पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीचा अजेंडा काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 21 सप्टेंबरपासून अमेरिका दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात जगातील सामर्थ्यशाली नेत्यांच्या भेटी, वार्षिक क्वाड समीट Quad Summit मध्ये सहभाग आणि युनायटेड नेशन्ससोबत चर्चा असा भरगच्च कार्यक्रम पंतप्रधानांचा असणार आहे.
[gspeech type=button]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याला शनिवार दिनांक 21 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात जगातील सामर्थ्यशाली नेत्यांच्या भेटी, वार्षिक क्वाड समीट Quad Summit मध्ये सहभाग आणि युनायटेड नेशन्ससोबत चर्चा असा भरगच्च कार्यक्रम पंतप्रधानांचा असणार आहे.

पाहुयात पंतप्रधानांच्या दौऱ्याचा सविस्तर प्लान –

क्वाड समीट, विल्मिंगटन – विल्मिंगटन, डेलावेअर इथं आयोजित वार्षिक क्वाड समीटपासून पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीस आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासोबत पंतप्रधान मोदी इंडो पॅसिफिक क्षेत्रातली सुरक्षा आणि सहकार्य यावर चर्चा करतील.

क्वाड नेत्यांसोबत द्वीपक्षीय चर्चा – क्वाडच्या नेत्यांसोबत मोदी संरक्षण, तंत्रज्ञान सहयोग, जागतिक तणावाच्या परिस्थिती हातळण्याची नीती याबाबतीत द्विपक्षीय चर्चा करतील. यात युक्रेन आणि गाझा या मुद्द्यांचाही समावेश असेल.

कॅन्सर उपचारासंबंधी घोषणा – क्वाड समीटचे महत्वाचे साध्य म्हणून कॅन्सर उपचारासंबंधी घोषणा असणार आहे. कॅन्सरला प्रतिबंध, निदान आणि उपचार या बाबींमध्ये क्वाड समीटमध्ये चर्चा होऊन काही ठोस आश्वासक गोष्टींची घोषणा करण्यात येईल. यात रुग्ण आणि त्याच्या कुटुंबावर होणारा कॅन्सरचा परिणाम, आरोग्य सुरक्षेवर अधिक व्यापक दृष्टिकोन आणि माणुसकीच्या दृष्टीनं साहाय्या यावर भर असेल.

जागतिक संघर्षावर लक्ष

युक्रेन संघर्षात संभाव्य मध्यस्थ म्हणून भारताच्या भूमिकेचं बारकाईनं निरीक्षण केलं जाईल. याबाबतीत काही औपचारीक प्रस्ताव नसला तरी, जागतिक सहकार्यांसोबत याविषयावर नक्कीच चर्चा होईल, असं परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री यांनी सांगितलं आहे.

ग्लोबल साउथमधील मुद्द्यांवर चर्चा

ग्लोबल साउथ म्हणजेच आशिया, अफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन भागातील देशांना (राजकीय व सामाजिक-आर्थिक विचार समान असणाऱ्या देशांचा गट) भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दलही चर्चा होईल. यात समान विकास, हवामान बदल आणि डिजीटल वस्तू वापरणारे व न वापरणारे लोक या विषयांवर भर असेल.

युएन जनरल असेंब्लीमध्ये ‘समीट ऑफ द फ्युचर’

23 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी युएन जनरल असेंब्लीमध्ये ‘समीट ऑफ द फ्युचर’मध्ये संबोधित करतील. यात शाश्वत विकास, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर त्यांचा भर असेल. जागतिक संघर्षात भारताची भूमिका आणि यामुळे विकासात येणारे अडथळे कसे दूर करता येतील, यावर मोदी भाष्य करू शकतात.

अमेरिकन टेक लीडर्ससोबत गोलमेज

अमेरिकेतील महत्त्वाच्या टेक फर्ममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पंतप्रधान भेटणार आहेत. या भेटीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वॉन्टम कॉम्प्युटिंग आणि सेमी कडंक्टर टेक्नॉलॉजी यावर चर्चा होईल. या गोलमेज चर्चेमुळं भारत आणि अमेरिकेदरम्यानचे तंत्रज्ञान सहकार्य अधिक दृढ होईल.

न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाची भेट

लाँग आयलंडमध्ये दिनांक 22 सप्टेंबर रोजी आयोजित एका खास कार्यक्रमात पंतप्रधान मोदी अमेरिकेत स्थायिक भारतीय समुदायाची भेट घेणार आहेत.

गाझामधील संघर्ष आणि भारताची भूमिका

गाझा संघर्षाबाबत युद्धविराम, मानवतावादी मदत, इस्रायल व पॅलेस्टाईन या दोघांकरताही शांततापूर्ण वातावरण या भारताच्या जुन्या भूमिकेचेचं समर्थन करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ