पनवेल मनपाची महिला कर्मचारी शुभांगी घुले हिला जागतिक स्पर्धेत कांस्य पदक

Panvel : पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळालं आहे.
रेल्वेने एसी क्लाससाठी प्रतिक्षा यादीची मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत वाढवली!

Indian Railway : रेल्वेने एसी डब्याची मर्यादा 25 टक्क्यावरुन 60 टक्के केली आहे. तर नॉन – एसी डब्यातली प्रतिक्षा यादीची मर्यादा 30 टक्के केली आहे. यासंदर्भातले सुधारित आदेश रेल्वेने दिनांक 28 जून 2025 रोजी काढले. याशिवाय आरक्षित जागांची यादी ही गाडी सुटायच्या 8 तास आधी प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यात वीज स्वस्त होणार; वीज नियामक आयोगाचा निर्णय

Maharashtra Electricity Rate : राज्यात 1 जूलै 2025 पासून वीज दरात 10 टक्क्याने कपात केली जाणार आहे. या दरांमध्ये वर्षागणिक टप्प्या टप्प्याने कपात करणार असून पुढच्या पाच वर्षात 26 टक्के वीज दर कमी केला जाणार आहे.
स्विस बँकेत भारतीयांचे पैसे तिप्पट वाढले!

Swiss bank : स्विस नॅशनल बँकेची ही आकडेवारी बँकांनी दिलेल्या अधिकृत अहवालांवर आधारित असते. यातून कथित ‘काळा पैसा’ किंवा दुसऱ्या देशांतील कंपन्यांमार्फत ठेवलेल्या खात्यांची माहिती मिळत नाही. स्विस अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितलं आहे की, हे पैसे आपोआप ‘बेकायदेशीर’ ठरवता येत नाहीत.
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 110 विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात भारताला यश

Operation Sindhu : इराणमधून 110 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणारं पहिलं विमान गुरुवार, दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे भारतात पोहोचलं. इराणमधल्या युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून ‘ऑपरेशन सिंधू’ राबवण्यात येत आहे.
पावसाचे पुनरागमन; महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, अनेक जिल्ह्यांत अलर्ट

Rain update: महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. विशेषतः कोकण आणि मुंबई परिसरात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुजरात विमान अपघात : पायलट, केबिन क्रू सह 241 प्रवाशांचा मृत्यू, 1 प्रवासी बचावला

Gujarat plane crash : गुजरातमधल्या अहमदाबादहून लंडन इथल्या गॅटवीक इथे जाणाऱ्या विमानाला 12 जून रोजी दुपारी साधारण दीडच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात विमानाचे 2 पायलट, 10 केबिन क्रू सह 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. केवळ एकच प्रवासी या भीषण अपघातातून वाचला आहे.
आता आधारशिवाय ‘तात्काल’ तिकीट मिळणार नाही

Tatkal Tickets booking Rule : आधार कार्डनंबर शिवाय तिकीट आरक्षित करता येणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे. याची अंमलबजावणी 1 जूलै 2025 पासून होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ई – स्वॅप बॅटरी स्टेशन्स प्रकल्पामध्ये महामुंबई मेट्रोची भागीदारी

E-SWAP Battery Stations : मुंबईभर पसरलेल्या मेट्रो आणि मोनोरेलच्या स्थानकांवर ईःस्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे.
एमएमआरडीएने 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया केली रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा एल अँड टी कंपनीला दिलासा

MMRDA and L&T Dispute : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाणे ते घोडबंदर रस्ते कामासंबंधीची निविदा प्रक्रिया रद्द करत असल्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने न्यायालयात स्पष्ट केलं आहे. यामुळे एल अँड टी कंपनीला दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर एमएमआरडीएने संपूर्ण प्रकल्पाची किंमत 3 हजार कोटी रुपयाने कमी करण्याचाही निर्णय जनहितार्थ घेतला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राज्यात पावसाचं आगमन

Maharashtra Rain : कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार सोमवार दिनांक 26 मे सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई भागात 135 मिमी पाऊस पडल्याची नोंद केली आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर याचं निधन

Dr. Jayant Narlikar : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज पुणे इथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 87 वर्षाचे होते. वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.