भारतीय जनता पक्षाने 14 नोव्हेंबर रोजी दादर मधील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू केलेत.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमुळे शिवाजी पार्क आणि त्याच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत.
पार्किंगवरील निर्बंध
– SVS रोड (बाबा साहेब वरळीकर चौक ते हरी ओम जंक्शन),
– संपूर्ण केळुस्कर रोड, शिवाजी पार्क,
– एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क,
– पांडुरंग नाईक मार्ग (road . 5),
– दादासाहेब रेगे मार्ग,
– एलजे रोड (गडकरी जंक्शन ते शोभा हॉटेल, माहीम)
आणि इतर अनेक रस्त्यांवरील पार्किंग बंद ठेवण्यात आली आहे.
वाहतूक नियम आणि पर्यायी मार्ग
– SVS रोड नॉर्थ बाउंड: सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन पर्यायी मार्ग म्हणून एसके बोले रोड, आगर बाजार हे मार्ग वापरले जातील.
– SVS रोड साउथ बाउंड: दांडेकर चौक ते एलजे रोड किंवा एनसी केळकर रोड पर्यायी मार्ग म्हणून दिले आहेत.
पश्चिम आणि उत्तर उपनगरांमधून येणारी वाहने सेनापती बापट रोडवरील माहीम रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज दरम्यान उतरवली जातील, नंतर पार्किंगसाठी माहीम रेती बंदर, कोहिनूर पीपीएल पार्किंग, कामगर स्टेडियम इत्यादी ठिकाणी पार्क केली जातील.
पूर्व उपनगरांमधून येणारी वाहने दादर टीटी सर्कलजवळ उतरवली जातील आणि फाइव्ह गार्डन, माटुंगा, आरए किडवई रोडवर ती पार्क करता येतील.
दक्षिण मुंबईतून येणारी वाहने रवींद्रनाथ नाट्य मंदिर येथे उतरवली जातील आणि पार्किंगसाठी इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, सुदाम कालू अहिरे रोड, वरळी इथे पार्क केली जातील.
सर्व नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.