सर्व खासगी वाहतूक सेवांसाठी सामायिक निर्णय – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Mumbai : महाराष्ट्रातील खासगी प्रवासी वाहतूक सेवा उबर आणि रॅपिडो ह्या एकाच नियमांनुसार काम करणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यामुळे प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत होईल.  वाहतूक व परवाना संबंधित समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.
[gspeech type=button]

महाराष्ट्रातील खासगी प्रवासी वाहतूक सेवा उबर आणि रॅपिडो ह्या एकाच नियमांनुसार काम करणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यामुळे प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत होईल.  वाहतूक व परवाना संबंधित समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.

नवीन नियामक चौकटीची निर्मिती

14 जानेवारीला मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री सरनाईक यांनी उबर आणि रॅपिडोसह सर्व खासगी प्रवासी वाहतूक सेवांना एकाच नियामक चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे सेवा अधिक सुसंगत आणि सुरक्षित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या उपक्रमाचा उद्देश प्रवासी सुरक्षा सुधारणा, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि परवाना संबंधित समस्यांवर उपाय शोधणे आहे.

बैठकीला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, MSRTC चे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर आणि विविध वाहतूक कंपन्यांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

महिला चालकांसाठी प्रोत्साहन

सरनाईक यांनी महिलांसाठी विशेषत: बाईक सेवांमध्ये चालक म्हणून काम करण्याचे प्रोत्साहन देण्यावरही जोर दिला. यामुळे महिला सक्षमीकरणासोबतच रोजगाराच्या नवीन संधी देखील मिळू शकतील. तसेच, सर्व वाहतूक सेवा पुरवठादारांना प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस सुरक्षा उपाय लागू करणे अनिवार्य असेल.

MSRTC कर्मचार्‍यांसाठी आरोग्य सेवा सुविधा

राज्यातील अनेक बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित कराया तत्त्वावर विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 25 तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे  यामुळे राज्यातील परिवहन कर्मचार्‍यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होईल.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हे सर्व उपक्रम राज्य सरकारच्या परिवहन सेवांच्या सुधारणा आणि कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ