पुण्यातील रेड अलर्टमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द

 PM Modi’s Pune visit cancelled: भारतीय हवामान खात्याकडून पुणेसह पिंपरी-चिंचवड जिल्ह्याला 25 – 26 सप्टेंबर या दोन दिवशी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
[gspeech type=button]

मुंबईसह पुण्यात सुद्धा पावासाने बुधवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावली होती. हवामान खात्याकडून आजही पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला दौरा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेनी माहिती दिली आहे.

लोकार्पण सोहळ्याची माहिती

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्ग आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचा आज लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एस.पी. महाविद्यालयाच्या परिसरात हा सोहळा संपन्न होणार होता. मात्र, पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. बुधवारी संध्याकाळी तर पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं. या पावसामुळे कार्यक्रमास्थळावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. उपस्थितांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यक्रमस्थळावर खडीचा भराव टाकून जागा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. तसंच या कार्यक्रमस्थळाला पर्याय म्हणून गणेश कला क्रिडा रंगमंच या ठिकाणीही तयारी सुरू केली होती. मात्र, हवामान खात्याकडून बुधवार – गुरूवार रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे प्रशासनाला अखेर कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. या दोन मेट्रो मार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाची नवीन तारीख प्रशासनाकडून नंतर देण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Swiss bank : स्विस नॅशनल बँकेची ही आकडेवारी बँकांनी दिलेल्या अधिकृत अहवालांवर आधारित असते. यातून कथित 'काळा पैसा' किंवा दुसऱ्या
Operation Sindhu : इराणमधून 110 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणारं पहिलं विमान गुरुवार, दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे भारतात पोहोचलं.
Rain update: महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. विशेषतः कोकण आणि मुंबई परिसरात येत्या काही

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ