दसऱ्याच्या मुर्हूतावर प्रचारसभांचा श्रीगणेशा

Dussehra Melava : विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात विचारांचं सोनं लुटायचीही परंपरा आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या पटलावर याच दिनी प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. दसऱ्याचा शुभमुर्हूतावर अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय दसऱ्या मेळावा सभेंचं आयोजन केलं आहे.
[gspeech type=button]

विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात विचारांचं सोनं लुटायचीही परंपरा आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या पटलावर याच दिनी प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. दसऱ्याचा शुभमुर्हूतावर अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय दसऱ्या मेळावा सभेंचं आयोजन केलं आहे.

यंदा एकूण पाच दसरा मेळावे होणार आहे. या दसऱ्या मेळाव्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा लक्षवेधी ठरणार आहे. ते या मेळाव्यातून सकल मराठा समाजाला काय आदेश देणार आहेत याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपारिक दसरा मेळावा होणार आहे. संघाच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याचं विशेष आयोजन केलं जातं. केंद्रातील भाजपाच्या राजकीय नेतृत्व आणि संघातील नेतृत्वामधील नातं अलीकडे एका नाजूक वळणावर आहे. यातच आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका असल्याने संघ या निवडणुकीच्या प्रचारात उतरणार की नाही, आपली ताकद लावणार की नाही या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या मेळाव्यातून मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. पक्षातील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाला अपेक्षित यश मिळालं आहे. मात्र, येत्या विधानसभा निवडणुका या राज्यातील सत्तेसाठी अत्यावश्यक असल्याने निवडणुकीची रणनिती या मेळाव्यातून स्पष्ट होऊ शकते.

तर शिवसेनेचा म्हणजे शिंदेगटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. मूळ शिवसेनेतून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा तिसरा दसरा मेळावा असणार आहे. आझाद मैदानावर या मेळाव्याची भव्य तयारी सुरु असून साधारणत: 50 हजार लोकं बसू शकतील अशी तयारी सुरु आहे. संध्याकाळी 7 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारातचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन या मेळाव्यातून होऊ शकतं.

बीड मध्ये भगवानभक्ती गडावर आ. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आयोजित केला आहे. यंदाचा भगवानभक्ती गडावरचा दसरा मेळावा खास आहे. कारण भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे ही या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. बहीण-भावाचा एकत्रित असा हा पहिला दसरा मेळावा असणार आहे. दुपारी 1 वाजता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

यावर्षी मुख्य आकर्षण आहे ते नारायणगडावर होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याचे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार उपोषण करणारे मनोज जरांगे ही आता दसरा मेळाव्याचा मार्ग चोखळणार आहेत. विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी ध्यानात घेता या दसऱ्या मेळाव्याला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. मराठा समाजाला एकवटून ठेवण्यासाठी व निवडणुकीत एकजुटीने मतदान करण्यासाठी या सभेतून आव्हान केलं जाऊ शकतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dussehra Political Rallys : दसऱ्याच्या दिनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक सोनं वाटण्यासाठी विशेष राजकीय सभा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी या दिवशी बाळासाहेब
Pratham WASH Award : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या युवा कौशल्य: जलव्यवस्थापन आणि स्वच्छता कार्यक्रम या विशेष उपक्रमाला FICCI चा राष्ट्रीय पुरस्कार
Central Government : केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर मोठी भेट दिली आहे. बुधवार, 1

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ