पनवेल मनपाची महिला कर्मचारी शुभांगी घुले हिला जागतिक स्पर्धेत कांस्य पदक

Panvel : पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळालं आहे.
[gspeech type=button]

पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळालं आहे. अमेरिका इथल्या अल्बामा इथे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या यशाबद्दल पनवेल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगीचं विशेष अभिनंदन केलं आहे. 

शुभांगीने जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेतल्या ‘अल्टिमेट फायर फाइटिंग चॅलेंज’ (ULTIMATE FIRE FIGHTING CHALLENGE) या खेळात कांस्य पदक मिळवून भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे.  या स्पर्धेतलं त्यांचं यश देशाच्या क्रीडा क्षेत्रातला एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. 

अल्बामा इथे 2025 मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, जगातील अग्निशमन आणि पोलिस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा अग्निशमन, पोलिस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती. यात जगभरातून 50 देश सहभागी झाले होते. शुभांगीने इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत, या कठीण आणि तडफदार स्पर्धेत जलद आणि उत्कृष्ट कामगिरी सादर करत कांस्य पदक मिळवलं आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे तसेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शुभांगीचं अभिनंदन केलं आहे.

“ही स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. माझ्या प्रशिक्षकांचे आणि कुटुंबीयांचे समर्थन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. यापुढेही मी अधिक मेहनत करून भारताचे नाव उज्ज्वल ठरवण्याचं काम करीन” अशी प्रतिक्रिया शुभांगी यांनी दिली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Pandharpur Wari 2025 : आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान देणार
Telangana chemical company blast : सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी तेलंगणा इथल्या एका रासायनिक कारखान्यात अणुभट्टीचा (रिएक्टर) स्फोट झाला.
1st July : जुलै महिन्याच्या आजच्या या पहिल्या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टींमध्ये बदल घडणार आहेत. आर्थिक,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ