व्हिएतनामला यागी चक्रीवादळाचा फटका; 63 हून अधिक जणांचा मृत्यू

Source : AP News
व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला यागी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. 7 सप्टेंबरला प्रशांत महासागराहून आलेल्या या चक्रीवादळाचा फटका चीन आणि फिलीपाईन्सनाही बसला आहे. व्हिएतनाममध्ये या चक्रीवादळात 63 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 40 हून अधिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत 752 नागरिक पूर आणि भूस्खलनामुळं जखमी झाले आहेत.
[gspeech type=button]

गेल्या 30 वर्षांतील सर्वात शक्तिशाली वादळ

व्हिएतनाम हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यागी चक्रीवादळ गेल्या 30 वर्षांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळांपैकी एक आहे. ताशी 149 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं अनेक पूल वाहून गेले, कित्येक घरांची छप्परं उडून गेली आहेत. व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात पूराचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरलं आहे.

पूल कोसळला, भूस्खलन

फु थो प्रांतातील लाल नदीवरील लोखंडी पूल या चक्रीवादळामुळे कोसळला. यावेळी 10 कार आणि 2 बाईक्स लाल नदीत पडल्या. या वाहनांमधून प्रवास करणारे 13 जण बेपत्ता झाले आहेत. काओ बांग प्रांतात झालेल्या भूस्खलनात 21 लोक ठार झाले असून काही लोक बेपत्ताही आहेत. लाओ काई प्रांतात 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वादळामुळे मोठं नुकसान

या चक्रीवादळामुळे देशाच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागातील कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 1.5 दशलक्ष लोक अजूनही वीजेशिवाय आहेत. 1 लाख 16 हजार 192 हेक्टर जमिनीवरील पिके वाया गेली आहेत. भात आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जखमी आणि इतर नुकसान

नैसर्गिक आपत्तींमध्ये 247 लोक जखमी झाल्याची नोंद झाली आहे. 25 जहाजे बुडाली आहेत. जवळपास 2 लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1 लाख 21 हजार 700 झाडे कोसळली आहेत.
व्हिएतनाम सरकार कडून बचाव आणि पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Fake birth certificates to bangladeshis : महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 42 हजारहून अधिक बांग्लादेशींना दिलेली 'बनावट' जन्म प्रमाणपत्रे
Malegaon Blast : मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या (NIA Court) विशेष कोर्टाने तब्बल
पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही. मोदी यांनी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल महत्त्वाची बाब मांडली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ