आईपण भारी गं…

postpartum health recovery – वैज्ञानिक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, मूलाला जन्म देणाऱ्या ‘आईची रिकव्हरी’ म्हणजे पूर्ण बरी होण्यासाठी तब्बल सहा वर्षाचा कालावधी लागतो. हा इतका मोठा कालावधी का लागतो, स्त्री च्या शरीरात या संपूर्ण प्रवासात काय बदल घडतात, आणि ही पूर्ण बरी होण्याची प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊयात.
तुमच्या मेंदूला ‘पॉझिटिव्ह’ करा

आपण आनंदी असलो की आपल्याला उत्साह येतो आणि दुःखी असलो की सगळी एनर्जी गेल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट जी फक्त विचार नाही, तर आपल्या मेंदूची रचनाच बदलू शकते आणि आपल्याला अधिक आनंदी, शांत आणि सक्षम बनवू शकते, ती गोष्ट म्हणजे ‘कृतज्ञता’.
जपानमध्ये भावनिक सोबत व आधाराकरता भाड्यावर माणसे!

Rent people: माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कितीही एकटं राहायचं म्हटलं तरी सोबत असली की जरा हायसं वाटतं. मग ती सोबत अनोळखी का असेना चालते. जपानमध्ये ज्येष्ठ नागरिक, मित्र, नातेवाईक, जेवणासाठी सोबत अशा सर्वच कॅटेगरीमधील व्यक्ती भाड्यानं देण्याचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे.
काही कुटुंबामध्ये फक्त मुलीच किंवा मुलंच का जन्माला येतात? शास्त्रज्ञांनी उलगडलं हे रहस्य

Child Birth : काही कुटुंबामध्ये फक्त मुलीच किंवा मुलंच जन्माला येतात हा आपल्याला निव्वळ योगायोग किंवा अनुवांशिक कारणांमुळे होतं असं वाटतं असेल. पण याच्यामागे शास्त्रीय कारण आहे. काही कुटुंबामध्ये फक्त मुलंच किंवा फक्त मुलीचं का जन्माला येतात यामागचं कारण संशोधकांनी शोधून काढलं आहे.
उबदार खोलीत झोपण्याचे तोटे

Sleeping in a warm room : जेव्हा आपण गरम खोलीत झोपतो, तेव्हा आपल्या शरीराला उष्णता तयार करायची गरज वाटत नाही. त्यामुळे, ते ‘ब्राउन फॅट’ ॲक्टिव्हेट करत नाही.
चिंतामुक्तीचा नवीन फॉर्म्युलाः पुरेसं पाणी पिणं हे स्ट्रेस बस्टर होऊ शकतं!

जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज दीड लिटरपेक्षा कमी पाणी पितात त्यांच्यात तणावपूर्ण परिस्थितींना तोंड देताना शरीरातील प्राथमिक ताण संप्रेरक असलेल्या कॉर्टिसोलची पातळी जास्त दिसून येते. या निष्कर्षांमुळे ताण सहन करण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या जीवनशैली घटकांच्या वाढत्या यादीत ‘हायड्रेशनची’ भर पडली आहे.
कानात ‘इयर बडस्’ घालणं थांबवा!

Earbuds : कानातला मळ काढण्यासाठी सर्रास वापरले जाणारे कॉटन बड्स खरं तर फायद्याऐवजी नुकसानच करतात, असं मत कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कॉटन बड्सचा वापर केल्याने कानातील नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया बाधित होते, ज्यामुळे कानात मळ साचून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
संगीतामुळे मुलांच्या मेंदूतील निर्णयक्षमता, आकलन, स्वनियंत्रण या गुणांचा विकास

संगीत हे अर्भक आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच चांगलं संगीत ऐकवावं, त्यांच्यासोबत बालगीतं म्हणावी आणि संगीताच्या माध्यमातून संवाद साधावा. हे केवळ आनंददायीच ठरणार नाही, तर त्यांच्या भावी आयुष्याचा पाया अधिक मजबूत करणारे ठरेल.
तुम्ही लहान बाळाला गुदगुल्या करताय? जरा थांबा!

आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप मजा येतेय. पण बाळ आनंदाने नाही तर एक रिफ्लेक्स प्रतिक्रिया म्हणून हसतं
गोड पदार्थ खाणं सोडा! फक्त 9 दिवसांत लिव्हरमधील फॅट कमी होऊ शकतं!

liver fat : सोडा, शीतपेयं आणि पॅकेटमधल्या पदार्थांमध्ये जी साखर असते, ती आपल्या लिव्हरसाठी विषारी असते. पण यावर एक सोपा उपाय देखील आहे. तुम्ही फक्त 9 दिवस ही साखर खाणं बंद केले, तर तुमच्या लिव्हरला झालेलं नुकसान भरून काढता येतं.
क्राईंग क्लब: हास्य क्लबनंतर आता रडण्याचे क्लब, मन हलकं करण्याचा अनोखा मार्ग

Crying Club : मुंबईत एक अनोखा ‘क्राईंग क्लब’ सुरू झाला आहे. जिथे तुम्ही मनमोकळेपणाने रडू शकता, तुमचा मन हलकं करू शकता. तिथे तुम्हाला कुणी जज करणार नाही.
डेन्मार्कचा ‘प्लेबुक’: लहान मुलांना भावनात्मक शिक्षण देण्यासाठी एक खास मार्ग

Denmark’s ‘Playbook’: डेन्मार्कमध्ये शाळेत ‘Klassens tid’ नावाचा एक विशेष तास असतो. हा तास फक्त भावना, मैत्री आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी असतो. या तासात मुलांना अभ्यास किंवा इतर कुठल्याही विषयांचा विचार करावा लागत नाही.