एनडिएचे सी पी राधाकृष्णन भारताचे 15 वे उपराष्ट्रपती!

मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडिएचे सी पी राधाकृष्णन यांनी इंडिया ब्लॉकचे बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला.
[gspeech type=button]

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे ही जागा रीक्त झाली होती. त्यामुळं मंगळवार, 09 सप्टेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत तब्बल 427 खासदारांनी एनडीएचे राधाकृष्णन यांना मतदान केले.

राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनी या निवडणुकीचा निकाल घोषित केला. त्यानुसार, एकूण 767 मते होती. त्यापैकी 752 वैध आणि 15 अवैध आढळली. विजेत्याला 377 मतांची आवश्यकता होती. एनडीएच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली, तर इंडिया ब्लॉकच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली. त्यामुळं एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

एनडीएचं मतांचं पारड जड होतं तरी विरोधकांनी ही निवडणूक “वैचारिक लढाई” म्हणून मांडली आहे.

दरम्यान, बिजू जनता दल (बीजेडी), भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यासह अनेक प्रादेशिक पक्षांनी या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता.  या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं होतं की, त्यांची भूमिका राज्यस्तरीय गोष्टींना प्राधान्यक्रम देते. त्यामुळंच एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकपासून ते अंतर राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजता मतदान सुरू झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मतदान केले. मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होतं. मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली.

 

क्रॉस व्होटिंग 

एनडीएकडे 427 मते हक्काची मते होती. पण त्यांच्या उमेदवाराला 452 मते मिळाली यावरून असे दिसून येते की, एनडीएबाहेरील लोकांनी क्रॉस-व्होटिंग केलं आहे.

 

सी.पी. राधाकृष्णन यांचा परिचय

एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. त्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल आणि लोकसभेचे खासदार होते. भाजपच्या तामिळनाडू युनिटचे प्रमुख म्हणून त्यांनी तिथं पक्ष स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

इंडिया ब्लॉकचे बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते 2011 मध्ये निवृत्त झाले. उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणारे ते सर्वोच्च न्यायालयाचे पहिले माजी न्यायाधीश आहेत.

 

उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया

भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड संविधानाच्या अनुच्छेद 66 नुसार केली जाते. अनुच्छेद 66 मध्ये म्हटले आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेलं एक निवडणूक मंडळ उपराष्ट्रपतींची निवड करते. विजेता साध्या बहुमताने ठरवला जातो. या निवडणुकीत 240 राज्यसभा खासदार आणि 542 लोकसभा खासदारांनी निवडणूक मंडळाची स्थापना केली. सध्या राजसभेत पाच आणि लोकसभेत एक जागा रिक्त आहे.

 

उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पात्रता

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्र होण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचे वय किमान 35 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नाही. त्यांना प्रस्तावक म्हणून किमान 20 खासदार आणि समर्थक म्हणून किमान 20 खासदार असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mehul Choksi : भारत सरकारने मेहूल चोक्सी यांना देशातल्या कोणत्या तुरूंगात आणि कशापद्धतीने ठेवलं जाणार आहे याची माहिती देणार पत्र
GST Reform : बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काऊंसिलची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी कर
Maratha Reservation : मराठा बांधवांच्या मागण्या समजून घेत अखेर राज्य सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य करत असल्याचं घोषित केलं आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ