हणून कोणत्याही केमिकलयुक्त उत्पादनांचा जास्त वापर करू नये. याऐवजी नैसर्गिक घटक वापरणे फायदेशीर ठरते.
  • बेसन आणि हळदीचा लेप: 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावे.
  • चंदन मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी: चेहऱ्यावर मुरुमांमुळे लालसरपणा आल्यास चंदन पावडर मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांचा पॅक वापरावा.
  • एलोव्हेरा जेल: फ्रेश एलोव्हेरा जेल लावल्याने त्वचा हायड्रेट सतेज होते आणि पुरळ कमी होण्यास मदत होते.
  • लिंबाचा रस टाळा: अनेक जण लिंबाचा रस लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु यामुळे त्वचेला इरिटेशन होऊन डाग वाढू शकतात.

सौम्य कॉस्मेटिक्सचा वापर करा

  • बाजारातील केमिकलयुक्त मेकअप मुरुमांची समस्या वाढवतो.
  • ऑइल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक प्रोडक्ट्स वापरावेत.
  • मेकअप कमीत कमी वापरणे फायदेशीर ठरेल.
  • रात्री झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित साफ करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • सनस्क्रीनचा वापर नियमितपणे करावा.

मुरुमांवर योग्य आहार – ‘तुम्ही जे खाता, तसेच दिसता’

  • आहारात योग्य घटकांचा समावेश केल्याने त्वचेचा पोत सुधारतो.
  • व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स: संत्री, मोसंबी, आवळा, टोमॅटो, आणि बेरीज यांचा आहारात समावेश करावा.
  • ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स: ड्रायफ्रूट्स (बदाम, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स) आणि आंबट दह्याचा आहारात समावेश करावा.
  • प्रोबायोटिक्स: दही आणि ताक घेण्याने पचन सुधारते आणि त्वचा निखरते.
  • गोड आणि तेलकट पदार्थ टाळा: साखर आणि जंक फूडमुळे मुरुम वाढतात. चहा-कॉफी कमी करून नारळपाणी किंवा ताजे रस घ्यावेत.

मानसिक आरोग्य आणि तणाव नियंत्रण

  • तणावामुळे मुरुमांची समस्या अधिक तीव्र होते.
  • रोज 15 मिनिटे ध्यान किंवा योग करावा.
  • शारीरिक हालचाल वाढवून व्यायाम, चालणे किंवा स्ट्रेचिंग करावे.
  • सतत मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर केल्याने त्वचेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हानीकारक परिणाम होतात.

पुढील भागात काय?

  • मुरुमांनंतर चेहऱ्यावर राहणारे काळे डाग कसे कमी करायचे?
  • पोस्ट-ऍक्ने स्कार्ससाठी घरगुती आणि मेडिकल उपाय.
  • हार्मोनल पिंपल्स कसे ओळखावेत व
  • PCOS आणि मुरमं यांचा संबंध.

8 Comments

  • MRS. MEDHA B. PATHAK

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. घरगुती पदार्थांचा वापर तुम्ही सांगितल्यामुळे हे पदार्थ सहज उपलब्ध होतात आणि त्यात रासायनिक पदार्थ पण मिसळलेला नसतो. धन्यवाद.

  • V Bhat

    Valuable information that is clear and concise.

  • सौ. मीरा त्रिफळे

    खूप च उपयोगी माहिती.

  • Meena Dumbre

    Very nice information
    Thank you so much 🙏

  • Deepa Agashe

    Good read. Thanks for sharing

  • Deepa Agashe

    Very informative. Thanks for sharing

  • Upendra Pethe

    Nicely explained..good key points to manage acne and pimples.

  • Uday Agashe

    खूप उपयुक्त माहिती.. थोडक्यात पण महत्वाची

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

8 Responses

  1. अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. घरगुती पदार्थांचा वापर तुम्ही सांगितल्यामुळे हे पदार्थ सहज उपलब्ध होतात आणि त्यात रासायनिक पदार्थ पण मिसळलेला नसतो. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ