मागील भागात आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महिषासुरमर्दिनीच्या मूर्तींचा आढावा घेतला. या लेखात आपण भारतातील इतर प्रदेशांमधील महिषासूरमर्दिनीच्या मूर्तींची ओळख करून घेवू.
महाबलीपुरम इथलं महिषासुरमर्दिनी मंडप

महिषासूरमर्दिनीचे सर्वात वेगळे आणि प्रसिद्ध शिल्प महाबलीपुरम तमिळनाडू येथे आहे. महाबलीपुरम इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात, पल्लव राजवटीच्या काळात भरभराटीला आलेले महत्त्वाचे बंदर होते. राजा नरसिंहवर्मन प्रथम (मामल्ल) याच्या राजवटीत महाबलीपुरम अत्यंत महत्त्वाचे राजकीय, व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होते. पल्लव राजांनी येथे अनेक भव्य आणि कलात्मक शिल्पे आणि मंदिरांची निर्मिती केली. येथील एका लेण्यात महिषासुरमर्दिनीचे प्रसिद्ध शिल्प आहे. म्हणूनच हे लेणे महिषासुरमर्दिनी मंडप म्हणून ओळखले जाते. यात देवी आणि महिषासुरातील युद्धाचे चित्रण आहे. सिंहावर आरूढ होवून देवी एक बाण सोडत आहे आणि तिच्या मागे असलेल्या सैन्यासह राक्षसाशी निकराने लढत आहे. दुसरीकडे, महिषासुराला अर्धमानवी रूपात दाखवले आहे. त्याचे शरीर माणसाचे आणि डोके रेड्याचे आहे, आणि तोही तिच्याशी तितक्याच ताकदीने लढत आहे.
कोट्रवाई आणि महिषासूरमर्दिनीचा मिलाफ

तामिळनाडूमधील बृहदेश्वर मंदिरातील महिषासूरमर्दिनीची मूर्ती चोल काळातील, इ.स. 11 व्या शतकातील आहे. ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटमध्ये घडविली आहे. देवीला चार हात असून ती समपाद मुद्रेत रेड्यावर उभी आहे. तिने हातात चक्र, शंख धारण केलेले असून, एक हात कंबरेवर ठेवला असून दुसरा हात अभयमुद्रेत आहे. ही मूर्ती दुर्गेची युद्धानंतरची अभय मुद्रा दर्शविते. असे म्हटले जाते की चोळ काळातील महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती संगमकाळातील कोट्रवाई देवीच्या मूर्तीसारख्या आहेत. कोट्रवाई मुख्यतः युद्ध, फलनक्षमता, आणि विजयाची देवी म्हणून ओळखली जाते. मूर्तीशास्त्रानुसार तिच्या हातांत शस्त्रे असून ती काही वेळा ती सिंह किंवा कृष्णमृगासारख्या प्राण्यांवर उभी असते. पुढील काळात सांस्कृतिक देवाण-घेवाणीमुळे कोट्रवाईचे दुर्गा आणि कालीसारख्या देवतांमध्ये विलयन झाले. यामुळे तिची स्वतंत्र पूजा कमी झाली आणि त्यांच्या मूर्तींमध्येही साधर्म्य आढळू लागले. बृहदेश्वर मंदिरातील महिषासुरमर्दिनीची मूर्तीही कोट्रवाई प्रमाणे शस्त्रात्रे धारण केलेली आणि रेड्यावर समपाद मुद्रेत उभी आहे.
अठरा हात असणारी मूर्ती

तामिळनाडूमध्येच चिदंबरमला महिषासुरमर्दिनीची इ.स. 10 व्या शतकातील चोळ राजवटीच्या काळातील ग्रॅनाइटमध्ये घडविलेली मूर्ती आहे. इथे महिषासुरमर्दिनीला अठरा हात असून तिने विविध शस्त्रात्रे धारण केली आहेत. देवी आलीढ मुद्रेत उभी असून मानवी शरीर आणि रेड्याचे डोके असलेल्या महिषासूराचा वध करीत आहे. जरी ही मूर्ती मंदिराच्या बाह्य भिंतीवर असली तरी तामिळ प्रथे प्रमाणे देवीला वस्त्रांकित आहे.
ओडिशामधील आलीढ मुद्रा

पुढील शिल्प भुवनेश्वर ओडिशामधील वैताळ मंदिरातील आहे. इ.स. 6व्या शतकातील हे शिल्प सॅण्ड्स्टोन मध्ये घडविले आहे. देवीने तिच्या आठ हातांत विविध शस्त्रात्रे धारण केली आहेत. ह्या शिल्पात देवी आलीढ मुद्रेत उभी आहे आणि ती आपले त्रिशूळ महिषासूराच्या गळ्यात भोसकून त्याचा वध करीत आहे. तिचा सिंह उजव्या बाजूने राक्षसावर हल्ला करत आहे. येथेही महिषासूर अर्धमानवीकृत दाखविला आहे. मानवी शरीर आणि रेड्याचे डोक असलेला महिषासूर पाठमोरा दाखविला आहे.
विहिरीत कोरलेली महिषासूरमर्दिनीची मूर्ती

भारतातील सर्वात जास्त कलात्मक महिषासुरमर्दिनीची मूर्ती पाटण, गुजरात येथील राणी-की-वाव या विहिरीत कोरलेली आहे. सोलंकी राणी उदयमतीने इसवी सनाच्या 11 व्या शतकात बांधलेल्या या विहिरीला 2014 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. पश्चिम भारतात ‘वाव’ किंवा ‘बावली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विहिरी नागरिकांना आणि व्यापार मार्गांवरील प्रवाशांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी बांधल्या होत्या. या विहिरी विश्रांती आणि प्रार्थनेसाठी जागा म्हणूनही ओळखल्या जात. या विहिरींमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आणि हिंदू महाकाव्यांतील कथा मोठ्या प्रमाणात कोरल्या गेल्या आहेत. या महिषासूरमर्दिनी शिल्पाची विशेषता म्हणजे खोली, ज्यामुळे मूर्ती जवळजवळ त्रिमितीय भासते. दशभुजा देवी आलीढ मुद्रेत महिषासूरावर उभी राहून त्याचा वध करीत आहे. वध करताना तिने त्याचे केस पकडून ठेवले आहेत. येथेही तो रेड्याच्या शरीरातून बाहेर येताना दाखविला आहे. देवीचा सिंह महिषासूरच्या मागच्या भागावर हल्ला करताना दिसतो.
यापुढे आपण परदेशातील काही संग्रहालयात जतन केलेल्या महिषासुरमर्दिनीच्या काही मूर्तींची ओळख करुन घेवूया.
ओडिशातील 8 व्या शतकातील मूर्ती अमेरिकेत

शिल्प फिलाडेल्फिया कला संग्रहालय (Philadelphia Museum of Art) फिलाडेल्फिया, पेनसिल्वेनिया, अमेरिका येथील आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार हे शिल्प भुवनेश्वर ओडिशा मधील मूळ शिवमंदिराच्या बाह्य भिंतीवर होते. कालौघात ते खंडित झाल्याने हस्तांतरीत होत सध्या फिलाडेल्फिया संग्रहालयात आहे. ह्या शिल्पाची खरेदी संग्रहालयाने स्टेला क्राम्रीश संग्रहातून केली होती. ह्यासाठी आर. स्टर्जिस इन्गर्सोल, नेल्सन रॉकेफेलर आणि इतर उदार दात्यांनी निधी दिला होती. ही मूर्ती 8 व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. ह्याचे मूर्तीशास्त्र भुवनेश्वर ओडिशामधील वैताळ मंदिरातील मूर्तीप्रमाणेच आहे. अष्टभुजा देवी आलीढ मुद्रेत आपले त्रिशूळ महिषासुरच्या गळ्यात भोसकून त्याचा वध करीत आहे. मानवी शरीर आणि रेड्याचे डोक असलेला महिषासुर पाठमोरा दाखविला आहे. तिचा सिंह उजव्या बाजूने राक्षसावर हल्ला करत आहे.
ब्रिटिश म्युझियममधील अष्टभूजा

प्रसिद्ध ब्रिटिश मुझियममध्येही महिषासुरमर्दिनीचे प्रसिद्ध शिल्प आहे. संग्रहालयाच्या नोंदीनुसार इसवी सन 1200 ते 1299 च्या दरम्यान तयार करण्यात आलेले शिल्प शिस्ट नावाच्या दगडात कोरले आहे. ओडिशामधील कोणार्क येथे हे शिल्प सापडले होते. जॉन ब्रिज, फॅनी ब्रिज आणि एडगर बाकर यांनी हे शिल्प संग्रहालयाला दान केले आहे. त्याआधी हे शिल्प चार्ल्स स्टुअर्ट यांच्या संग्रहात होते. अष्टभुजा देवी आलीढ मुद्रेत महिषासुरावर उभी आहे. येथे महिषासुर रेड्यातून मानवात रूपांतरित होताना दाखवला आहे. सिंहाने त्याचा उजवा पाय धरला आहे.
म्हैसूरच्या शेतात ब्रिटिश अधिकाऱ्याला 13व्या शतकात मिळालेल्या मूर्ती
लंडनच्या विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय (V&A) महिषासुरमर्दिनीचे दक्षिण कर्नाटकमधील 13व्या शतकातील शिल्प आहे. या शिल्पात देवी आठ भुजांची असून, ती आपल्या उजव्या हातांत बाण, चक्र, तलवार आणि त्रिशूळ धारण करीत आहे. तिच्या डाव्या हातांत धनुष, घंटा आणि खेटक आहे. उर्वरित चौथ्या हाताने ती महिषासुराचे डोके चिरून धरले आहे. हे शिल्प संग्रहालयाने 1965 मध्ये आयर्लंडच्या काउंटी विक्लोमध्ये स्थित पॉवर्सकोर्ट एस्टेटच्या मालक मिसेस जी. स्लाझेंजर यांच्याकडून खरेदी केले आहे. स्लाझेंजर कुटुंबाने 1961 मध्ये विंगफिल्ड कुटुंबाकडून पॉवर्सकोर्ट एस्टेट खरेदी केले. 7 व्या पॉवर्सकोर्टच्या व्हिस्काउंटने (1836-1904) त्याला हे शिल्प कसे मिळाले याबद्दल सांगितले. 1861 मध्ये म्हैसूरच्या शेतात फिरताना त्याला दोन भारतीय शिल्पे मिळाली. त्याने त्याचा मित्र आणि म्हैसूरचा त्यावेळचा सिंचन आयुक्त कॅप्टन जॉन्स्टनला याबद्दल सांगितले. कॅप्टन जॉन्स्टनने जवळच्या मंदिरातील एका ब्राह्मणाला ती शिल्पे शेतातून काढून लॉर्ड पॉवर्सकोर्टला देण्यास सांगितले. लॉर्ड पॉवर्सकोर्टने अंदाज केला की शिल्पे हळेबिडूमधून आली असावीत, पण त्यांच्या मूळस्थानाची नोंद नाही. पण शैलीनुसार ती आपण गेल्या लेखात पाहिलेल्या होयसळ राजवटीमध्ये बांधल्या हळेबिडू आणि बेलूर मंदिरातील मूर्तींसारखीच आहेत.
फोटो सौजन्य – इंटरनेट, ब्रिटिश म्युझियम, फिलाडेल्फिया म्युझियम




16 Comments
Thank You for sharing this very nice articles here Buy Steroids And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Thank You for sharing this very nice articles here Buy Steroids And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Thanks for sharing this very nice articles here Buy Research Chemicals And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Thanks for sharing this very nice articles here Buy Research Chemicals And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Amazing Article! Buy Research Chemicals Online! We Look Forward To Read More Of Your Articles!!
Thanks for sharing this very nice articles here Buy Medical Marijuana Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Very Brief And Sweet Article You Have Here! Buy Peptides and Growth Hormones Online! We Look Forward To Read More Of Your Articles!!
Excellent Quality Article! Buy Billiard Board and Snookers Accessories Online! I’m Looking Forward To Read More Of Your Articles Soonest!!
Thanks for sharing this very nice articles here visit our liquor store for the best and oldest bottles Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Thank You for sharing this very nice articles here Buy Steroids And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Very Brief And Sweetie Article You Have Here! Buy Peptides Growth Hormones and steroids Online! We Look Forward To Read More Of Your Articles!!
Brief And Sweet Article You Got Here! Buy Steroids, HGH and Anticancer Online! We Look Forward To Read More Of Your Articles!!
Thank You for sharing this very nice articles here Buy Steroids And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Absolutly Brief Article You Have Here! Buy Peptides Growth Hormones and steroids Online! We Look Forward To Read More Of Your Articles!!
Thank You for sharing this very nice articles here Buy Steroids And HGH Online. moreover the admin of this site has really worked hard for all this.
Amazing Article! Buy Surron Bikes And Parts Online! We Look Forward To Read More Of Your Articles!!