मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर, कोकणात पावसाचा हाहाकार; पावसाच्या थैमानात चार जणांचा मृत्यू

Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबई, कोकण आणि राज्यातल्या काही भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट दिल्यामुळे सावधानता बाळगत आज (गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर) शाळा - महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
[gspeech type=button]

गणेशोत्सवामध्ये रिमझीम बरसात करणाऱ्या पावसाने सोमवारपासून कमबॅक केलं. बुधवारी मात्र पावसानं मेघ गर्जनांसह तुफान बॅटिंग केली. बुधवारी संध्याकाळी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे मुंबईतल्या तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. यामुळं कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते.

दरम्यान, आज सकाळपासून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही सेवा आणि रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू आहे.

जनजीवन विस्कळीत

हवामान खात्याकडून 25 व 26 सप्टेंबर या दोन दिवसासाठी काही ठिकाणी ऑरेंज तर काही जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला. बुधवारच्या पावसाच्या रौद्र रूपानंतर पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे पालघर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

विमान वाहतुकीवर परिणाम

बुधवारी झालेल्या या पावासाचा विमान वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतेय. खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावर 14 विमानाचं लँडीग रद्द करण्यात आलं. या विमानांना मार्ग बदलण्यास सांगून अन्य विमानतळावर काल रात्री लॅडिंग करण्यात आलं. यामध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या 9 विमानांचा समावेश होता.

पावसाच्या थैमानात चार जणांचा मृत्यू

बुधवारी संध्याकाळी पडलेल्या पावसाने चार मुंबईकरांचां बळी घेतला. अंधेरी येथे विमल गायकवाड (45 वयोवर्ष) या MIDC सीप्झच्या 8 नंबर गेटजवळच्या उघड्या नाल्यात पडल्या. घटनेची माहिती मिळतात फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचली व महिलेला नाल्यातून बाहेर काढलं. मात्र, रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

ठाणे जिल्ह्यात शिरगाव येथे वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मुंब्रा येथल्या बायपास रोडवर लँडस्लाइड झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ