तुमचे डोळे ‘कोरडे’ का पडत आहेत?

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर इतका ताण आलाय की, आता अनेकांना ‘डोळे कोरडे पडणे’ किंवा ‘ड्राय आय सिंड्रोम’चा त्रास सुरू झाला आहे. डोळ्याची निगा राखताना या कोरडेपणाकडे वेळीच लक्ष देऊन औषधोपचार करणं गरजेचं आहे.

लडाखमधील आंदोलनाला केंद्र सरकारनं म्हटलेलं ‘अरब स्प्रिंग आंदोलन’ नेमकं काय?

Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी पडली आणि तिथल्या जेन- झी पिढीतले तरुण देशातली वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार हे मुद्दे घेत रस्त्यावर उतरली. त्यांनी पूर्ण सरकार उलथवून लावलं. लडाख मध्येही तशीच परिस्थिती निर्माण होत आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे. या एका पाठोपाठ घडणाऱ्या आंदोलनाचा उल्लेख केंद्र सरकारनं ‘अरब स्प्रिंग आंदोलन’ असा केलेला आहे? जाणून घेऊयात हे ‘अरब स्प्रिंग स्टाईल आंदोलन’ काय आहे?

कृषी मॅपर : आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान

Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने जसजशी प्रगती केली तसतशी या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसाठीही केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कृषी क्षेत्रासंबंधित योजनांच्या अंमलबजावणीला हातभार लावेल असंच आणखीन एक ॲप आहे ते म्हणजे ‘कृषी मॅपर’ ॲप.  जाणून घेऊयात या ॲपचा कशापद्धतीने उपयोग केला जातो. 

BIS:जगातील सर्वात शक्तिशाली बँक, कोणत्याही सरकारचं नियमन नाही!

BIS ही इतर बँकांप्रमाणे नाही. सामान्य माणसांकरता या बँकेची सेवा नाही. आणि ही बँक कोणाला कर्जही देत नाही. देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच देशांच्या सेंट्रल बँकांकरताच ही सुविधा उपलब्ध आहे.

महाराष्ट्रामध्ये ई-प्रमाणपत्र सुविधा केली सुरू ! समजून घेऊयात काय आहे ही ई-प्रमाणपत्र व्यवस्था

E pramaan patra : ‘राज्य डिजिटल प्रशासन कार्यक्रमा’ अंतर्गत राज्यात आता ई-प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून हे ई-प्रमाणपत्राचं पोर्टल हाताळलं जाणार आहे. जाणून घेऊयात की ही ई-प्रमाणपत्र व्यवस्था नेमकी कशी आहे.

भारतीय नौदलाची नवी ताकद: आयएनएस ‘अँड्रोथ’

INS Androth : आपल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकतीच एक दमदार आणि स्वदेशी बनावटीची युद्धनौका सामील झाली आहे. तिचं नाव आहे आयएनएस ‘अँड्रोथ’. ही फक्त एक साधी युद्धनौका नाही, तर ती आपल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आज आपण याच ‘अँड्रोथ’ बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

तुम्ही सलग 14 दिवस साखर खाल्ली नाही तर तुमच्या शरीरामध्ये काय घडतं तुम्हाला ठाऊक आहे का?

No Sugar Benefits : जेव्हा तुम्ही वजन कमी करायचं ठरवता तेव्हा आहारतज्ज्ञ नेहमी साखरेचं प्रमाण कमी करण्याचं किंवा साखर सोडण्याचा सल्ला देतात. तुम्ही कमीतकमी दोन आठवडे जरी साखरेचे पदार्थ खाण्याचं थांबवलं तरी तुमच्या शरीरात सकारात्मक बदल घडायला सुरूवात होते. पण आपण मात्र, दिवसातून एखाद्या वेळी गोड खाल्लं तर काय बिघडतं असं आपण सहज म्हणून जातो. तर जाणून घेऊयात दिवसातून एकदाच तेही थोडंस जरी गोड खाल्लं तर शरीरावर काय परिणाम होतो?

घिबलीनंतर आता नॅनो बनाना फोटोचा एआय ट्रेंड कितपत सुरक्षित आहे?

Nano Banana Trend : कोणताही ट्रेंड आल्यावर पहिला मुद्दा येतो तो तुमच्या माहितीच्या सुरक्षिततेचा. एआयवर घिबलीनंतर सुरू झालेल्या नॅनो बनाना ट्रेंडवर अनेक महिला – तरुणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. मात्र, या ट्रेंडच्या माध्यमातून तुमचा फोटो डेटा एआयकडे जमा होत आहे. हा डेटा पुढे कशाप्रकारे वापरला जाऊ शकतो, याची तुम्हाला काही कल्पना आहे का? सोशल मीडियावर दरवेळी येणाऱ्या या नवनवीन ट्रेंडमध्ये सहभागी होणं कितपत सुरक्षित आहे?

काय आहे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ ?

Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत महिला व बालकांसाठी हे विशेष आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. देशातल्या प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये आणि अंगणवाडीमध्ये आरोग्य तपासणी, मार्गदर्शन शिबिरं भरवण्यात येणार आहेत. 

अभिनेत्री ऐश्वर्या रायने प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्कासाठी दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव; जाणून घेऊयात काय असतात प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्क

Aishwarya Rai : प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव, चित्र, आवाजासारख्या ओळखपत्रांचा व्यावसायिक वापर नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. ज्यामुळे त्याचा गैरवापर टाळता येतो. जाणून घेऊयात प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यामागचं कारण नेमकं काय आहे.

ग्रेट निकोबार प्रकल्प भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी का महत्त्वाचा आहे?

Great Nicobar Project : केंद्र सरकारच्या ग्रेट निकोबार प्रकल्पावर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या प्रकल्पाला ‘नियोजनपूर्वक केला जाणारा गैरप्रकार’ असं म्हणत या संपूर्ण प्रकल्पावर टीका केली आहे. जाणून घेऊयात सरकारसाठी महत्त्वपूर्ण असलेला तर विरोधकांकडून जैवविविधते विषयी प्रश्न उपस्थित केला जाणारा हा प्रकल्प नेमका काय आहे.

केस गळणे हे सौंदर्यापेक्षा आरोग्याशी संबंधित का आहे : त्यामागचे विज्ञान आणि उपाय

HairFall : केस गळती ही खरं तर आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. आपल्या शरीरातील विविध घटक, हार्मोन्स, आपण खात असलेले अन्नपदार्थ, ताणतणाव, जीवनशैली अशा सगळ्या गोष्टींच्या परिणामामुळे केसगळती होत असते. भारतात, जिथे शहरी ताणतणाव, चुकीची माहिती आणि सोशल मीडियावरील वाढत्या स्व-प्रतिमेच्या दबावामुळे  केस गळणे ही आता सर्वच वयोगटातील लोकांची समस्या झाली आहे. 

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ