2025 या वर्षात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरता चांगले पर्याय असणार आहेत.
मराठी चित्रपटांची लिस्ट
‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ (1 जानेवारी)
परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात प्रशांत दामलेंसोबत अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
‘संगीत मानापमान’ (10 जानेवारी)
सुबोध भावे, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये आणि सुमित राघवन हे या चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. हा चित्रपट संगीतप्रेमींसाठी खास असणार आहे.
‘जिलेबी’ (17 जानेवारी)
सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, शिवानी सुर्वे आणि स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहेत.
‘फर्स्टक्लास दाभाडे’ (24 जानेवारी )
हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि क्षिती जोग या तिघा भावंडांची धमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ आणि ‘इलू इलू’ (31 जानेवारी)
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ मध्ये मायरा वायकुळ बालकलाकार म्हणून चमकणार आहे. तर ‘इलू इलू’ मध्ये एली एवराम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हिंदी चित्रपटांची लिस्ट
‘गेम चेंजर’ (10 जानेवारी)
राम चरण आणि कियारा आडवाणी यांचा हा चित्रपट एस. शंकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
‘इमर्जन्सी’ (17 जानेवारी)
इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित कंगना राणावतचा हा चित्रपट 17 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित असून कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘स्काय फोर्स’ (24 जानेवारी)
अक्षय कुमारचा स्काय फोर्स हा चित्रपट 24 जानेवारी 2025 ला रिलीज होईल. या मूव्हीमध्ये अक्षयसोबत वीर पहाडिया आपल्याला दिसणार आहे.
‘छावा’ ( फेब्रुवारी 2025 )
विक्की कौशलचा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे.
‘सिकंदर’ (ईद 2025)
सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा हा बिग बजेट चित्रपट ईदच्या निमित्ताने 2025 मध्ये प्रदर्शित होईल
‘वॉर 2’ (14 ऑगस्ट)
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा वॉर 2 हा बिग बजेट चित्रपट 14 ऑगस्ट 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कांतारा: चेप्टर 1′ (2 ऑक्टोबर)
हृषभ शेट्टीचा कांतारा: चॅप्टर 1 हा पारंपरिक धाटणीचा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे.
‘अल्फा’ (25 डिसेंबर)
यशराज फिल्म्सचा अल्फा हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट आणि शर्वर वाघ यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. शिव रावल दिग्दर्शित हा महिला केंद्रित स्पाय युनिव्हर्समधील पहिला चित्रपट असेल.
2025 वर्ष मनोरंजनाने भरलेलं असणार आहे.