लेबनॉनमध्ये पेजर, वॉकीटॉकी आणि बॅटरी स्फोटांची मालिका- शेकडो मृत्यू, हजारो जखमी

लेबनॉनमध्ये (lebanon) 17 सप्टेंबर रोजी पेजरमध्ये स्फोट होण्याच्या घटना घडल्या. 18 सप्टेंबरला वॉकी-टॉकीमध्येही स्फोट होऊ लागल्यानं परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे.
[gspeech type=button]

लेबनॉनमध्ये (lebanon) हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या पेजर (pager) आणि वॉकीटॉकीमध्ये  (walkie-talkie) झालेल्या स्फोटांमुळे खळबळ उडाली आहे. 17 सप्टेंबर रोजी पेजरमध्ये स्फोट होण्याच्या घटना घडल्या. 18 सप्टेंबरला वॉकी-टॉकीमध्येही स्फोट होऊ लागल्यानं परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. या स्फोटांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला असून तीन हजारांच्या वर लोक जखमी झाले आहेत.

पेजर स्फोटात मृत्यू आणि हजारों जखमी

17 सप्टेंबर रोजी अनेक पेजर एकापाठोपाठ फुटल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून 3000 लोक गंभीर जखमी झाले आहेत. घर, कार, मोटारसायकल आणि सोलर सिस्टीममध्येही स्फोट होऊ लागल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंत्यसंस्कारादरम्यान वॉकी-टॉकीमध्ये स्फोट

पेजर स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या अंत्यसंस्कारादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना घडली. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांच्या खिशात ठेवलेले वॉकी-टॉकी अचानक फुटू लागले. या स्फोटांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला तर 3250 लोक जखमी झाले आहेत.

हिजबुल्लाह सैनिकांमध्ये भीती

ही उपकरणे पाच महिन्यांपूर्वीच हिजबुल्लाहने खरेदी केली होती. उपकरणांमध्ये स्फोट होताच हिजबुल्लाहच्या सैनिकांनी वॉकी-टॉकीमधून बॅटरी काढून फेकण्यास सुरुवात केली, कारण त्यांना भीती होती की बॅटरींमध्येसुद्धा स्फोट होऊ शकतो.

हिजबुल्लाहचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी स्फोट

वॉकीटॉकी फुटण्याच्या घटना हिजबुल्लाहाचा गड मानल्या जाणाऱ्या परिसरात झाल्या आहेत. बेरूत, बेका, नबातियेह आणि दक्षिण लेबनॉनमध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत.

इस्रायल आणि मोसादकडे संशयाची सुई

या घटनेनंतर संशयाची सुई हॅकिंगकडे फिरली आहे. असे मानले जात आहे की, पेजर सिस्टीम हॅक करून स्फोट घडवले असावेत. या घटनेमागे इस्रायल आणि त्याची गुप्तचर संस्था मोसाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पेजरची निर्मिती कोणाकडून?

ज्या पेजरमध्ये स्फोट झाले, ते हंगेरीतील एका कंपनीने तयार केले होते, अशी माहिती समोर आली आहे. तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने बुधवारी याबाबत खुलासा केला. गोल्ड अपोलोने सांगितले की, हे पेजर बुडापेस्टमधील आणखी एका कंपनीने तयार केले होते, ज्याने अधिकृत ब्रँड वापरण्याची परवानगी दिली होती.

स्थिती अद्याप गंभीर

लेबनॉनमध्ये या रहस्यमय स्फोटांमुळे भीतीचे वातावरण आहे, आणि अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून, या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ