ज्यूस जैकिंग म्हणजे काय?

juice jacking : ज्यूस जैकिंग हा शब्द 2011 मध्ये पहिल्यांदा वापरात आला. तो ब्रायन कर्क्स यांनी पहिल्यांदा वापरला होता. ज्यूस जॅकिंगमध्ये दुसऱ्या माणसाच्या फोनमधला सगळा डेटा त्या व्यक्तीच्या नकळत चार्जिंग पॉईंटवरुन चोराला जातो.
[gspeech type=button]

हल्ली अनेक कॅफे, एअरपोर्टस, मॉल्स अशा सार्वजनिक ठिकाणी वायफाय सेवा फ्री देण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे या सगळ्या जागांवर मोबाईल चार्ज करण्यासाठी पोर्टची व्यवस्था असते. पण अशा सार्वजनिक जागांवर असलेल्या चार्जिंग पोर्टचा वापर सायबर गुन्हेगारांनी आपल्या मोबाईलमध्ये शिरण्यासाठी केला तर? हे एखा‌द्या गुप्तचर सिनेमातल्या सारखं वाटलं तरीही है प्रत्यक्षात घडू शकतं आणि यालाच म्हणतात ज्यूस जैकिंग.

पैसे खात्यातून जाणे ते फोटो गॅलरीतला फोटो व्हायरल

ज्यूस जैकिंग हा शब्द 2011 मध्ये पहिल्यांदा वापरात आला. तो ब्रायन कर्क्स यांनी पहिल्यांदा वापरला होता. ज्यूस जॅकिंगमध्ये दुसऱ्या माणसाच्या फोनमधला सगळा डेटा त्या व्यक्तीच्या नकळत चार्जिंग पॉईंटवरुन चोराला जातो. व्यक्तीला वाटतंय त्याचा मोबाईल चार्ज होतोय, मोबाईल चार्ज होतो ही पण गुन्हेगार परस्पर डेटा चोरी करुन मोकळेही होतात. आपल्याला समजतही नाही की अचानक बँकेच्या खात्यातून पैसे कसे काय गेले किंवा तुमच्या फोन गॅलरीतला एखादा फोटो अचानक मॉर्फ होऊन व्हायरल कसा झाला. किंवा आपण डाउनलोड न केलेले ऍप अचानक दिसायला कसं लागलं? अशा गड़बड़ी झाल्या की फोन हॅक झाला असावा अशी शंका यायला लागते. पण फोन हैंक कुठे आणि कधी झाला हे मात्र लक्षात येत नाही. सार्वजनिक ठिकाणचे वायफाय आणि चार्जिंग पॉड्स दर वेळी सुरक्षित असतीलच असं नाही. त्यामु‌ळे पडल्यावेळी फोन हॅक झाल्याचं लक्षात आल्यावर आपण आपला फोन कुठल्या सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगला लावला होता का? याचा नक्की विचार करा. फोल हॅक झाल्यावर डेटाबरोबरच आपल्या फोनचा ताबा हॅकर कडे जाऊन अनेक प्रकारे आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

हे कसं घडतं?

जेव्हा आपण आपला फोन सार्वजनिक ठिकाणच्या चार्जिंग पोर्टवर चार्ज करायला लावतो तेव्हा त्या चार्जिंग पॉइंटवरून हॅकर्स फोनमधला डेटा यूएसबी पोर्ट वापरून घोरतात. अनेकदा है पोर्ट्स एकीकडून गॅजेट चार्ज करत असतात तर दुसरीकडून डेटा चोरत असतात. पण हे आपल्याला समजत नाही. आपल्याला फक्त फोन किंवा गॅजेट चार्ज होतानाच दिसतं. माणसांचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात.

ज्यूस जैकिंगचा धोका

• डिव्हाइसवरील डेटा चौरीः बैंक खात्याचे तपशील, पासवर्ड, खाजगी फोटो किंवा फाइल्स चोरी होऊ शकतात.

• मालवेअर इन्स्टॉलेशनः डिव्हाइसमध्ये स्पायवेअर किंवा रॅन्समवेअर टाकले जाऊ शकते.

• ओळख चोरीचा धोकाः वैयक्तिक ओळख संबंधित माहिती वापरून फसवणूक केली जाऊ शकते.

ज्यूस जेंकिंग टाळण्यासाठी

1. फक्त आपल्या चार्जरचा वापर कराः सार्वजनिक ठिकाणी चार्ज करण्यासाठी स्वतःच्या वॉल चार्जरचा किंवा पॉवर बँकेचा वापर करा.

2. डेटा ब्लॉकिंग अडॅप्टर वापराः डेटा ट्रान्सफर ब्लॉक करणारे यूएसबी अडॅप्टर वापरा.

3. सार्वजनिक चार्जिंग पोट्र्ट्सपासून सावध राहाः शक्यती सार्वजनिक चार्जिंग पोर्टस टाळा.

4.फोन लॉक कराः चार्जिंग दरम्यान फोन लॉक ठेवणे चांगले.

5. यूएसबी डिबगिंग डिसेबल कराः आपल्या फोनच्या सेटिंग्जमध्ये “USB Debugging पर्याय बंद ठेवा. त्याचप्रमाणे “share data” किंवा “trust this computer” किंवा “charge only,” असे पर्याय तुमच्या फोनवर आले तर त्यातील “charge only.” हा पर्याय निवडा

ज्यूस जैकिंग ही सायबर गुन्हेगारीची एक लहान पण गंभीर बाब आहे. तांत्रिक सावधगिरी बाळगल्याने आणि वैयक्तिक उपकरणांचे योग्य व्यवस्थापन केल्याने आपण या धोका टाळू शकतो. फोन हॅक झाल्यानंतर आपल्या हातात बऱ्याच गोष्टी राहात नाहीत. पण फोन हॅक होण्यापासून आपण थोड्याशा काळजीने वाचू शकतो. त्यामु‌ळे या गोष्टी माहिती करून घ्या. इतरांनाही सांगा, सायबरच्या जगात सजगपणे आणि सुरक्षित वावरा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ