द फाउंडेशन ऑफ फार्मसी टू फिटनेस

Pharmacy to Fitness : फार्मसी हे औषधशास्त्र आहे. यात ॲलोपॅथिक औषधांची परिणामकारकता, होमिओपॅथीचे सौम्य उपाय किंवा आयुर्वेदातील नैसर्गिक उपचार आणि इतर पर्यायी पद्धती असतात.  तर फिटनेस, व्यायाम, योग आणि योग्य पोषण याद्वारे आपण  आपले आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो.  या सर्व घटकांना एकत्र केल्यावर एक शक्तिशाली प्रणाली तयार होते.
[gspeech type=button]

‘फार्मसी टू फिटनेस’ ही संकल्पना आरोग्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनात रुजलेली आहे.  खरे आरोग्य म्हणजे केवळ लक्षणांवर औषधोपचार करून उपचार करणे नव्हे. तर आजारांना प्रतिबंध करणे आणि संतुलित जीवनशैलीला चालना देणे.

फार्मसी हे औषधशास्त्र आहे. यात ॲलोपॅथिक औषधांची परिणामकारकता, होमिओपॅथीचे सौम्य उपाय किंवा आयुर्वेदातील नैसर्गिक उपचार आणि इतर पर्यायी पद्धती असतात.  तर फिटनेस, व्यायाम, योग आणि योग्य पोषण याद्वारे आपण  आपले आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो.  या सर्व घटकांना एकत्र केल्यावर एक शक्तिशाली प्रणाली तयार होते.

फ्यूजन महत्त्वाचे का?

आधुनिक वैद्यकशास्त्राने तीव्र आणि जुनाट आजारांवर उपचार करण्यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.  पण, रोग टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करायला हवेत या मुद्द्याकडं  अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.  त्याचप्रमाणे, वैकल्पिक औषध, योग आणि पोषण यांच्याकडे आरोग्याच्या अविभाज्य भागांऐवजी पूरक म्हणून पाहिले जाते.  या सर्व विषयांचे एकत्रीकरण करून, ‘फार्मसी टू फिटनेस’, गोळ्या आणि प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडे जाऊन आरोग्यविषयक  जागृती काम करतो .

‘फार्मसी टू फिटनेस’चा रोजच्या आयुष्यात उपयोग 

विशेषतः लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तणाव-संबंधित विकारांसारख्या जीवनशैलीशी संबंधित परिस्थितींसाठी हे उपयुक्त आहे.  उदाहरणार्थ, रक्तातील साखर किंवा रक्तदाब नियंत्रित करण्यास औषधे मदत करू शकतात. परंतु योग्य पोषण, योगासने आणि नियमित व्यायामासह औषधे घेतल्यास आरोग्यात लक्षणीयरीत्या सुधारणा होते. आणि कालांतराने औषधांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.

‘फार्मसी टू फिटनेस’ या सदरातून आपल्यासमोर दर सोमवारी काही ना काही  नविन, रंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत.यात तुम्हाला औषधे,अन्न, त्यातील जीवनसत्व आणि जीवनसत्त्वांच्या अभावाने होणारे आजार, वेगवेगळ्या खेळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डायट विषयी रंजक माहिती वाचायला मिळेल. फार्मसी सांभाळताना अनेक पेशंट तरुण मुलं पिंपल्स किंवा डँड्रफसारख्या गोष्टींसाठी औषधांचा भडीमार करताना जेव्हा बघते, तेव्हा एक काळजी वाटू लागते.

पुष्कळदा या उपचारांमध्ये स्टीरॉईडचा वापर केला जातो. मुलांना त्याच्या दुष्परिणामाविषयी माहिती नसते. प्रोटीन सप्लीमेंटविषयी जेव्हा स्पोर्ट्स न्यूट्रिशनवाली मुलं आपल्याला विचारतात तेव्हा क्रिएटिन घेऊन बॉडी बनेल का? माझे मसल्स विद्युत जमवाल सारखे होतील का?

याचे उत्तरही आपण या सदरामध्ये बघणार आहोत. प्रत्येक व्हे प्रोटीन हे लॅबचे टेस्ट रिपोर्ट बघूनच घेतलं जावं. स्वस्त आहे म्हणून एखाद्या वेळेला ते चांगलं असेलच असं नाही.

औषधांचं सेवन करताना काय काळजी घ्यावी?

औषधं विकत घेताना जेव्हा आपण डॉक्टरची फाईल किंवा प्रिस्क्रीप्शन फार्मासीस्टला दाखवतो, तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला ते औषध कसं घ्यायचं आहे, जेवणाआधी किंवा जेवणानंतर किती वेळाने घ्यायचं, त्या औषधाबरोबर कोणत्या अन्नपदार्थाची इंटरॅक्शन होऊ शकते याची माहिती आपल्याला देणं अपेक्षित आहे. डॉक्टरांकडे या सगळ्या गोष्टींची माहिती द्यायला पुरेसा वेळ असेलच असं नाही. आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला असणाऱ्या अॅलर्जीची माहिती त्यांना देणे हे अतिशय गरजेचे आहे. उदाहरणार्थ : सल्फा ड्रग्स अॅलर्जी किंवा पेनिसिलिनची अॅलर्जी बऱ्याच लोकांना असू शकते.

फार्मसी टू फिटनेस’ ही केवळ संकल्पना नाही.  ही एक चळवळ आहे. याचा उद्देश जीवनात चांगले बदल करणे हा आहे.  सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि परंपरा एकत्र करून, आरोग्यासाठी सक्रिय दृष्टीकोन स्वीकारण्यासाठी लोकांना ही चळवळ प्रोत्साहित करते.  वैयक्तिक मार्गदर्शनाद्वारे, हा उपक्रम व्यक्तींना त्यांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निवड करण्यास सक्षम बनवतो. यामुळे अधिक परिपूर्ण आणि रोगमुक्त जीवन जगता येते.

वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमध्ये आहारात पारंपारिक ‘फूड कॉम्बिनेशन्स’ आपण नेहमीच बघत असतो. त्याच्यामागचं लॉजिक जर आपल्याला चांगल्या रीतीने समजलं; तर आपण ते अधिक उत्तमरीत्या पाळू शकतो. फार्मसी, पर्यायी औषध, फिटनेस आणि पोषण हे सर्व विषय एकत्र केल्यामुळे आपल्याला रोजच्या सवयींकडे पाहण्याचा वेगळा  दृष्टीकोन मिळतो.  या अभिनव संकल्पनेद्वारे लोक सर्वांगीण उपचारांवर लक्ष केंद्रित करतात.  

पुढच्या लेखांपासून आपण एक-एक विशेष विषय घेऊन आपलं जीवन अधिक आरोग्यदायी होण्याच्या दिशेनं पाऊल टाकुयात !

13 Comments

  • D.V.HUPRIKAR

    हे सदर माहितीपूर्ण होईल .यातून बारिक सारीक गोष्टीचा उलगडा होईल आणि औषध घेण्याचा योग्य परिणाम साधण्यास मदत होईल. आपल्या मनात येणार्या बर्‍याच शंकाच निरसन होईल.

  • Sanketa Joshi

    Thank you

  • Uday Agashe

    छान सुरुवात … आता पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे

  • साधना गांगल

    रोजच्या सवयींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन
    अभिनव संकल्पना द्वारे सर्वांगीण उपचारांवर लक्ष केंद्रित करणे हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे

  • Mangala

    खुप छान सांगितले आहे

  • माधवी सुळे

    सोप्या सरळ भाषेत खुप छान समजावून सांगितलेस .पुढील सदरासाठी शुभेच्छा. दर सोमवारी वाट बघु .

  • Madhav Joshi

    Best wishes 👌👍🏻💐🌹.. free flowing narrative…. Simple language …. Easy for the common person to connect ..

  • MRS. MEDHA B. PATHAK

    अनुराधा , तुम्ही नेहमी सोप्या शब्दांत उत्तम सल्ला देता हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.

  • शर्मिला उपासनी

    वाह खूप चांगला विषय घेतला आहे अनुराधा 👍 नक्कीच माहिती जाणून घ्यायला आवडेल

  • Amit chonkar

    खुप छान विषलेशण अनुराधा
    ऊपयुक्त आहे.

  • रमेश भगवंत देशपांडे

    सुंदर आणि सोप्या भाषेतील माहिती खूप आवडली

  • विनय जोशी

    काळानुरूप विषय, वाचायची उत्सुकता आहे

    • Meena Dumbre

      Very nice information

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

13 Responses

  1. काळानुरूप विषय, वाचायची उत्सुकता आहे

  2. सुंदर आणि सोप्या भाषेतील माहिती खूप आवडली

  3. वाह खूप चांगला विषय घेतला आहे अनुराधा 👍 नक्कीच माहिती जाणून घ्यायला आवडेल

  4. अनुराधा , तुम्ही नेहमी सोप्या शब्दांत उत्तम सल्ला देता हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.

  5. Best wishes 👌👍🏻💐🌹.. free flowing narrative…. Simple language …. Easy for the common person to connect ..

  6. सोप्या सरळ भाषेत खुप छान समजावून सांगितलेस .पुढील सदरासाठी शुभेच्छा. दर सोमवारी वाट बघु .

  7. रोजच्या सवयींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन
    अभिनव संकल्पना द्वारे सर्वांगीण उपचारांवर लक्ष केंद्रित करणे हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे

  8. छान सुरुवात … आता पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे

  9. हे सदर माहितीपूर्ण होईल .यातून बारिक सारीक गोष्टीचा उलगडा होईल आणि औषध घेण्याचा योग्य परिणाम साधण्यास मदत होईल. आपल्या मनात येणार्या बर्‍याच शंकाच निरसन होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

एटीपी अर्थातच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने जाहीर केलेल्या या आठवड्याच्या क्रमवारीत भारताचा एकही टेनिसपटू पहिल्या शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवू शकला
Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा तिसरा लेख. यामध्ये खतांच्या विक्री व्यवस्थापनातील चार सर्वात महत्त्वाच्या
गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. परंतु काही उपक्रम हे केवळ विकासाचे नव्हे तर, सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक ठरतात. स्मशानभूमीचे ‘स्मृती

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ