अपार कार्ड : शालेय विद्यार्थ्यांच्या माहितीचंही डिजीटल डॉक्युमेंटेशन

APAAR Card : नवे शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी अपार कार्डची योजना राबवण्यात येत आहे. Automated Permanent Academic Account Registry असं APAAR या शब्दाचं पूर्ण स्वरूप आहे. ‘एक विद्यार्थी, एक ओळखपत्र’ (One Nation, One student ID) या अंतर्गतच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचं अपार कार्ड तयार केलं जात आहे.
[gspeech type=button]

मोठ्यांच्या डिजी लॉकरप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठीही आता  डिजी लॉकर सुविधा सुरू करण्यात आली आहे. डिजीटलायझेशनच्या युगात प्रत्येक व्यक्तीची अत्यावश्यक असलेली सर्व माहिती डिजीटल स्वरूपात साठवली जाते. मोठ्या व्यक्तींच्या पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स यांसारख्या सरकारी ओळखपत्रांना किंवा कागदपत्रांना  डिजी लॉकरमध्ये ठेवण्यात येते. आणि कुठेही कागदपत्रं दाखवायची झाल्यास डिजी लॉकरमधील ही कागदपत्रं प्रमाण मानली जातात. 

शालेय विद्यार्थ्यांकरताच्या या सुविधेला ‘अपार कार्ड’द्वारे उपयोगात आणता येत आहे. केंद्रीय शिक्षण खात्यांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. सध्या देशभरातील शाळांमध्ये याकरता विद्यार्थ्यांची माहिती आणि पालकांचे संमत्तीपत्रक घेण्याचं काम सुरू आहे. काही विद्यार्थ्यांना त्यांचे अपार कार्ड आणि विशेष नंबरही मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड

नवे शैक्षणिक धोरण ही आत्ताच्या काळाला सुसंगत असे तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्येही विविध विषय शिकता येणार आहेत. तर उच्च शिक्षण घेतानाही विद्यार्थी एकाच वेळेला दोन विषयांत शिकू शकतात. परिस्थितीनुसार जर एखाद्या विद्यार्थ्यांला एखाद्या वर्षाचा ब्रेक घ्यायचा असेल तर, एक वर्षाचा ब्रेक घेऊन तो पुन्हा आपलं शिक्षण सुरू करू शकतो. या सगळ्या नव्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रगतीचा ट्रॅक रेकॉर्ड राहावा यासाठी खास हे कार्ड तयार करण्यात येत आहे. या कार्डमुळे पारदर्शकता राहिल आणि व्यवस्थेची फसवणूक होणार नाही, असे प्राथमिक उद्दीष्ट समोर ठेवली आहेत. 

अपार कार्ड 

नवे शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी अपार कार्डची योजना राबवण्यात येत आहे. Automated Permanent Academic Account Registry असं  APAAR या शब्दाचं पूर्ण स्वरूप आहे. ‘एक विद्यार्थी, एक ओळखपत्र’ (One Nation, One student ID) या अंतर्गतच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचं अपार कार्ड तयार केलं जात आहे. 

अपार कार्डमध्ये कोणती माहिती असणार?

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पारदर्शकता ठेवून त्यांच्या शिक्षणाचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी अपार कार्डची मदत होणार आहे. यामध्ये परिक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांसह एक्स्ट्रा करिक्युलर विषयातीलही विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा उल्लेख केला जाणार आहे. 

शाळेचा दाखला, विविध परिक्षांची प्रमाणपत्र, निकालपत्रे, जातीचा दाखला अशी महत्त्वपूर्ण कागदपत्र या अपार अकाउंटवर अपलोड केली जातील. 

अपार कार्डचा बहुउपयोग

आज डिजी लॉकरवर आपली कागदपत्रे अपलोड असतील तर, आवश्यक तिथे ते सबमिट करता येतात. त्याचप्रमाणे, या अपार कार्डवर आपली सगळी शैक्षणिक कागदपत्रं असणार आहेत.  एखाद्या विद्यार्थ्यांला शाळा बदलायची असेल त्यावेळी नव्या शाळेमध्ये द्यावी लागणारी कागदपत्रं ही त्या कार्डवर असतील. माध्यमिक शाळांसाठी प्रवेश घेताना, महाविद्यालयीन प्रवेश आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता ही या कार्डवरूनच करता येऊ शकते. 

अनेकदा विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्यावर, नव्या शाळेतील शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल काहिच माहिती नसते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे, शिकण्याची क्षमता, अन्य कलागुणांतील त्याची आवड-निवड अशा अनेक गोष्टींची माहिती नसते. ही सर्व माहिती अपार कार्डवर असेल तर नव्या शाळेतील शिक्षकांनाही त्या विद्यार्थ्यांला समजून घेण्यास आणि सामावून घेण्यास मदत होईल. 

अपारकार्ड कसे मिळवाल?

सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अपारकार्ड काढून दिलं जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणं आणि डिजीलॉकरवर खातं असणं गरजेचं आहे. यामध्ये शिशू वर्ग ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून कन्सर्न फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. शाळेकडून दिलेल्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांचे नाव, आईवडिलांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, लिंग, आधारक्रमांक अशी अत्यावश्यक माहिती द्यायची असते. फॉर्म भरल्यावर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना अपारकार्ड मिळाल्याचा मेसेज पालकांच्या मोबाईलवर येतो. यात मुलांच्या अपारकार्ड नंबर दिलेला असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ