गुजरातमधल्या अहमदाबादहून लंडन इथल्या गॅटवीक इथे जाणाऱ्या विमानाला 12 जून रोजी दुपारी साधारण दीडच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात विमानाचे 2 पायलट, 10 केबिन क्रू सह 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून विश्वास रमेश नावाचा एक प्रवासी वाचला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे एअर इंडियाचं B787 ड्रीमलायनर एअरक्राफ्ट विमान होतं. विमान मेघानीनगर परिसरातल्या इमारतीला धडकलं ती निवासी डॉक्टरांची इमारत होती. त्यामुळे काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांसह अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या विमानतळावरुन टेक ऑफ घेतल्यावर अवघ्या 20 मिनिटानंतर विमान खाली येऊ लागलं आणि एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीला धडकलं. हे विमान लंडनला जाणारं असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन होतं. त्यामुळे विमानाने लागलीच पेट घेतला. कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे या विमानाचे पायलट होते.
एनडीआरएफ ने दिलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या तीन टीम्स – एकूण 90 कर्मचारी घटनास्थळी बचावकार्यासाठी पोहोचलेल्या आहेत. तर वडोदरा यूनिटमधून ही तीन पथके बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचत आहेत.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार विजय रुपानी हे या विमानातून प्रवास करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे महासंचालक त्यांच्या पथकासह अहमदाबादला चौकशीसाठी रवाना होत आहेत.
एअर इंडियाचे चेअरमन एन. चंद्रशेकरन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून गुजरात विमान अपघात झाल्याचं सांगितलं आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, “अतिशय दुःखद अंतकरणाने मी कळवत आहे की, अहमदाबाद ते लंडन गेटविक या एअर इंडिया 171 विमानाला आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत पावलेल्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीय आणि जखमींसोबत आम्ही आहोत. बचावकार्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही करत आहोत. याबाबत आम्ही ताजी माहिती तुम्हांला देत राहू. कुटुंबियांच्या मदत आणि माहितीसाठी आपत्कालीन साहाय्य केंद्र आम्ही सुरू केलं आहे. ”
With profound sorrow I confirm that Air India Flight 171 operating Ahmedabad London Gatwick was involved in a tragic accident today. Our thoughts and deepest condolences are with the families and loved ones of all those affected by this devastating event.
At this moment, our…— Tata Group (@TataCompanies) June 12, 2025
जखमी प्रवाश्यांना घटनास्थळावरुन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विशेष ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. – एएनआयची माहिती
एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडीयन नागरिक, आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
दरम्यान अपघाता संदर्भात अधिकृत माहिती देण्यासाठी एअर इंडियाकडून पॅसेंजर हॉटलाईन नंबर 1800 5691 444 देण्यात आला आहे.
या अपघातामध्ये 53 ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते. या पार्श्वभूमीवर यूके सरकारने भारतातील स्थानिक अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली असून अपघातग्रस्त नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 020 7008 5000 हेल्पलाईन नंबर दिला आहे.
या अपघातानंतर सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळ 4 वाजल्यापासून अहमदाबाद विमान तळावरून विमान उड्डाणांना सुरूवात करण्यात आली आहे.
UPDATE: Ahmedabad Airport is now available for flight operations from 16:05 IST onwards.
Flight safety protocols are being followed with utmost care.@RamMNK @mohol_murlidhar @samirsinha69
— MoCA_GoI (@MoCA_GoI) June 12, 2025
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ऑपरेशनल कंट्रोल रूम सक्रिय करण्यात आली आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी 011-24610843 आणि 9650391859 हे दोन संपर्क क्रमांक दिले आहेत.
In light of the AI171 crash, an Operational Control Room has been activated at the Ministry of Civil Aviation to coordinate all details.
Contact: 011-24610843 | 9650391859
We are committed to swift response and full support to all affected.@RamMNK @mohol_murlidhar
— MoCA_GoI (@MoCA_GoI) June 12, 2025
गुजरातच्या आमदार दर्शना वाघेला यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे तिथल्या डॉक्टरांच्या निवासी इमारतीला धडकलं. पूर्ण इमारत हादरली. स्थानिक लोक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने लागलीच डॉक्टरांना या इमारतीतून बाहेर काढलं आणि जखमी डॉक्टरांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तरी निवासी भाग असल्यामुळे अनेक नागरिक जखमी किंवा मृत असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
1 Comment
fo41zb