यूनेस्को – जागतिक वारसा मानांकन देणारी संस्था 

UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बांधलेल्या 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये व्हावा, यासाठी राज्य सरकार यूनेस्कोकडे नामांकन यादी सादर केली आहे. त्यानुसार, युनेस्कोच्या पथक 6 – 7 ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यावेळी या पथकाने जवळपास तीन-चार तास किल्ल्यावर आतून आणि समुद्रातून पाहणी केली. 

जम्मू-काश्मिरमधील निवडणुकांचं महत्त्व

Jammu – Kashmir Elections: केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या काही वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे जम्मू-काश्मीर खोऱ्यात सकारात्मक बदल घडले आहेत की नकारात्मक, केंद्राच्या निर्णयावर जनता खूश आणि की संतप्त, हे सगळं काही विधानसभा निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. म्हणून केवळ देशाचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकांवर आहे.

औषधांची गुणवत्ता तपासायची की फार्मा कंपनीची?

CDSCO Medicine Quality Check Testing : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) गुरूवारी, 26 सप्टेंबर रोजी 53 औषधं गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्याचा अहवाल सादर केला आहे. या औषधांमध्ये डायबेटीज, ब्लड प्रेशर, अॅसिडीटी, कॅल्शियम आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्स अशा औषधांचा समावेश आहे.

भारतातील शक्तिशाली ‘परम रूद्र’ सुपर कम्प्युटर्स! काय असते सुपर कम्प्युटर्सची सुपर पॉवर?

Param Rudra Super computers: भारतीय बनावटीच्या ‘परम रुद्र’ या तीन सुपर कम्प्युटर्सचा संशोधन क्षेत्रात खूप मोठा फायदा होणार आहे. या सुपर कम्प्युटर्समुळे संशोधन क्षेत्राला गती प्राप्त होणार आहे. याचबरोबर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचं वर्चस्व आणखी प्रभावी होणार आहे.

ई – एफआयआर  गुन्हा नोंदवण्यासाठी डिजीटल पर्याय

E – FIR : ई-एफआयआर म्हणजे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. ऑनलाईन पद्धतीने एफआयआर दाखल केल्यावर, त्या एफआयआर काय कारवाई केली? याबाबतची माहिती आणि पाठपुरावाही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घेता येतो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करणं हे जास्त सोयीचं आणि सुरक्षित झालं आहे.

लेबनॉन नवीन युध्दभूमी म्हणून का उदयास येत आहे?

Lebanon A New war land: ‘पूर्व आशियामधलं स्वित्झर्लँड’ अशी ओळख असलेल्या देशाचं आता मध्य आशियातली नविन युद्धभूमी म्हणून रूपांतर होत आहे. याला कारणीभूत आहे ते इस्त्रायल आणि हिजबुल्लाह या दोघांमधलं युद्ध.

सणासुदीच्या काळात तेलाच्या किंमती वाढणार की कमी होणार?

केंद्रीय अन्न – प्रशासन सचिवांनी (Central Food Secretary )सर्व खाद्यतेल कंपनींना (Edible Oil Companies) तेलाच्या किंमती खाली आणण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच गहू, साखर आणि धान्याचाही पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असून या उत्सवाच्या काळात त्याचीसुद्धा चढ्या भावाने विक्री न करण्याचे आदेश दिलेले आहेत.

तिरूपती लाडूचे अर्थकारण

तिरूपती (Tirupati Balaji Temple ) लाडू प्रसादात जनावराची चरबी आणि माशांच्या तेलाचा अंश आढळला. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर मोठा वादंग निर्माण झाला आहे. भाविकांच्या श्रध्देचा विषय तर उफाळून आलाच आहे. पण प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेचा मुद्दाही उपस्थित होत आहे.

कोकणची कातळशिल्प

ऐतिहासिक कातळशिल्पांमुळे (petroglyphs) निसर्गसंपन्न कोकणाची (Konkan) जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टीच्या विविध जिल्ह्यांमध्ये कातळशिल्प सापडत असल्यामुळे जगभरातील संशोधकांच्या मनात कोकणाबद्दल कुतूहल निर्माण होत आहे.  महत्त्वाचं म्हणजे या कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारशामध्ये व्हावा, यासाठी प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. 

‘मोसाद’चा दरारा का?

लेबनॉनमध्ये (Lebanon) पेजर आणि वॉकीटॉकीच्या स्फोटांची मालिका सुरू झाल्यावर मोसादचं (Mossad) नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कोण आहे ही मोसाद? अनेक घटनेमुळे धडाकेबाज गुप्तहेर संस्था म्हणून मोसादची ओळख आंतरराष्ट्रीय पटलांवर बनत गेली.

अमेरिकेतील प्रेसिडेंशियल डिबेट

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी प्रेसिडेंशियल डिबेट हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या डिबेटमध्ये उमेदवारांना आपले विचार, धोरणं आणि राष्ट्रबांधणी व विकासाच्या संकल्पना जनतेसमोर प्रत्यक्ष मांडण्याची संधी मिळते.

जागतिकदृष्ट्या महत्त्वाचं वाढवण बंदर कसं आहे?

पालघरजवळच्या वाढवण येथे उभारलं जाणारे वाढवण बंदर हे जगातल्या पहिल्या 10 बंदरांपैकी एक बंदर म्हणून ओळखलं जाणार आहे. तर देशातलं क्रमांक एकच बंदर असणार आहे. या बंदराच्या माध्यमातून आपल्याला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशांसोबत व्यापार करणं अधिक सोपं होणार आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ