महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 9 मे पासून पुढच्या तीन दिवसांसाठी हवामान विभागानं राज्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात चांगलीच घट झाली आहे. गेले तीन-चार दिवस राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस आहे. या अवकाळी पावसामुळं गारवा पसरल्याने उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली आहे. पुढच्या तीन दिवसांकरता मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य प्रदेशावर समुद्रसपाटीपासून 1.5 किमी ते 7.6 किमी उंचावर वारे चक्राकार वाहत आहेत. परिणामी उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. हे वातावरण मान्सूनकरता पोषक मानलं जात असून 13 मे पर्यंत मान्सून अंदमानपर्यंत पोहचेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
अंदमानहून मान्सून 1 जूनच्या आसपास केरळकडे सरकतो. मात्र याबाबतची खरी स्थिती 15 मेपर्यंतच स्पष्ट होईल.
1 Comment
3j70gr