विधानसभा निवडणुकीनिमित्त शाळेच्या बसेसना मतदानाची ड्यूटी लागल्यामुळे अनेक शाळेतील मुलांना सुट्टी द्यावी लागणार आहे.
येत्या 20 तारखेला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी सरकारने मतदान केंद्रावरील सामुग्रीच्या वाहतुकीसाठी स्कूल बस असोसिएशन आणि पर्यटकांसाठी असलेल्या बसेसची मागणी केली आहे. त्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबरला तब्बल 890 बसेस या मतदानाच्या ड्यूटीला असण्याची शक्यता आहे.
या दोन दिवसात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुविधेसाठी या बसेस उपलब्ध होऊ शकणार नाहीत. दरम्यान, सरकारकडून 890 शाळेच्या बसेसची मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधीत शाळांमध्ये पत्रक पाठवून शाळांना सुट्टी देण्याची विनंती केली आहे. जर शाळेकडून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली, तरच या बसेस मतदान ड्यूटी साठी दिल्या जातील अशी माहिती स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गार्ग यांनी माध्यमांना दिली आहे.