सूर्यग्रहण 2024: आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण

Surya Grahan 2024: चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक दूर असल्याने तो सूर्याच्या आकारापेक्षा लहान दिसतो, त्यामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही आणि आकाशात "रिंग ऑफ फायर" तयार होतो.
[gspeech type=button]

आज, 2 ऑक्टोबर 2024 रोजी, वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण खगोलीय आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या महत्त्वाचं आहे. विशेषत: हे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होणार आहे. आज रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी हे ग्रहण लागणार असून 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3 वाजून 17 मिनिटांनी ते संपेल.

या सूर्यग्रहणाला “रिंग ऑफ फायर” असे म्हणतात. पृथ्वीच्या सर्वात दूरच्या बिंदूवर चंद्र असताना, सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये तो येतो तेव्हा हे वलयकार सूर्यग्रहण होतं.

चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक दूर असल्याने तो सूर्याच्या आकारापेक्षा लहान दिसतो, त्यामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही आणि आकाशात “रिंग ऑफ फायर” तयार होतो.

सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

‘रिंग ऑफ फायर’ सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. नासाने म्हटलं आहे की, हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत तसेच अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर आणि हवाईच्या काही भागांमध्ये अंशतः सूर्यग्रहण दिसणार आहे.

ग्रहणाचा प्रभाव

भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यानं, ग्रहणाचा प्रभाव लागू होणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा भारतातील सजीवांवर कोणताही शारीरिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक परिणाम होणार नाही. भारतात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी सामान्य दिनचर्या असेल. कारण शास्त्रानुसार ग्रहण जिथे दिसते तिथेच त्याचा प्रभाव जाणवतो.

सूर्यग्रहण म्हणजे काय?

जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत असताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि पृथ्वीच्या एका भागावर अंधार होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बहुतेक शिपमेंटवरील ड्युटी-फ्री सूट संपवणाऱ्या नवीन अमेरिकन कस्टम ड्युटी नियमांचा हवाला देत इंडिया पोस्ट 25 ऑगस्टपासून अमेरिकेला जाणाऱ्या सर्व पार्सल
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार
साप्ताहिक जन सुनवाई दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीकडे काही न्यायालयीन कागदपत्रे सापडली. मुख्यमंत्र्यावर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ