पीएम नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा: प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन आणि महत्त्वाचे कार्यक्रम

PM Narendra Modi in Maharashtra: भाजपाचे लक्ष आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर आहे, यानिमित्ताने महिन्याभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत.
[gspeech type=button]

हरयाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाचे लक्ष आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर आहे. यानिमित्ताने महिन्याभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. या दौऱ्यात त्यांचे विदर्भ, मुंबई-ठाण्यात विविध महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी बंजारा समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील जगदंबा माता मंदिर, पोहरादेवी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते स्थानिक संतांची भेट घेऊन बंजारा विरासत स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत.

प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन

मुंबई मेट्रो लाइन 3: आरे JVLR आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यानच्या मेट्रो लाइनचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

MetroConnect 3 मोबाइल ॲप: प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी हे ॲप लाँच केलं जाणार आहे.

मुंबई मेट्रो कॉफी टेबल पुस्तक: मेट्रो विकासाच्या प्रवासाचे वर्णन करणारे पुस्तकही पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.

PM-KISAN सम्मान निधी: योजनेचा 18 वा हप्ता आणि NaMo शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरीत केला जाणार आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधी प्रकल्प: 1,920 कोटी रुपये मूल्याच्या 7,500 हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे, ज्यामध्ये कस्टम हायरींग सेंटर, कोल्ड स्टोरेज, गोदामे आणि प्राथमिक प्रक्रिया युनिट्सचे उद्घाटन केले जाणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0: संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कांचे उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ