भारत आणि पाकिस्तान सीमाभागात सातत्याने बॉम्बहल्ले, गोळीबार सुरू आहे. या सर्व घटनांची तपशीलवार माहिती देण्यासाठी भारतील गृहमंत्रालय व सैन्याच्या तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सौफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली. पत्रकार परिषदेतील मुद्दे पुढीलप्रमाणे –
- पाकिस्तान भारताच्या पश्चिम सीमेवर धोकादायक शस्त्रांचा वापर करुन सातत्याने आक्रमण करत आहे.
- श्रीनगर ते नलिया अशा एकूण 26 ठिकाणावर पाकिस्तानने शुक्रवार दिनांक 9 मे 2025 च्या रात्री हल्ले केले आहेत.
- यामध्ये सामान्य नागरिक, महत्त्वाची आस्थापने आणि लष्करी तळांना लक्ष्य केलं जात आहे.
- हल्ल्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र, आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर.
- श्रीनगर, अवंतीपुरा, उधमपूरमधील शाळा, कॉलेज, आरोग्यकेंद्रे आणि नागरी वस्तींना लक्ष्य करण्यात आलं.
- नियंत्रण रेषेवर कुपवाडा, पूँछ, बारामुल्ला क्षेत्रात पाकिस्तान गोळाफेक करत आहे.
- रात्री दीडच्या सुमारास हायस्पीड मिसाईलचा वापर करुन पाकिस्तानने पंजाबमधील एअर बेसवर हल्ला केला.
- पाकिस्तानने लाहोरमधून उड्डाण घेणाऱ्या नागरी विमानांच्या आड हे हल्ले केले. यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं आहे.
या हल्ल्यांमध्ये उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर काही उपकरणाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. - भारत या हल्ल्यांना तोंड देण्याकरता एस-400 ही हवाई संरक्षण प्रणाली वापरत आहे.
- भारतानं या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या 8 एयरबेसवर हल्ले केले आहेत. दरम्यान, या हल्ल्यामध्ये दोन्ही देशाच्या सामान्य नागरिकांचं नुकसान होणार नाही याकडे भारत जातीनं लक्ष देत आहे.
- या पत्रकार परिषदे दरम्यान परराष्ट्र सचिव मिस्त्री यांनी पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्याचं खंडन केलं.
- पाकिस्तानकडून भारताने अफगाणिस्तानवर हल्ला केल्याची खोटी माहिती पसरवली जात असल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं.
- तसंच पाकिस्तानने भारताच्या सिरसा एअरबेसवर हल्ला करुन त्याचं नुकसान केल्याचं म्हटलं आहे. मात्र, असं काहिही झालेलं नसून सिरसा एअरबेसची धावपट्टी पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.
#OperationSindoor | Indian Army posts on 'X': "Indian Army Pulverises Terrorist Launchpads. As a response to Pakistan's misadventures of attempted drone strikes on the night of 08 and 09 May 2025 in multiple cities of Jammu & Kashmir and Punjab, the #Indian Army conducted a… pic.twitter.com/sqxouVbzOE
— ANI (@ANI) May 10, 2025