ओपनएआयने लॉन्च केला AI-पॉवर्ड सर्च इंजिन ‘सर्चजीपीटी’ ( SearchGPT ) ; गुगलला मिळणार तगडी टक्कर

SearchGPT- सर्चजीपीटी युजर्सच्या प्रश्नांना अधिक तपशीलवार आणि अचूक उत्तरं देईल. तसेच संबंधित सोर्स लिंकसह माहिती पुरवेल. युजर्स फॉलो-अप प्रश्न देखील विचारू शकतात.
[gspeech type=button]

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने टेक्नॉलॉजी क्षेत्रात नवीन एआय-पॉवर्ड सर्च इंजिन ‘सर्चजीपीटी’ फिचर लॉन्च केलं आहे. सध्या या सर्च इंजिनचं काम चाचणी पातळीवर आहे. परंतु लवकरच सर्च मार्केटमध्ये या फीचरमुळे मोठा बदल घडू शकतो.

ओपनएआयने आपल्या वेबसाइटवरील निवेदनात सांगितलं आहे की, “आम्ही सर्चजीपीटीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. हा एक प्रोटोटाइप असून, AI मॉडेलच्या क्षमता आणि वेबवरील माहितीच्या एकत्रीकरणावर आधारित आहे. यामुळे युजर्सना जलद, अचूक आणि सोर्ससह उत्तरं मिळतील.” हा प्रोटोटाइप वापरण्यासाठी युझर्सना वेटलिस्टसाठी साइन अप करण्याची संधी देण्यात आली आहे.

सर्चजीपीटी युजर्सच्या प्रश्नांना अधिक तपशीलवार आणि अचूक उत्तरं देईल. तसेच संबंधित सोर्स लिंकसह माहिती पुरवेल. युजर्स फॉलो-अप प्रश्न देखील विचारू शकतात. यामुळे सर्चिंग प्रोसेस अधिक सोपी होईल. व्यावसायिक भागीदारांकडून माहिती मिळवून, ओपनएआयने सर्च परिणामांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

गुगलला तगडं आव्हान

ओपनएआयच्या या नवीन सर्च इंजिनमुळे गुगलसाठी आव्हान निर्माण झालं आहे. गुगल वर्षानुवर्षं सर्च इंजिन मार्केटमध्ये वर्चस्व राखत असले तरी, AI तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे गुगलला आता अनेक स्पर्धकांचा सामना करावा लागणार आहे.

AI तंत्रज्ञानाचे युद्ध

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या जसं की ओपनएआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांच्यात एआय तंत्रज्ञानात आघाडी घेण्यासाठी वरचढ सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ