कलाक्षेत्रातील एआय वापरामुळे सर्जनशीलतेला धोका; महाराष्ट्र सायबर विभागाची मार्गदर्शक तत्वे जाहीर

Cyber Guidelines for using AI in Art : सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार जोपासण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने कलाक्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली आहेत.
[gspeech type=button]

सोशल मीडियावरच्या घिबली आर्ट ट्रेंडमध्ये सगळेच खूप गुंतून गेले आहेत. लहान-मोठे सामान्य वापरकर्त्यांसह कलाकार, खेळाडू आणि राजकीय नेत्यांना सुद्धा या घिबली आर्टची भुरळ पडलीच आहे. ज्यांनी मार्च महिन्यात किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात या घिबली आर्टमध्ये आपले फोटो रुपांतर करुन सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत, त्यांनी तर चक्क हा ट्रेंड फॉलो करायला उशीर झाल्यामुळे क्षमा मागून आपले फोटो रुपांतर करुन पोस्ट केले आहेत. हे एवढं या घिबली आर्टचं क्रेझ वाढलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार याचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्र सायबर विभागाने कलाक्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली आहेत. 

सायबर विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचा उद्देश

एआयच्या मदतीने घिबली कलेसारखी हुबेहूब चित्र वा फोटो तयार केला जातो. मात्र, घिबली ही कलाकाराने त्यांच्या बोद्धिक क्षमतेचा वापर करुन निर्माण केलेल्या कलेचा हा प्रकार आहे. या कला प्रकाराचा निर्मात्याला न विचारता असा सरसकट वापर करणे चुकीचं आहे. कलाकारांच्या सर्जनशीलतेचा गैरवापर, वापरकर्त्यांची व्हिज्यूवल (फोटो) माहिती मिळवणे, त्या माहितीचा गैरवापर आणि एआय निर्मित फोटोंचा व्यवसाय अशा सगळ्या गोष्टी संबंधी घटना घडू लागल्या आहेत. या सगळ्या घटना सायबर क्षेत्रा अंतर्गत येतात. त्यामुळे सायबर विभागाने कलाकारांना, वापरकर्त्यांना आणि ॲप विकसीत करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही मार्गदर्शक तत्वे जाहिर केली आहेत. 

एआय ॲपच्या साहय्याने गुन्हा कसा घडतो?

विविध एआयच्या साहय्याने फोटो विकसीत करताना मानवी सर्जनशीलता, कलाकारांची बौद्धिकता, माहितीचा गैरवापर केला जातो. कलाक्षेत्रातही एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृतीचा सरसकट गैरवापर होऊन त्या अनोख्या निर्मितीवरच्या अधिकाराची पायमल्ली होते. 

कलाकाराशी संबंधित गुन्ह्यांशिवाय या एआय निर्मित चित्र वा फोटोमुळे ग्राहकांची सुद्धा फसगत होते. ग्राहकांनी मागितलेले चित्र वा फोटो हे कलाकारांनी रेखाटलेले आहेत की एआय वा अन्य तंत्रज्ञानाच्या साहय्याने निर्माण केलेले आहेत यातली तफावत ओळखता येत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसगत होते. 

हे ही वाचा : काय आहे नेमकं स्टुडिओ घिबली?

पारदर्शकतेचा अभाव

अनेक एआय ॲपमध्ये कोणत्या ॲनिमेटेड कलेचा वापर करुन फोटो वा चित्र विकसीत केलं आहे याची माहिती त्या ॲपवर दिली जात नाही. त्यामुळे मूळ ॲनिमेटेड कला विकसीत करणाऱ्या कलाकाराला त्याचं श्रेय मिळत नाही. शिवाय त्याला अशा कलाकृतीच्या वापरावर दावा करता येत नाही. त्यामुळे त्यांना कोणताच आर्थिक फायदाही मिळत नाही.  

अतिवास्तववादी चित्र 

एआयच्या मदतीने खऱ्या कलाकृतीशी खूप साम्य साधणारं चित्र निर्माण केलं जातं. चित्रातल्या छोट्या छोट्या बारकाई हुबेहूब टिपल्या जातात. त्यामुळे कलाकराने स्वत:च्या हातांनी रेखाटलेलं चित्र कोणतं आणि तंत्रज्ञान निर्मित चित्र कोणता यातला फरक ओळखता येत नाही.  त्यामुळे अगदी कमी वेळेत निर्माण झालेली ही चित्रं बाजारत मोठ्या किंमतीने विकली जात आहेत. त्यावर कुठेही ही चित्रं तंत्रज्ञान निर्मित चित्र असल्याचा उल्लेख केला जात नाही. या सगळ्या प्रकारामुळे ग्राहकांची फसवणूक होते. 

कॉपीराइट चित्रांचा सरसकट वापर

एआय डेटाबेसमध्ये कॉपीराइट असलेल्या चित्रांचा आणि फोटोचा सरसकट वापर केला जातो. चित्रकारांची, फोटोग्राफरची त्यासाठी रीतसर परवानगी घेतली जात नाही. शिवाय वापरलेल्या चित्र वा फोटोखाली त्या कलाकृतीच्या मूळ व्यक्तिच्या नावाचाही उल्लेख केला जात नाही. या बाबींमुळे बौद्धिक संपदा हक्काचं उल्लंघन होतं.  

कॉपीराइटद्वारे सुरक्षित असलेले व सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध नसलेली चित्र, फोटो सुद्धा एआय डेटाबेसद्वारे सार्वजनिक केले जातात. 

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नैसर्गिकरित्या मानवी बुद्धीने निर्माण झालेल्या कलाकृतींचे महत्त्व आणि पर्यायी कलाकरांच्या सर्जनशीलतीचे अवमूल्यन होते.  

त्याचबरोबर, एआयच्या वेगवेगळ्या ॲपमध्ये वापरकर्ते आपले फोटो अपलोड करुन ते घिबली स्टाईलमध्ये रुपांतर करुन घेतात. यावेळी वापरकर्ते कोणतीच डेटा पॉलिसी तपासून पाहत नाहीत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ॲप्सना वापरकर्त्यांची माहिती आणि विशेषत: म्हणजे फोटो सुद्धा मिळतात. ज्याचा पुढे गैरवापर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

हे ही वाचा : चॅट जीपीटीच्या सततच्या वापराने माणूस एकलकोंडा बनतो

कलाकारांसाठी सायबर विभागाच्या सूचना

एआयकडून तुमच्या कलाकृतीची चोरी होऊ नये म्हणून ग्लेझ किंवा नाईटशेड या साधनांचा वापर करा.  आपली कलाकृती सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर व्हिज्यूवल वॉटरमार्क आणि कॉपीराइट मेटाडेटाची नोंद करा. याशिवाय एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी नियम तयार करावेत यासाठी डिजीटल पद्धतीने सुरू असलेल्या मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

एआय तंत्रज्ञान विकासकांसाठीच्या सूचना

एआय व्यवस्था सार्वजनिकरित्या वापरण्यासाठी आणताना त्यासंबंधित अधिकृत परवाने आणि त्या प्लॅटफॉर्मवर योगदान देणाऱ्या किंवा कलाकृती निर्माण करणाऱ्या सर्व कलाकारांचा उल्लेख असावा. त्या प्लॅटफॉर्मवर वापरण्यात येणाऱ्या चित्र, फोटो किंवा माहिती तसेच वापरकर्त्यांच्या माहिती संदर्भातले धोरण त्याचे अधिकार यासंबंधित माहिती असावी. ज्या कलाकरांना एआय प्लॅटफॉर्मवरुन कला प्रदर्शित करायची असेल अशा कलाकारांसाठी प्रवेशासंबंधित आणि बाहेर पडण्याच्या प्रक्रियेविषयीच्या नियमांची स्पष्टता असावी. 

हे ही वाचा : वेगवेगळ्या एआय असिस्टंट ॲपमधलं वैविध्य

धोरणकर्त्यांसाठींच्या सूचना

डेटासेट आणि एआयमध्ये पारदर्शता अनिर्वाय असल्यासंबंधित धोरणांची निर्मिती करणे.  कॉपीराइट कायद्याअंतर्गत कलाकरांच्या कलाकृतीचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना राबवणे.  कलाक्षेत्रातील एआयचा वापर संतुलित रहावा यासाठी नियम तयार करण्याचे आवाहन सरकारला केलं आहे. 

तंत्रज्ञान वापरकर्त्यांसाठी सायबर विभागाच्या सूचना

डिजीटल आर्ट खरेदी करताना ती प्रत कलाकृतीची मूळ प्रत आहे की नाही याची शहानिशा करा. एआय आधारित किंवा अशा कलाकृतींची चोरी करुन (पायरेटेड पद्धतीच्या) कलाकृतीची विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर करु नका. त्याचप्रमाणे एआयच्या संतुलित वापरासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन ही महाराष्ट्र सायबरने वापरकर्त्यांना दिलं आहे. 

1 Comment

  • http://Boyarka-inform.com/

    Amazing blog! Is your theme custom made or ddid you download it from somewhere?
    A design like youurs with a few simple tweeks would reallky make
    my blkg shine. Please let me know where you got your design. Cheers http://Boyarka-inform.com/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. Amazing blog! Is your theme custom made or ddid you download it from somewhere?
    A design like youurs with a few simple tweeks would reallky make
    my blkg shine. Please let me know where you got your design. Cheers http://Boyarka-inform.com/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

UPI: मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळपास तीन वेळा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे जी पे
Cotton or linen : कॉटन आणि लिनेन हे दोन वेगळ्या प्रकारचे कापड आहेत. लिनेन हे फ्लेक्स नावाच्या एका खास प्रकारच्या
Pope Election Process : रोमन कॅथॉलिक समुदायाचे पोप फ्रान्सिस यांचे भारतीय वेळेप्रमाणे सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी निधन झालं.