झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Jharkhand Assembly Election : झारखंड  विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.  या टप्प्यामध्ये एकुण 38 विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाजपा झारखंड प्रदेशअध्यक्ष बाबूलाल मरांडी, लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष जयराम महतो आणि जेएमएमच्या स्टार प्रचारक कल्पना सोरेन याचं भवितव्य सुद्धा मतपेटीत बंद होणार आहे. 
[gspeech type=button]

झारखंड  विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.  या टप्प्यामध्ये एकुण 38 विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या टप्प्यात जवळपास 23 लाखाहून अधिक मतदार सहभागी होणार आहेत. 

सर्व मतदान केंद्र सीसीटिव्हीच्या निगराणीखाली

 या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तासह सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी बाहेर परिसरात आणि आत मतदान क्षेत्रातही सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच्या मदतीने सर्व केंद्रावर कडक निगराणी करण्यात येणार आहे.  निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही कॅमेरेच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे अशी माहिती झारखंड राज्याचे निवडणूक आयोग अधिकारी के. रविकांत यांनी दिली आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण लढती 

या दुसऱ्या टप्प्यातील 38  मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघांमध्ये झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा या प्रादेशिक पक्षाची निर्णायक भूमिका असणार आहे. हे दहा मतदारसंघ या प्रादेशिक पक्षासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष जयराम महतो हे डुमरी आणि बेरमो अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

या दुसऱ्या टप्प्यातील 38 मतदारसंघांपैकी 28 जागांवर एनडीए आणि  इंडी आघाडी असा मुकाबला होणार आहे. तर अन्य 10 मतदारसंघात जेथे झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे प्राबल्य आहे तेथे त्रिशंकू लढती होणार आहे. 

आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाजपा झारखंड प्रदेशअध्यक्ष बाबूलाल मरांडी, लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष जयराम महतो आणि जेएमएमच्या स्टार प्रचारक कल्पना सोरेन याचं भवितव्य सुद्धा मतपेटीत बंद होणार आहे. 

मतदारांना मतदान प्रमाणपत्र

मतदारांना मतदानांसाठी प्रवृत्त करण्यासाठी झारखंड  निवडणूक आयोगाकडून मतदान केलेल्या मतदारांना मतदान प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात येत आहे. खिजरी मतदान केंद्रावर अनेक मतदारांनी हे प्रमाणपत्र मिळवून आनंद साजरा केला आहे. 

तसंच मतदान केंद्रावर मतदारांना सेल्फी घेता यावा यासाठी पाकूर जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ