पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

Priyanka Gandhi : वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रियंका गांधी मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. बुधवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रियंका गांधीं यांचा स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल.
[gspeech type=button]

वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रियंका गांधी मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. बुधवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रियंका गांधीं यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस पक्षानं कालपेट्टा इथून एक मोठी रॅली काढली.

प्रियांका गांधींचा सक्रिय राजकारणात प्रवेश

निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर, काँग्रेसने प्रियंका गांधीं यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी “वायनाडित प्रियंका” असे पोस्टरही लावले आहेत. प्रियंका गांधी वायनाडच्या मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी आपल्या जाहीर सभेत सांगितले की, “मी 35 वर्षे दुसऱ्यांसाठी मतं मागितली, पण आता मी स्वत:साठी मतं मागते आहे.”

वायनाडमधील निवडणूक

वायनाडमधील ही पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. प्रियंका गांधी यांच्या संभाव्य विजयामुळे त्या संसदेत प्रवेश करणाऱ्या गांधी कुटुंबातील तिसऱ्या सदस्या म्हणून ओळखल्या जातील. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी निवडूनही आले होते. त्यामुळे नियमानुसार, राहुल गांधींनी एक मतदारसंघ सोडला. त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर वायनाडची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता वायनाड लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे.

विरोधी उमेदवार कोण?

प्रियंका गांधींच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नव्या हरिदास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नव्या हरिदास एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ