जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात दहशत

Junnar Leopard Attack : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुपेश तानाजी जाधव असं या मुलाचं नाव आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे.
[gspeech type=button]

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुपेश तानाजी जाधव असं या मुलाचं नाव आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेला मुलगा रूपेश जाधव हा आपल्या आजी आजोबांसोबत तेजोवाडी इथल्या वीटभट्टीवर राहत होता. मंगळवारी संध्याकाळी बिबट्याने या मुलावर हल्ला करत त्याला ओढत बाजूच्या शेतात घेऊन गेला. जवळच असलेल्या लोकांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी मोठा आवाज करत पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. मात्र, बिबट्याने त्या मुलाला डोक्याच्या बाजूने ओढून नेल्यामुळे या घटनेत त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज बुधवारी सकाळी पोलिस अधिकाऱ्यांनी पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी जुन्नर तालुक्यातल्या पिंपळगाव सिद्धनाथ इथल्या मनिषा सुनिल शिंदे या महिलेवर सुद्धा बिबट्याने हल्ला केला. मनिषा शिंदे या गाडीवरून जुन्नरला येत असताना बिबट्यांनी त्यांच्या पायावर हल्ला केला. पण त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत हातातल्या पिशवीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. त्यांना तातडीने ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जुन्नर परिसरात एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान आता वनविभागापुढे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ