दसऱ्याच्या दिनी कोणाचं ‘वैचारिक सोनं’ होतं महाग?

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची सभा हे मुख्य आकर्षण असायचं. त्याचसोबत आरएसएसच्या व्यासपीठावरुन मांडले जाणारे विचारही एक चर्चेचा विषय असायचा. मात्र अलिकडे, पक्षापक्षात झालेल्या फाटाफुटीमुळे सभेंची रेलचेल असते. आरएसएसचा मेळावा, शिवसेनाच्या दोन गटाच्या वेगवेगळ्या सभा, राज ठाकरे यांची सभा, गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडे यांची सभा आणि त्यात भर म्हणून मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे जरांगे पाटील हेही आता दसऱ्यांच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. 

प्रथम एज्युकेशन फाउंडेशनला FICCI चा WASH पुरस्कार

Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार 2025  मिळाला आहे. ISC-FICCI च्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘WASH (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) मधील सर्वोत्तम कौशल्य उपक्रम’ या श्रेणीत हा सन्मान मिळाला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात 3% वाढ!

Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर

Thane Development Plane : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या  बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाय सुचवण्यासाठी एक तज्ञ समिती नियुक्त केली जाणार असल्याची माहिती दिली.

राज्याला पूराचा तडाखा ! पूरग्रस्तांसाठी तातडीने 2 हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद

Maharashtra Flood : पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तातडीने 2 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना तात्काळ 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी दिली.

ओला-उबेरच्या प्रवाशांना दिलासा!

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (MMRTA)ने 16 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, नॉन-एसी वाहनांसाठी 20.66 रुपये प्रति किमी आणि एसी वाहनांसाठी 22.72 रुपये प्रति किमी भाडे अनिवार्य आहे.

ई – केवायसीनंतरच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे; राज्य सरकारचा निर्णय

E-KYC for Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्य बहिणींना ई-केवायसी करावं लागणार आहे. यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिलेला आहे. ज्या लाभार्थी महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील त्याच लाभार्थ्यांना पुढचे हफ्ते दिले जाणार आहेत. 

एनडिएचे सी पी राधाकृष्णन भारताचे 15 वे उपराष्ट्रपती!

मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडिएचे सी पी राधाकृष्णन यांनी इंडिया ब्लॉकचे बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला.

मेहूल चोक्सी यांना तुरूंगामध्ये सगळ्या सोई-सुविधा देणार ! भारताने बेल्जियम सरकारला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं?

Mehul Choksi : भारत सरकारने मेहूल चोक्सी यांना देशातल्या कोणत्या तुरूंगात आणि कशापद्धतीने ठेवलं जाणार आहे याची माहिती देणार पत्र पाठवलेलं आहे. जाणून घेऊयात या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे. 

जीएसटी करसंकलनात आता 5 आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब, अनेक वस्तू व सेवा होणार स्वस्त !

GST Reform : बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काऊंसिलची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी कर संकलनामध्ये दोनच टप्पे ठेवण्यावर सर्व सदस्यांचं एकमत झालं आहे. यामुळे अनेक वस्तू, सेवांवरील कर कमी करण्यात आलेला आहे.

मराठा आंदोलकांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य, पण मुख्य मागण्यांबाबत तिढा कायम

Maratha Reservation : मराठा बांधवांच्या मागण्या समजून घेत अखेर राज्य सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य करत असल्याचं घोषित केलं आहे. याविषयी मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी जीआर ही काढला आहे. यामध्ये हैदराबाद गॅझेट, सातारा, औंदह गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जरांगेंचा मुंबईतील मुक्काम वाढला! मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप

Maratha Andolan: मराठा आंदोलन मुंबईत पोहचल्यावर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात लगेचच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यांनी एकमेकांवर मराठ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप केला.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ