महाराष्ट्रातल्या महायुतीच्या ‘महाविजया’ने शेअर बाजारात तेजी!

Share Market rise : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शेअर बाजारातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा शनिवारी निवडणुकीचे निकाल जाहीर केले. त्यादिवशी बाजार बंद होता. पण आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात ही तेजीने झाली.
[gspeech type=button]

राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शेअर बाजारातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा शनिवारी निवडणुकीचे निकाल जाहीर केले. त्यादिवशी बाजार बंद होता. पण आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात ही तेजीने झाली.

सेन्सेक्स – निफ्टी मध्ये उधाण

शुक्रवारी सेन्सेक्स 79,117,11 वर बंद झाल्यावर, आज सकाळी बाजार 80 हजारांनी सुरू झालेला. थोड्याच वेळात सेन्सेक्सने 1200 अंकांनी उसळी घेत 80, 407वर पोहोचला.

तर निफ्टी मध्येही 405.25 अंकांच्या वाढ होत 24,312.50 ने व्यवहार सुरू केला.

महायुतीच्या विजयाचा सकारात्मक परिणाम

‘शुक्रवारच्या दुपारच्या सत्रापासून लार्ज कॅप्समध्ये वाढ व्हायला लागली होती. त्यानंतर शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला मिळालेल्या विजयाने बाजारात सकारात्मक वाढ होताना पाहायला मिळतेय,’ अशी प्रतिक्रिया आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ वीके विजयकुमार यांनी दिली आहे.

महायुतीच्या विजयानंतर राज्यात राजकीय क्षेत्रात आणि राज्याला एक स्थिर सरकार मिळणार, यामुळे शेअर बाजारामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्येही झाली वाढ!

मागच्या आठवड्यात अमेरिका सेक्यूरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने अदानी ग्रीन एनर्जी विरोधात लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप केल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालेली. अदानी ग्रुपचं जवळपास 28 अब्ज डॉलरचं नुकसान झालं. मात्र, आज सकाळी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये ही चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Telangana chemical company blast : सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी तेलंगणा इथल्या एका रासायनिक कारखान्यात अणुभट्टीचा (रिएक्टर) स्फोट झाला.
1st July : जुलै महिन्याच्या आजच्या या पहिल्या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टींमध्ये बदल घडणार आहेत. आर्थिक,
Panvel : पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ