जीएसटी करसंकलनात आता 5 आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब, अनेक वस्तू व सेवा होणार स्वस्त !

GST Reform : बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काऊंसिलची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी कर संकलनामध्ये दोनच टप्पे ठेवण्यावर सर्व सदस्यांचं एकमत झालं आहे. यामुळे अनेक वस्तू, सेवांवरील कर कमी करण्यात आलेला आहे.
[gspeech type=button]

बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काऊंसिलची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी कर संकलनामध्ये दोनच टप्पे ठेवण्यावर सर्व सदस्यांचं एकमत झालं आहे. यामुळे अनेक वस्तू, सेवांवरील कर कमी करण्यात आलेला आहे. सामान्य लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी याविषयीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना दिलेली ही दिवाळी भेट आहे, असं सरकारने म्हटलं आहे. 

जीएसटी काऊंसिलच्या निर्णयानुसार आता 5 आणि 18 टक्केच कर आकारला जाणार आहे. यापूर्वी काही वस्तूंवर वा सेवांवर 12 टक्के किंवा 28 टक्के कर आकारला जायचा. यात आता कपात करून बऱ्याच वस्तूंचा कर हा 5 टक्के केला आहे. यामुळे बहुतांश अत्यावश्यक वस्तूंचे दर येत्या काळात कमी होणार आहेत. येत्या 22 सप्टेंबरपासून हे नवीन कर लागू होणार आहेत. 

दरम्यान, तंबाखू, सिगारेट यासारख्या आरोग्याला अपायकारक असलेल्या वस्तूवर वेगळा 40 टक्के कर आकारला जाणार असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. 

आरोग्य क्षेत्र

अधिकाधिक लोकांनी विमा संरक्षण घ्यावं यासाठी आरोग्यविम्यावर पूर्णत: सूट दिली आहे. थोडक्यात आरोग्यविम्यावर यापुढे जीएसटी आकारला जाणार नाही. याशिवाय ज्या औषधांवर यापूर्वी 12 टक्के जीएसटी आकारला जायचा अशी

33 प्रकारची औषध करमुक्त केली आहेत.  कॅन्सर उपचारासाठी वापरली जाणारी औषधेही करमुक्त केली आहेत. तर अन्य औषधांवरील कर 5 टक्क्यावर आणला आहे. तसेच उपचारासंबंधित काही उपकरणांवरही यापुढे 5 टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये थर्मामीटर, मेडिकल ऑक्सीजन, डायग्नोस्टिक किट, ग्लूकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स आणि चश्मे यांचा समावेश आहे. 

दैनंदिन वापरातील वस्तूवरील करकपात

दैनंदिन वापरातील वस्तूंवर कर कपात करत ते पाच टक्क्यावर आणले आहेत. यामध्ये हेअर ऑइल, शाम्पू, साबण, शेव्हींग क्रीम, टूथब्रश, टूथपेस्ट यांचा समावेश आहे. अन्नपदार्थांपैकी नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्स अशा पॅकबंद अन्नपदार्थांवर पूर्वी 12 टक्के कर आकारायचे मात्र आता 5 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच स्वयंपाक घरातील भांड्यावरही 5 टक्के कर असणार आहे. 

लहान मुलांसाठी अत्यावश्यक असलेल्या वस्तू जसं की फिडींग बॉटल्स, डायपर्स, नॅपकिन्स यावस्तूवरही आता 12 ऐवजी 5 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच शिवणयंत्र मशीन आणि त्याच्या विविध भागांवरही 5 टक्केच कर आकारला जाणार आहे. 

शिक्षण क्षेत्राशी संबंधित वस्तू करमुक्त

सर्वात आनंदाची बाब म्हणजे या बैठकीमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या वस्तू करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नकाशे, तक्ते, जगाचा नकाशा ( ग्लोब), पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, वह्या, खोडरबर अशा वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंवर पूर्वी 12 टक्के कर आकारला जायचा. पण आता 22 सप्टेंबरपासून या वस्तू पूर्ण करमुक्त असतील. 

कृषी उपकरणांवर 5 टक्के कर

शेतकऱ्यांनाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रॅक्टरचे टायर्स आणि त्याचे अन्य भागांवर याआधी 18 टक्के कर आकारला जायचा. पण यात आता कपात केली असून 5 टक्केच कर आकारला जाणार आहे. तसेच ट्रॅक्टर्स, ठरावीक बायो पेस्टीसाईड्स, मायक्रो न्यूट्रीयंट्स, ठिबक सिंचन, कृषी, बागायती कामात उपयोगी असलेली उपकरणांवर 5 टक्के कर आकारला जाणार आहे.

वाहन (ऑटोमोबाईल) क्षेत्रालाही मोठा फायदा

पेट्रोल, पेट्रोल हायब्रीड, एलपीजी, सीएनजी (1200 सीसी आणि 400 एमएम पर्यंतचे) चारचाकी वाहनं, डिझेल आणि डिझेल हायब्रीड (1500 सीसी आणि 400 एमएम पर्यंतचे) चारचाकी वाहनं, तीन चाकी वाहनं, मोटर सायकल्स (350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी) आणि ट्रान्सपोर्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर 18 टक्के कर आकारला जाणार आहे. यापूर्वी या वाहनांवर 28 टक्के कर आकारला जायचा. 

इलेक्ट्रोनिक उपकरणांवरही करकपात

घरात गरजेच्या असलेल्या इलेक्ट्रोनिक वस्तूवरही मोठी कर कपात केली आहे. एसी, एलईडी, एलसीजी असे जे 32 इंचापेक्षा मोठे असणारे टिव्ही, मॉनिटर्स, प्रोजेक्टर्स, डीश वॉशर्ससारख्या उपकरावर आता 28 ऐवजी 18 टक्के कर आकारला जाणार आहे. 

करकपातीचे महसूलावर होणार परिणाम

जीएसटी बैठकीत प्रत्येक निर्णय हा मतदानाच्या साहाय्याने घेतला जातो. मात्र या वेळेस बैठकीत करकपातीचा हा निर्णय एकमताने घेतला गेला. या निर्णयामुळे सरकारला जवळपास 93 हजार कोटी रुपयाचं महसुली तोटा होणार आहे. तर तंबाखु, सिगारेट यासारख्या वस्तूंवर जो 40 टक्के कर आकारला जाणार आहे, त्यातून 45 हजार कोटी रुपयाचं अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकार ही तूट कशी भरून काढणार यावर काही निर्णय झालेला नाहीये. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maratha Reservation : मराठा बांधवांच्या मागण्या समजून घेत अखेर राज्य सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य करत असल्याचं घोषित केलं आहे.
Maratha Andolan: मराठा आंदोलन मुंबईत पोहचल्यावर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात लगेचच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यांनी एकमेकांवर मराठ्यांच्या
बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ