अपार कार्ड : शालेय विद्यार्थ्यांच्या माहितीचंही डिजीटल डॉक्युमेंटेशन

APAAR Card : नवे शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी अपार कार्डची योजना राबवण्यात येत आहे. Automated Permanent Academic Account Registry असं APAAR या शब्दाचं पूर्ण स्वरूप आहे. ‘एक विद्यार्थी, एक ओळखपत्र’ (One Nation, One student ID) या अंतर्गतच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचं अपार कार्ड तयार केलं जात आहे.
राज्यसभा अध्यक्ष पदावरुन जगदीप धनखड पायउतार होणार का?

No Confidence Motion against Rajya Sabha Chairperson Jagdeep Dhankhar : मंगळवार दिंनाक 10 डिसेंबर रोजी काँग्रेस प्रणित इंडी आघाडीने राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आहे. संसदेच्या आजवरच्या इतिहासात राज्यसभा अध्यक्षाविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याची ही पहिलीच घटना आहे.
केंद्र सरकारची नवीन विमा सखी योजना; दोन लाख महिलांना मिळणार रोजगार

PM Vima Sakhi Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विमा सखी योजने’चा शुभारंभ केला. या योजने अंतर्गत दोन लाख महिला एलआयसी एजंट म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांना मानधनही देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी हरियाणा मधल्या पानिपत इथून ‘विमा सखी योजने’चा शुभारंभ केला.
प्लास्टिकचा पुनर्वापर करत आहात, पण जरा सांभाळून!

FSSAI ने पॅकेज्ड वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता, या उत्पादकांना वार्षिक तपासणीस सामोरे जावे लागेल, आणि त्यांना परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी, या तपासणीचे पालन करणे बंधनकारक असेल.
केंद्र सरकारने रद्द केला विंडफॉल कर; काय असतो विंडफॉल कर

Windfall Tax : आंतरराष्ट्रीय हाजारपेठेत तेलाच्या किंमती उतरल्यामुळे केंद्र सरकारने विमानातील इंधन आणि देशांतर्गत रिफाईन तेलाच्या निर्यातीवर आकारला जाणारा विंडफॉल कर आणि देशांतर्गत उत्पादित पेट्रोल डिझेलवरील रस्ते व पायाभूत सुविधा उपकरही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभल धार्मिक वादाची ठिणगी! काय आहे पूजास्थळ कायदा 1991?

Shahi Jama Masjid : उत्तरप्रदेशमधला संभल हा छोटासा जिल्हा सध्या धार्मिक हिंसाचारामुळे चर्चेत आला आहे. संभल येथली शाही जामा मस्जिद परिसरात केलेल्या सर्वेक्षणावरुन धार्मिक वाद निर्माण झाला आहे.
व्हॉस्ट्रो खात्यांच्या सुविधेमुळे भारत – रशिया व्यापाराला चालना; काय असते व्हॉस्ट्रो खाते?

Vostro Account : आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार हे निवडक देशांसोबत त्या-त्या देशांतील चलनामध्ये करता यावेत यासाठी वॉस्ट्रो खात्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या खात्याच्या माध्यमातून रशियासोबत आत्तापर्यंत 66 अब्ज डॉलरचा व्यापार केलेला आहे. 2030 पर्यंत हा व्यापार 100 अब्जापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं आहे.
अफगाणिस्तानात महिलांना ‘मुक्या’ करणारा तालिबानी फतवा

Taliban’s fatwas in Afghanistan : अफगाणिस्तानात तालिबानी संघटनेने सत्ता काबिज केल्यापासून निरनिराळे फतवे काढले जात आहेत. या सगळ्या फतव्यांचं भयावय रूप आता बघायला मिळत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये स्त्रियांना घराबाहेर मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी घातली गेली. महिलांच्या आवाजामुळेही पुरूषाच्या मनात व्याभिचाराचे विचार येऊ शकतात म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. घरातही महिलेला मोठ्यानं वाचन किंवा गाणं गाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
आता तर मोठ्या आवाजात प्रार्थना न करण्याचाही तालिबानी फतवा जाहीर केला आहे.
पिककचरा आणि प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेला उत्तर भारत

Stubble burning : उत्तर भारतामध्ये आता एकच विषय चर्चेला आहे, तो म्हणजे हवामानाची ढासळती गुणवत्ता. याला कारण आहे ते पिकं कापल्यावर शेतजमिनीवर उरणारे पिकांचे बुंधे आणि धान्य काढणीनंतर उरलेला पेंढा. पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये आता पीक कापणीचा हंगाम सुरू आहे. या पिकांची कापणी केल्यानंतर जो कचरा राहतो तो कचरा शेतकरी काढून न टाकता, जाळतात. यामुळे काम सुलभ होतं पण आरोग्य, हवामान, पर्यावरणासह जमिनीचीही गुणवत्ता ढासळते.
कोदो धान्याच्या सेवनाने 10 हत्तीचा मृत्यू! का ठरतेय कोदो धान्य प्राण्यांसाठी जीवघेणे

Elephants Death : बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये 29 ऑक्टोबरला वनविभागाला 4 हत्ती मृत स्थितीत आढळले. तर 6 हत्ती गंभीररित्या आजारी होते. दुसऱ्या दिवशी मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे आणखीन चार हत्तींचा मृत्यू झाला. तर 31 ऑक्टोबरला उपचारा दरम्यान उर्वरित दोन हत्ती मृत्यूमुखी पडले. अशाप्रकारे तीन दिवसात एकूण दहा हत्ती दगावल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे.
दिवाळीत बिनसाखरेची मिठाईसुद्धा जपून खा

Sugar free Sweets : मिठाईचा आनंद मधुमेह रुग्णांनाही घेता यावा म्हणून बाजारात शूगर फ्री मिठाईसुद्धा गेल्या काही वर्षांपासून मिळत आहेत. मात्र, कृत्रिम गोडव्यासाठी वापरले जाणारे हे घटक मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित नाहीत.
कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतून 10 खेळ वगळले; कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनला आर्थिक चणचण?

Commonwealth Games Glasgow 2026 : कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने 2026 साली ग्लॉसगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतून दहा खेळ वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार क्रिकेट, हॉकी, कुस्ती, स्क्वॉश, बॅडमिंटन, टेबल टेनिस यासारखे खेळ वगळण्यात आले आहेत.